Friday, 6 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या राज्यांच्या मुख्य सचिवांच्या दुसर्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भूषवणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या भागीदारीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आहे. या बैठकीत, राज्यांच्या सहभागाने वेगवान आणि शाश्वत आर्थिक विकास साधण्याविषयी चिंतन केलं जाणार आहे.

****

लष्करी अभियंता सेवेच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल राष्ट्रपती भवनात संबोधित केलं. लष्करी अभियंता सेवेच्या अधिकाऱ्यांनी  भविष्यातल्या प्रकल्पांमध्ये मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. बांधकाम क्षेत्र अतिशय गतिमान असून तंत्रज्ञान खूप वेगानं बदलत आहे, आर्थिक वाढ आणि विकासात हे क्षेत्र मोठी भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

दर्पण दिन आज साजरा होत आहे. पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी भाषेतल्य पहिल्या वृत्तपत्राच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं पत्रकारिता महाविद्यालयं तसंच पत्रकार संघटनांच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या त्रंबकेश्वर परिसराचं पर्यावरण, पर्यटन आणि धार्मिक असं महत्त्व आहे, त्यामुळे या भागात कोणत्या प्रकारचे उत्खनन होऊ देऊ नये तसंच नदीचे स्त्रोत नष्ट होऊ देऊ नये आणि या भागाला नो डेव्हलपमेंट किंवा इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करावं, अशी मागणी आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं पाहणी करुन ब्रह्मगिरी परिसरातल्या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

****

हिंगोली इथला पुढच्या आठवड्यातला नियोजित राज्यस्तरीय हळद महोत्सव शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्याने पुढे ढकलण्यात आला आहे. आचारसंहिता संपताच या महोत्सवाचं नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा कृषि महोत्सव समितीकडून देण्यात आली आहे.

 

//*********//

No comments:

Post a Comment