▼

Tuesday, 21 February 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.02.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या संत्तासंघर्षासंदर्भात ठाकरे आणि शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून पुन्हा सुनावणी सुरु होत आहे.

दरम्यान, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आज ही याचिका न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे.

****

भारताच्या युपीआय आणि सिंगापूरच्या पे नाऊ या डिजिटल आर्थिक व्यवहारांच्या दोन यत्रणांमधील संपर्क सुविधेचा प्रारंभ; आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापुरचे पंतप्रधान ली सीएन लुंग यांच्या दूरस्थ उपस्थितीत होणार आहे. दोन्ही देशांमधील डिजिटल आर्थिक देवाण घेवाण यामुळे सुलभ होणार आहे.

****

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन कारवाई प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग केलं आहे. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सदस्यांनी सातत्याने सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणून नियमांचं उल्लंघन केल्यावरून, या सदस्यांची विशेष चौकशी करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.

****

सागर परिक्रमेचा आज ससून डॉक इथं समारोप होणार आहे. या परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यात काल पालघरमधल्या सातपाटी इथं केंद्रीय मत्स्योत्पादन मंत्री परषोत्तम रुपाला यांनी सुमारे एक हजार मच्छिमारांशी संवाद साधला.

****

इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण तर एका कांस्यपदकाची कमाई केली. रूद्रांश पाटील आणि नर्मदा राजी या भारतीय जोडीनं १० मीटर एअर रायफल मिश्र संघ प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर वरूण तोमर आणि रिदम संगवान या दुसऱ्या भारतीय जोडीनं १० मीटर एअर पिस्टल मिश्र संघ प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. वरूण तोमरनं पुरूषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.

****

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त काल राज्यभरात जवाब दो आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं पैठण गेट परिसरात झालेल्या आंदोलनात तीनशे हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

****

No comments:

Post a Comment