आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ फेब्रुवारी २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
साडेतीन मुहूर्तातील
एक मुहूर्त, चैतन्याचा उत्सव, चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज साजरा होत
आहे. शककर्त्या शालिवाहनानं सुरू केलेल्या कालगणनेनुसार वर्ष १९४५ आज सुरू झालं. घरोघरी
गुढ्या उभारुन नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात येत असून, ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात
येत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी गुढीपाडव्यासह, चैत्र शुक्लादी, युगादी, चेटीचंद, नवरेह आणि साजिबू चैराओबा
या सणांच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय नववर्षाच्या प्रारंभाच्या निमित्तानं
साजरे केले जाणारे हे सण म्हणजे विश्वासाचं प्रतीक आणि देशाच्या प्राचीन संस्कृतीचे
वाहक असल्याचं राष्ट्रपतींनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आपल्या शुभेच्छा संदेशात नव्या वर्षात सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी
येवो. समाजात एकतेची भावना वाढीस लागो, असं म्हटलं आहे.
राज्यपाल रमेश
बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर
इथं केंद्रीय सेवा कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या आरोग्य केंद्राचं
उद्धाटन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या
माध्यमातून झालं. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या
नातेवाईकांना सी जी एच एस आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सेवा पुरवत
असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्म सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
सहा पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री सन्मान प्रदान केले जातील. ज्येष्ठ तबलावादक
उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा, उद्योगपती कुमारमंगलम
बिर्ला, साहित्यिक सुधा मूर्ती यांच्यासह विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात
येणार आहेत.
****
जी-20 परिषदेअंतर्गत
असलेल्या सिव्हिल 20 अर्थात सी-20 या कार्यगटाच्या बैठकीचा काल नागपूर इथं समारोप झाला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समारोपाच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मूल्याधारित शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाजाचं मोठं सामर्थ्य
असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment