Saturday, 1 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.04.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत साडे ९१ रुपयांची कपात झाली आहे. दिल्ली आजपासून १९ किलो एलपीजी व्यावसायिक सिलेंडर दोन हजार २८ रुपयांना, तर मुंबईत एक हजार ९८० रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं भारतीय तेल महामंडळानं सांगितलं.

****

भूगर्भ वायू क्षेत्रात एकत्रित समान दर लागू करण्याच्या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ऊर्जा आणि वायू क्षेत्रातली ही लक्षणीय सुधारणा असल्याचं ते म्हणाले. एक राष्ट्र, एक ग्रीड आणि एक दर या पार्श्वभूमीवर भूगर्भ वायू क्षेत्रात एकत्रित समान दर आजपासून लागू झाले.

****

जी-20 पर्यटन कृती गटाची दुसरी बैठक आजपासून सिलीगुडी इथं सुरु होत आहे. ही बैठक भारताच्या ईशान्य भागाच्या संभाव्यता आणि शक्यतांबद्दल संदेश देईल, असं पर्यटन सचिव अरविंद सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, केरळमध्ये कुमारकोम इथं झालेल्या जी-20 शेर्पा बैठकीत सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी, सर्वांना सोबत घेऊन विकास आणि पुनर्प्राप्तीच्या मार्गावर परत जाण्यासाठी वेगवान प्रयत्नांची गरज व्यक्त केली. डिजिटल अर्थव्यवस्था, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, संस्कृती आणि रोजगार यासारख्या शेर्पाच्या विविध कार्यरत गटांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण पंचायत समितीमधल्या ग्रामसेवक सुहासिनी कळसकर यांना २७ हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या शिल्लक देयकाचा धनादेश जारी करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.

****

माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधुनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या मिया ब्लीचफेल्ड्ट हिचा 21-14, 21-17 असा पराभव केला.

****

No comments:

Post a Comment