आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या
५० दिवसांच्या उलटगणतीच्या निमित्तानं आयुष मंत्रालयाच्या वतीनं जयपूर इथं आज योग महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं होतं. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे
राज्यपाल कलराज मिश्र यावेळी उपस्थित होते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी आपल्या
सर्वांना योगाचा अभ्यास नियमित केला पाहिजे, असं सोनोवाल यावेळी म्हणाले.
****
कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुक जवळ आल्यानं प्रचार शिगेला
पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचार दौर्याच्या दुसर्या टप्प्याला
आजपासून सुरुवात करणार आहेत. भाजप नेतेब अमित शहा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील
प्रचार सभा आणि रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
****
जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी
मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन सरकारनं ब्लॉक केले आहेत. दहशतवादी, त्यांचे समर्थक आणि त्यांच्याकरता प्रत्यक्ष काम करणारे हस्तक यांच्याशी संवाद
साधण्यासाठी हे अॅप्स वापरत असल्याचं आढळून आलं आहे.
****
कामगार दिनानिमित्त आयटक प्रणित अंगणवाडी
कर्मचारी संघटनेच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं यशवंतराव चव्हाण सभागृहात मेळावा
घेण्यात आला. या मेळाव्याला राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस विधीज्ञ माधुरी
क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं. या मेळाव्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शहर परिसरातून
मिरवणूक काढली होती.
****
हिंगोली जिल्ह्यात कुरुंदा इथं नदीच्या
पूरनियंत्रणाच्या मागणीसाठी काल बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी पालकमंत्री अब्दुल
सत्तार, खासदार हेमंत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही
या प्रश्नावर चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इजिप्तमधल्या कैरो इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ जागितक
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेराज अहमद खान आणि गनीमत सैंखो या दोघांनी पहिलं
सुवर्ण पदक पटकावलं. या जोडीनं अंतिम फेरीत मेक्सिकोच्या जोडीचा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment