Tuesday, 27 June 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 27.06.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. मध्य प्रदेशात भोपाळ इथल्या राणी कमलापती रेल्वे स्थानकात हा कार्यक्रम होत आहे. यामध्ये मडगाव ते मुंबई; या गोव्यासाठीच्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह, राणी कमलापती स्थानक ते जबलपूर, खजूराहो ते भोपाळमार्गे इंदोर, धारवाड ते बंगळुरू आणि हतिया ते पाटणा या गाड्यांचा समावेश आहे.

या वंदे भारत गाड्या मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, बिहार आणि झारखंडमध्ये दळणवळण सुधारतील, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

हज यात्रेला आजपासून सौदी अरेबियात सुरूवात होत आहे. या यात्रेत भारतातून या वर्षी एक लाख ७५ हजाराहून अधिक यात्रेकरू सहभागी झाले आहेत.

****

दक्षिण काश्मिर खोऱ्यातल्या कुलगाम जिल्ह्यातल्या हावोरा भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक स्थानिक दहशतवादी मारला गेला. मृत दहशतवाद्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या परिसरात लष्कराची शोधमोहिम सुरू आहे.

****

अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कडक धोरण अवलंबलं असून, देशातून अंमली पदार्थ हद्दपार करण्याचा गृह मंत्रालयाचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल जारी केलेल्या संदेशात ते बोलत होते.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ६० हजार स्नातकांना पदवीचं वितरण करण्यात येणार आहे.

****

देशाच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस होत असून, जवळ जवळ ८० टक्के क्षेत्रात मान्सून पोहोचला असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment