आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ डिसेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
संसदेच्या
हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशन येत्या
२२ तारखेपर्यंत चालणार असून, यात १५ सत्र नियोजित तर २१
विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी घेतली जाणार आहेत.
दरम्यान, संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,
सामान्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
मिझोराम
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. विधानसभेच्या एकूण
४० जागांपैकी मिझो नॅशनल फ्रंट सात जागांवर, जोराम पिपल्स
मुव्हमेंट २९ जागांवर, काँग्रेस एक, तर भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे.
****
भारतीय
जनता पक्ष करत असलेल्या सुप्रशासन आणि विकासाच्या राजकारणावर लोकांचा विश्वास
असल्याचं, छत्तीसगड, मध्यप्रदेश
आणि राजस्थानातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून दिसून येतं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या राज्यांमध्ये लोकांनी
दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानत असून लोककल्याणासाठी भाजपा
अविश्रांत काम करत राहील, असं आश्वासन त्यांनी दिलं.
****
ब्राह्मण
समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं, यासह अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी जालना
इथल्या गांधीचमन चौकात सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा काल पाचवा दिवस होता. या उपोषण आंदोलनास पाठिंबा म्हणून काल ब्राह्मण समाजाच्यावतीने काल लाक्षणिक
उपोषण करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज, नारायणपूर आणि जोगेश्वरी परिसरात महावितरणने
राबवलेल्या धडक मोहिमेत ६७ नागरिक घरगुती वापरासाठी लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून
वीजचोरी करताना आढळले. या सर्वांनी सुमारे साडे बारा लाख रुपयांहून अधिक रकमेची वीज
चोरी केल्याचं समोर आलं असून, त्यांच्यावर छावणी पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
३७
व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धांना काल नाशिकमध्ये सुरवात झाली. मंत्री
छगन भुजबळ यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. सात डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या
या स्पर्धेत २८ राज्यांतल्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
****
No comments:
Post a Comment