Wednesday, 3 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:03.07.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 July 2024

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब, विकसित भारत संकल्पपूर्तीसाठी सरकार वचनबद्ध - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधानांचं उत्तर

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

·      विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवारांचे अर्ज दाखल

·      उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये सत्तसंगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू

आणि

·      ज्ञानोबा - तुकोबांच्या पालख्यांचं आज सासवड आणि लोणी काळभोरहून पंढरपूरकडे प्रस्थान

****

लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल सायंकाळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर झाल्यानंतर ही घोषणा केली.

दरम्यान, या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उत्तर दिलं. विरोधी पक्षांकडून संसदेत केली जात असलेली निराधार आणि खोटी विधानं, दुर्लक्ष करण्यासारखी नसल्यानं, त्याविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. ेल्या दहा वर्षांच्या आपल्या कार्यकाळावरचा विश्वास म्हणूनच जनतेनं, राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएा तिसऱ्या वेळेस स्थैर्य आणि निरंतरता यासाठी बहुमत दिल्याचं सांगत, िकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.

दरम्यान, पंतप्रधानांच्या या भाषणादरम्यान विरोधकांनी सातत्यानं घोषणाबाजी सुरू ठेवली होती. या गदारोळाबाबत विरोधी पक्षांच्या निंदेचा प्रस्ताव, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल लोकसभेसमोर मांडला, सदनानं तो आवाजी मतदानानं मंजूर केला.

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान आज उत्तर देणार आहेत.

****

राज्याच्या विधानसभेतही राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उत्तर दिलं. राज्यात आगामी काळात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी विविध उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात वॉटर ग्रीड प्रकल्प तसंच समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी या भाषणात उल्लेख केला

“मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व आठ जिल्ह्यातील १२५० गावांना जलजीवन मिशनमध्ये घेतलंय आणि एकोणतीस हजार कोटींच्या कामांना आम्ही तत्वतः मान्यता दिलेली आहे. जे काही वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी या दुष्‍काळी भागाकडे वळवण्याचं काम आपलं सरकार करेल.’’

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी जमिनीची अट काढून टाकली असून, अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच कमाल वयोमर्यादाही ६० वर्षांवरून ६५ वर्ष करण्यात आली आहे. याशिवाय अधिवास प्रमाणपत्रासह इतरही काही अटी शिथील करण्यात आल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निवेदनामार्फत सांगितलं.

दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलांना लगेच मदतीची रक्कम जमा केली जाईल, तसंच उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी सरकारी अधिकारी - कर्मचारी पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार करावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात वरूड इथं तुळशीराम कंठाळे या तलाठ्याला अशाच प्रकरणात निलंबित करण्यात आल्याची माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

****

विधान परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा ठराव, काल विधान परिषदेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला. यासंदर्भात विरोधकांची बाजू ऐकून घेण्यात यावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा ठरावांवर कधीही चर्चा होत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

दरम्यान, हा निर्णय एकांगी आणि अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया, अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना, दानवे यांच्या कथित अवमानकारक वक्तव्याबद्दल आपण माफी मागत असल्याचं सांगितलं. मात्र दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता, सदनानं असा ठराव संमत करणं, हे लोकशाहीला घातक असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.

****

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी १४ उमेदवारांनी काल २४ अर्ज दाखल केले. भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर तसंच अमित गोरखे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी, शिवसेनेचे माजी खासदार कृपाल तुमाणे आणि भावना गवळी यांनी, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या अर्जांची छाननी आज होणार असून, परवा शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १२ जुलै रोजी आवश्यकतेनुसार मतदान तसंच मतमोजणी होणार आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी, टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा एक जुलै ते १३ जुलै दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, असं आयोगानं कळवलं आहे.

****

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. यामध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. सत्संगला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं, वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंग यांनी सांगितलं. या घटनेमागच्या कारणांचा तपास करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

****

छत्तीसगढमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. महाराष्ट्राच्या सीमेवर कोहका मेटाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. सुकमा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून नऊ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली, तर, एक महिलेसह दोन नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज सासवड तसंच लोणी काळभोर इथून मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने काल दिवे घाटाचं अवघड वळण पार केलं.

संत गजानन महाराजांची पालखीही आज अंबाजोगाईतला मुक्काम आटोपून पंढररपूरकडे प्रस्थान करेल. काल पालखीचं परळीहून अंबाजोगाईत आगमन झालं तेव्हा, माजी नगराध्यक्ष तथा श्री योगेश्वरी देवल कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी या पालखीचं स्वागत केलं.

पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल राक्षसभूवन इथं मुक्कामी होती.

****

सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे, यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

नीट'पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले लातूर इथले आरोपी जलील खान पठाण आणि संजय जाधव या दोघांना सहा जुलै पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने, त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

****

आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात निती आयोगाने घालून दिलेले आरोग्य, शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा, यासारखे निर्देशांक सुधारण्याकरता उद्या चार जुलै पासून ३० सप्टेंबर पर्यंत संपूर्णता अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत ग्रामसभा, प्रभात फेरी, बचत गटांच्या वस्तुंची विक्री आणि प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

****

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केलं आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती देण्याकरता जिल्हास्तरावर मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लाभार्थी महिलांनी मध्यस्थापासून सावध राहून अशा व्यक्तींची माहिती जिल्हास्तरीय मदत कक्षाला द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

****

स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशन वाढ तसंच विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि परवानाधारक महासंघाच्या वतीनं, काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. विविध १४ मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं.

****

ग्रामीण भागात पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांबाबत अतिसार थांबवा या अभियानांतर्गत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. या अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.

****

No comments:

Post a Comment