Wednesday, 3 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 03.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. १८ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अलिगढमध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज हाथरसला भेट देणार आहेत.

****

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरची चर्चा आज सुरु राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तकहूब झालं.

****

जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरळीत सुरु आहे. आज पहाटे पाच हजार ७२५ भाविकांची तुडकी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ झाली.

****

भारतीय रेल्वेनं यावर्षीच्या जून महिन्यात मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ११ टक्क्यांनी अधिक आहे.

****

येत्या वर्षाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बट घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलनं नोंदणी सुरु केली आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट ही आहे.

****

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकॉकहून मुंबईला आला होता. त्याच्याकडे पाच कोटी रुपये किंमतीचे गांजासदृश अंमली पदार्थ सापडले.

****

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर झाला. गाडीचं टायर फुटल्यामुळे गाडी रस्त्यावर घासत जाऊन सिमेंटच्या खांबाला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला.

****

आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असून, २८ जिल्ह्यातल्या ११ लाखाहून अधिक नागरीकांना पुराचा फटका बसला आहे. पावसाशी निगडीत विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.

****

नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून, येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment