Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 October
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू काश्मीरमध्ये
विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या ४० जागांसाठी आज मतदान होत आहे. ३९
लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचं भवितव्य निश्चित करणार आहेत. राज्यात तिन्ही टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी येत्या आठ तारखेला होणार आहे.
****
मरणासन्न रुग्णांची जीवन आधार प्रणाली काढून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचनांचा आराखडा आराखडा आरोग्य मंत्रालयानं तयार केला आहे. या मसुद्यावर नागरीकांची मतं मागवण्यात येत आहेत. जे रुग्ण उपचारांनी बरे होण्याची कोणतीही शक्यता नाही आणि नजिकच्या भविष्यात ज्यांचा मृत्यू अटळ आहे असे रुग्ण, तसंच ज्यांनी ७२ तास उपचारांना प्रतिसाद दिलेला नाही, अशा मेंदूला दुखापत झालेल्या रुग्णांचाही समावेश या यादीत केला आहे. डॉक्टरांनी यासंदर्भात अनेक बाबींचा विचार करुन निर्णय घ्यावा, असं यामध्ये नमूद आहे. या मसुद्यात वैद्यकीय, तात्विक आणि कायदेशीर अशा सर्व बाबींचा विचार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
भारतीय पोलीस दलातल्या
वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित
असेल तरच आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण
केल्यानेच प्रगतीला अर्थ प्राप्त होतो, असंही राष्ट्रपती यावेळी
म्हणाल्या.
****
क्रूझ भारत अभियानाद्वारे
येत्या पाच वर्षांत क्रूझवरून पर्यटन करणाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय
असल्याची माहिती, केंद्रीय नौकानयन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. मुंबई इथं
या अभियानाची काल सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. आज पासूण ते ३१ मार्च २०२९ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबवलं
जाईल.
****
झारखंडचे राज्यपाल संतोष
कुमार गंगवार आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल
रांची इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या अकरा हजार अंगणवाडी
केंद्रांचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर पोषण माह उपक्रमाचा देखील यावेळी समारोप झाला. ॲनिमिया
आजाराबद्दल जागरूकता, पोषण भी, पढाई भी, तसंच
तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करणं, हा पोषण माह चा उद्देश असल्याचं,
अन्नपूर्णा देवी यावेळी म्हणाल्या.
****
राज्यपाल सी. पी.
राधाकृष्णन यांनी काल गोंदिया इथं विविध क्षेत्रातल्या शिष्टमंडळांची भेट घेतली
आणि त्यांची विविध विषयांवरील मतं जाणून घेतली. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक
संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, कला, सामाजिक, आदिवासी, कृषी, औद्योगिक
आदी क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश होता. आदिवासी
क्षेत्रामध्ये उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ
लाभार्थ्यांपर्यत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचला पाहिजे यासाठी राज्यपालांनी
अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
****
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ
उपसमितीची बैठक काल मुंबईत समितीचे अध्यक्ष उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे
समितीच्या दुसर्या आणि तिसर्या अहवालात कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातले सोपे
नियम सुचवण्यात आले असून, पुराव्यांची संख्या ४२ करण्यात आली आहे. मराठा
समाजातल्या नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे आपली मराठा कुणबी
नोंद मिळण्याबाबत पडताळणी करणं शक्य असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा
निवडणुकीच्या अंनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जिल्हा आणि विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनर
तसंच नोडल अधिकार्यांच्या एकदिवसीय प्रशिक्षण काल घेण्यात आलं. विभागीय आयुक्त दिलीप
गावडे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन झालं. निवडणूक विषयक कामकाज सांभाळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम
करण्याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना गावडे यांनी केली.
****
नांदेड जिल्ह्यात नेरली ग्रामपंचायतीत दूषित पाण्यामुळे झालेल्या घटनेसंदर्भात जिल्हा
परिषदेनं हलगर्जीपणाचा ठपका ठेऊन, ग्रामपंचायत अधिकारी आर एस हटकर निलंबित केलं आहे. हटकर हे नेरली इथं कार्यरत
असताना त्यांनी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी टीसीएल
पावडरचा नियमितपणे वापर केल्याचे अभिलेखे आढळून आले नाही, तसंच नळ
योजनेच्या पाण्याची टाकी वेळोवेळी स्वच्छ न कल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन
योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या ८०० यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत 'भारत गौरव
पर्यटन रेल्वे' अयोध्येकडे काल रवाना झाली. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते फीत कापून
उद्घाटन केल्यानंतर यात्रेकरूंचा रेल्वे बोगीत प्रवेश झाला. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी
मार्गे अयोध्येकडे जाणार आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
कुडाळ इथं झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटातून
मुंबईच्या संजय मांडले यानं विजेतेपद पटकावलं. त्याने ठाण्याच्या जाहिद एहमद
फारुकी याचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. तर महिला गटातून मुंबईच्या काजल
कुमारी हिने ठाण्याच्या मधुरा देवळे हीचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत
पुरुष गटात १४८ तर महिला गटातून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment