Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 July 2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ जूलै २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
त्रिनिनाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास
साहसपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज
सकाळी त्रिनिनाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला. तुमचे पूर्वज केवळ
प्रवासी नव्हते तर ते एका शाश्वत संस्कृतीचे संदेशवाहक असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. त्रिनिनाद इथले भारतीय वंशाचे नागरिक आता ओवरसीज सिटीजन ऑफ इंडीया कार्ड
साठी पात्र होतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या कार्डमुळे येथील भारतीय
वंशाच्या नागरिकांना भारतात राहण्यास आणि काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्यातील दुसऱ्या
टप्प्यात रात्री त्रिनिदाद आणि टोबॅगोची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन इथं पोहोचले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या
पुण्यतिथीनिमित्त त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. समाजासाठी स्वामी विवेकानंद
यांचे विचार आणि दृष्टीकोन आजही मार्गदर्शक असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील
संदेशात म्हटलं म्हटलं आहे. स्वामी विवेकानंदांनी देशाचा इतिहास आणि सांस्कृतिक
परंपरेप्रती अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागृत केली. ते सेवा आणि करुणेच्या
मार्गावर चालत असल्याचं पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर असून काल
रात्री त्यांचं पुण्यात आगमन झालं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात
त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं
अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शहा एनडीएतील छात्र आणि सैन्य
अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरातील जयराज क्रीडा
संकुलाचं उद्घाटन; तसंच बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी
देखील अमित शहा करणार आहेत. त्यानंतर वडाची वाडी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या
पीएचआरसी हेल्थ सीटीचं भूमिपूजनही अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
****
भारतीय टपाल सेवा आता पारंपरिक टपाल वितरणाच्या खूप पुढे
गेली असून देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक नेटवर्क चालवते. केंद्रीय संचारमंत्री
ज्योतिरादित्य सिंदीया यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना ही माहीती दिली.
देशभरात एक कोटी चौसष्ट लाखांहून अधिक सेवा केंद्रं आहेत. टपाल खात्यानं
पहिल्यांदाच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नियुक्त केले आहेत आणि पोस्टमन आता आधुनिक
उपकरणांनी सुसज्ज आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची योग्य वेळी डिजिटल ट्रॅकिंग
करणं शक्य झालं आहे. पोस्ट लवकरच डिजीपिन ही एक जिओ-कोडेड अॅड्रेस सिस्टम सुरू
करणार आहे. यामुळं अतिदुर्गम भागातही टपाल सेवा अचूकपणे पोहोचवण्यास सक्षम करेल, असं सिंदीया म्हणाले.
****
महात्मा फुले नविकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी
मर्यादित,
अर्थात महाप्रित या उपकंपनीनं भविष्यातील आव्हानांचा विचार
करून दीर्घकाळ टिकणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल त्यांनी यासंदर्भात
विधानभवनात आढा बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक
न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरी मिसाळ
यांची बैठकीला उपस्थिती होती. झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प वेगात पूर्ण करावेत.
सर्वच क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबवण्याऐवजी विशिष्ट क्षेत्रात तज्ज्ञता मिळवून
त्या ठराविक क्षेत्रातच काम करावे, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
शेतकरी, शेतमजूर दिव्यांग, मच्छिमार आणि मेंढपाळांच्या समस्यासंदर्भात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. विधानभवनात चंद्रशेखर बावनकुळे
यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केलेल्या विविध
विषयांवर बैठक झाली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बार्टीनं अनुसूचित जातीच्या युपीएससी
आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या
माध्यमातून २०२४ - २५ या वर्षात होणाऱ्या
विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिलं
जाणार आहे. अधिक माहिती बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन संस्थेकडून
करण्यात आलं आहे.
****
वाशीम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर काल नागपूर
कॉरिडॉर वर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या अपघातात ४ जण ठार तर १ जण
जखमी झाला. या अपघाता तिघंजण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अपघातग्रस्त वाहन नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथले आहे.
****
क्रोएशियात सुरु असलेल्या ग्रँड चेस टूर स्पर्धेत जागतिक
विजेता डी. गुकेशनं अव्वल मानांकन असलेल्या मॅग्नस कार्लसनचा सहाव्या फेरीत पराभव
केला..
****
No comments:
Post a Comment