Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
August 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ ऑगस्ट २०२५ दुपारी १.०० वा.
****
१३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाला विरोधी पक्ष करत असलेला विरोध
हा लोकशाही विरुद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका वृत्त
संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आगामी काळात हे विधेयक
पारित होईल,
असा विश्वास व्यक्त केला. या विधेयकासंदर्भात विरोधक जनतेत संभ्रम
निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी
केला. जनतेचं सरकार कारागृहातून चालवलं जावं का, असा
सवाल करत शहा यांनी या विधेयक दुरुस्तीचं महत्व अधोरेखित केलं.
विरोधी पक्षातले अनेक जण तुरुंगात बसून सरकार बनवण्याचा आणि
चालवण्याचा प्रयत्न करतात असं ते म्हणाले. हे विधेयक कोणताही पक्ष भेदभाव करत नाहीत, मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचे असोत, ते जर या शिक्षेच्या
कक्षेत येत असतील, तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. जर एखादा लोकप्रतिनिधी दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ
तुरुंगात असेल,
तर त्याचं संसद सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद सध्याच्या कायद्यात
असल्याचं शहा यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
****
भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयानं विकसित केलेल्या “मेरी पंचायत” मोबाईल
अॅप्लिकेशनला,
जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं. ही कामगिरी भारताच्या डिजिटल आणि समावेशक ग्रामीण विकास मॉडेलची जागतिक मान्यता
आहे. दोन लाख ६५ हजार ग्रामपंचायती आणि ९५ कोटी ग्रामीण नागरिकांना या ॲपचा फायदा होतो.
२५ लाखांहून अधिक प्रतिनिधींसाठी हे एक सक्षम व्यासपीठ असून, या ॲपवर ग्रामपंचायत स्तरावर बजेट, योजना, पायाभूत सुविधा, सेवांची माहिती आणि हवामान अंदाज आदींबाबत
माहिती मिळते. १२ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, अहमदाबाद इथं पाच हजार ४०० कोटी
रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. अहमदाबाद
आणि गांधीनगर मधल्या दोन हजार ५०० कोटी रुपयांचे शहर विकास प्रकल्प, अकराशे कोटी रुपयांचे ऊर्जा प्रकल्प, ६५ किलोमीटर लांबीच्या
मेहसाणा - पालनपूर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण, कलोल
- काडी - काटोसन रोड आणि बेचराजी - रानुज रेल्वे मार्गांचं गेज रुपांतरण आदी प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी येत्या ३१ तारखेला
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा १२५वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी
नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, नमो ॲप किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन उद्या मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. फडणवीस हे हुजूर साहिब नांदेड इथून या रेल्वेगाडीला
हिरवा झेंडा दाखवतील. नांदेड ते मुंबई दरम्यानचं ६१० किलोमीटरचं अंतर ही गाडी साडे
नऊ तासांत पूर्ण करेल.
****
भारतीय जनता पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदी आमदार अमित
साटम यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजप
कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष
रविंद्र चव्हाण,
मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
****
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री
संजय शिरसाट यांनी भूखंड प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी केला आहे.
ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी
शिरसाट यांच्यावर कारवाई करुन, त्यांना मंत्रीपदावरुन हटवण्याची
मागणी रोहीत पवार यांनी केली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील
यांच्या नेतृत्वात मोर्चा परवा २७ तारखेला मुंबईकडे निघणार आहे. हा मोर्चा जालना जिल्ह्यातल्या
आंतरवाली सराटी इथून निघून शहागड, तुळजापूर, पैठण,
शेवगावमार्गे पुढे जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
काही मार्गांवरच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, बिडकीन,
पैठण मार्गे शेवगावकडे जाणारा आणि येणारा मार्ग, तसं शहागड,
नवगाव नार्गे पैठणकडे जाणारा आणि येणारा मार्ग २८ तारखेला संध्याकाळपर्यंत बंद राहणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment