Sunday, 7 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

भारत -अमेरिकेदरम्यान अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर मोदी यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमांवर या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी अतिशय संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं. उभय देशातले संबंध विशेष असून त्याबाबत चिंता करण्यासारखं काही नाही, असं ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. नरेंद्र मोदी हे एक श्रेष्ठ पंतप्रधान असून ते आपले कायमच चांगले मित्र राहतील, असंही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रांसचे  राष्ट्रपति इमॅनुएल मॅक्रॉन यांच्यासोबत  रशिया-यूक्रेन संघर्ष तत्काल समाप्त होण्याच्या प्रयत्नांसाठी भारताचं असलेलं समर्थन तसंच विविध आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर काल विचार विनिमय केला .

दुरध्वनीवरील संभाषणाद्वारे उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

****

वस्तू  आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांमुळे सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास चालना मिळणार असणार असून उत्पादन वाढीसह त्यांच्या मागणीतही वाढ होण्यासोबतच सहकारी संस्थांच्या त्‍पन्‍ना वाढ होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सुमारे जवळपास दहा कोटी दुग्ध उत्पादक कुटुंबियांना याद्वारे लाभ मिळणार आहे असही मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. दुग्धोत्पादनांवरील जी.एस.टी अठरावरुन पाच टक्के करण्यात आल्यानं ग्रामिण स्तरावरील उद्योजकता-महिलांचा सहभाग असलेल्या स्वयंसहायता गटांची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे

****

 

वस्तु आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी  केलं आहे. भोपाळ इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी या बदलांचा विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा वाढेल, असंही ते म्हणाले.

****

भारतीय जनता पक्षाची नवी दिल्लीमध्ये संसद परिसरात संसद सदस्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळा आज सुरू होत आहे. उप राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाची ठिकठिकाणी भक्तीभाव आणि उत्साहात काल सांगता झाली. गणेशमुर्तींचं अनंत चतुर्दीशीच्या मुहुर्तावर थाटामाटात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. राज्य शासनानं यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्रदान केला. राज्यासह देश-विदेशात गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा  झाला. मुंबईतील विख्यात लालबागचा राजाच्या गणेश मुर्तीचं आज सकाळी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीची काल महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. महानगरपालिकेने शहरात २१ ठिकाणी विसर्जन विहिरींची तसंच कृत्रीम तलावांची व्यवस्था केली तर ४१ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रं उभारली होती. शहरातील छावणी भागामध्ये परंपरेनुसार आज गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात ये आहे.

****

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातली आवक वाढली असून, सध्या धरणात १७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे काल रात्री धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, १८ दरवाजातून १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत होता. आवक लक्षात घेता विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं नदीकाठावरच्या गावातल्या नागरीकांना सावध राहण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. 

विभागात येलदरी धरणातून सुमारे सात हजार, इसापूर धरणातून सुमारे साडे आठ हजार माजलगाव प्रकल्पातून सुमारे दोन हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग होत होता.

****

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह राज्यात आज कोकण तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

****

आशिया करंडक पुरूष हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरियादरम्यान होणार आहे. बिहारच्या राजगिर इथं सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होईल. काल भारतानं सुपर फोरच्या सामन्यात चीनवर सात - शून्य असा दणदणीत विजय मिळवत पदकतालिकेत पहिला क्रमांक मिळवला.

दरम्यान, चीन मध्ये सुरु असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत-जपान सामना दोन-दोन असा अनिर्णित राहिला. भारतीय संघाचा उद्या सिंगापूरसोबत सामना होणार आहे.

****

इग्लंडच्या लिवर पूल इथं सुरू जागतिक मुष्टीयुद्ध विजेतपद स्पर्धेत भारताच्या  निखत ज़रीन हिनं महिलांच्या ५१ किलो वजनी गटात दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. आता उप-उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जापानच्या युना निशिनाका हीच्यासोबत होणार आहे.

***

No comments:

Post a Comment