Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 20 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
जीएसटी सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज
केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून व्यक्त
·
पंतप्रधानांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्राची
भूमिका महत्त्वाची-मुख्यमंत्र्यांना विश्वास
·
लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यात
ई-केवायसी करण्याचं आवाहन
·
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आज २८ वा
दीक्षान्त समारंभ
·
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ओमानवर २१ धावांनी
विजय
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात आजही पावसाचा यलो अलर्ट
****
कृषी उपकरणांवरील
वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, असं केंद्रीय
कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत कृषी उपकरणांसंबंधी
एका बैठकीत बोलतांना ते म्हणाले...
बाईट
- केंद्रीय कृषी मंत्री
शिवराज सिंह चौहान
दरम्यान, जीएसटी कररचनेतले
हे सुधारित दर सोमवारपासून लागू होतील.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत स्टील महाकुंभाचं उदघाटन
केल्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, नवीन उद्योग
उभारणीसाठीचे परवाने कमी करून वेळेची बचत करावी, असे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी दिले, काल मुंबईत याबाबत घेतलेल्या बैठकीत बोलतांना,
जलद आणि सुलभ परवाने देणारं उत्कृष्ट उदाहरण देशासमोर ठेवण्याचं आवाहन
त्यांनी संबंधित विभागाला केलं.
****
गेल्या
११ वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आरोग्य
व्यवस्थेत मोठा बदल झाला आहे. २०१८ मध्ये सरकारनं जगातला सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम,
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात पीएम-जेएवाय ही योजना
सुरू करण्यात आली. ही योजना प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपये आरोग्य विमा कवच पुरवते.
देशातील ५५ कोटींहून नागरिकांना याचा लाभ होत आहे. या योजनेबाबतचा हा वृत्तांत:
‘‘गेल्या वर्षी
२९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान वय वंदना
योजनेच्या कक्षेत ७० वर्षांवरील नागरिकांना
समाविष्ट करण्यासाठी एबी-पीएमजेएवायचा विस्तार करण्याची घोषणा केली.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
या योजनेच्या नोंदणीसाठी
फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. ७०
वर्षांवरील नागरिकांसाठी यातून सहज आणि
सुलभरित्या आरोग्यसेवा सुनिश्चित केली
जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकारनं सर्वसमावेशक
आरोग्यसेवेचं जाळं तयार करण्यासाठी सबका
साथ, सबका विकास, सबका
विश्वास, सबका प्रयास या तत्त्वाची
यशस्वीरित्या अंमलबजावणी केली आहे.’’
****
चंद्रपूर
जिल्ह्यातल्या राजूरा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकूण सात
हजार ५९२ नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज आले होते. तपासणीअंती यापैकी सहा हजार ८६१ अर्ज
अवैध ठरले. या अर्जांची नोंदणी रोखण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रकिया सुलभपणे पुर्ण
करण्यासाठी ई-केवायसी सुविधा देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांनी दोन महिन्यात ही प्रक्रिया
पूर्ण करावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. ladakibahin.maharashtra.gov.in
या पोर्टलवर ही प्रक्रिया करता येणार आहे.
****
राज्यातले
जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या
दिव्यांगत्व प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. तपासणीत बनावट आणि नियमबाह्य प्रमाणपत्र
घेतलेल्यांना किंवा ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
केली जाणार आहे.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ आज होणार आहे.
या समारंभात १९ हजार ४०० विद्यार्थ्यांना पदवी तसंच पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार
आहे. विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास कुलगुरुंच्या सुवर्णपदकाने
सन्मानित केलं जातं. यावर्षी हा बहुमान परभणीच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम कॉलेज ऑफ एज्युकेशनची
विद्यार्थिनी सईदा तयबाने पटकावला आहे.
****
नाशिकच्या
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानचिन्ह
आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या बुधवारी २४ सप्टेंबरला हा पुरस्कार
प्रदान करण्यात येणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची विभागीय
बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत
अधिक माहिती दिली...
बाईट
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
****
केंद्र
शासनाने गेल्या दशकभराच्या काळात शेती तसंच शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या.
या सर्व योजनांमुळे शेतकरी आणि पर्यायाने गावं समृद्ध झाल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले
प्रगतीशील शेतकरी दीपक जोशी यांनी म्हटलं आहे. सेवा पर्वानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या
मुलाखतीत जोशी बोलत होते...
बाईट
- दीपक जोशी
जोशी यांची
ही सविस्तर मुलाखत, आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी विशेष प्रासंगिकच्या तिसऱ्या भागात
आपण ऐकू शकाल.
****
नवरात्रोत्सवाला
परवापासून प्रारंभ होत आहे. तुळजापूर इथं तुळजाभवानी संस्थानच्या वतीनं या काळात नऊ
दिवस - नऊ महिलांचा सन्मान केला जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
बीड इथं
येत्या २८ सप्टेंबरला ओबीसी समाजाचा भव्य महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, केज तहसील
कार्यालयावर काल लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. ओबीसींचा हक्क
हिरावून घेण्याचा प्रयत्न, खपवून घेणार नाही, असा इशारा हाके यांनी दिला.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं काल बंजारा समाजाने एस टी प्रवर्गाच्या मागणीसाठी मोर्चा
काढला.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधीत गावांना रस्ते आणि अन्य सुविधा त्वरीत उपलब्ध
करुन द्यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. पैठण तालुक्यातील
अतिवृष्टीग्रस्त भागातील समस्यांबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात
अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी
केली आहे. काल नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
लातूर जिल्ह्यातील
पूरग्रस्त भागांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी काल पाहणी केली जिल्ह्यात
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
****
नांदेड
जिल्ह्यातील भोकर तालुक्यातल्या पांडुरणा या गावात काल भूगर्भातून गुढ आवाज आले मात्र, राष्ट्रीय
भूकंप विज्ञान केंद्राच्या यंत्रावर याची नोंद झाली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास
ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.
****
आशिया करंडक
क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने ओमानचा २१ धावांनी पराभव
केला. प्रथम फलंदाजी करत भारताने १८८ धावा केल्या, मात्र ओमानचा संघ
२० षटकात ४ बाद १६७ धावाच करु शकला.
दरम्यान
महिला क्रिकेटमध्ये नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत काल भारताने
ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. स्पर्धेतला तिसरा आणि अंतिम
सामना आज नवी दिल्लीत होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे छत्रपती
संभाजीनगरात सखल भागात पाणी साचलं तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला.
****
हवामान
राज्यात
आज कोकण तसंच विदर्भातले काही जिल्हे वगळता सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला
आहे. मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment