Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
जागतिक
सागरी व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक-मुंबईत इंडिया
मेरीटाईम वीक परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
छत्रपती
संभाजीनगराचा इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकास-नीति आयोगाच्या
परिषदेत मुख्यमंत्र्यांची माहिती
·
खरीप
हंगामात सोयाबीन, उडीद
मूग खरेदीसाठी नोंदणी सुरू-१५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी
·
राज्य
परिवहन महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपये उत्पन्न
आणि
·
भारत-ऑस्ट्रेलिया
दरम्यान पहिला टी-ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द
****
जागतिक सागरी
व्यापारासाठी भारतीय बंदरं अधिक कार्यक्षम आणि आकर्षक झाल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक २०२५
मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित करत होते. कालबाह्य सागरी व्यापारी कायदे
रद्दबातल करून, २१
व्या शतकाशी सुसंगत कायद्यांची निर्मिती केल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते
म्हणाले –
बाईट
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
जेएनपीटी बद्दल
बोलतांना पंतप्रधानांनी हे बंदर देशातलं सर्वात मोठं कंटेनर पोर्ट झाल्याचं नमूद
केलं. बंदरांच्या पायाभूत सुविधा बांधणीत सर्वात मोठ्या थेट परकीय गुंतवणुकीमुळे
हे शक्य झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी आज अंबाला इथल्या हवाईदल तळावरुन राफेल लढाऊ विमानातून
उड्डाण केलं. त्यांनी सुमारे २५ मिनिटं प्रवास केला. यापूर्वी एप्रिल २०२३मध्ये
आसाममधल्या तेजपूर हवाई दल तळावरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातूनही
राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलं होतं.
****
महाराष्ट्र
देशाचं डेटा सेंटर हब झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज
पुण्यात नीती आयोगाच्या परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबई डेटा सेंटर कॅपिटल ठरलं
आहे. याच ठिकाणी आपण इनोव्हेशन सेंटरची उभारणी करत आहोत,
यासाठी जागतिक कंपन्यांनी रुची
दाखवली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई आणि पुणे उद्योगक्षेत्रावरील
ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांचं हब म्हणून विकसित
करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जगातली पहिली
औद्योगिक उत्पादन संस्था महाराष्ट्रात उभारण्याचा नीती आयोगाचा मानस असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली.
****
यंदाच्या खरीप
हंगामात सोयाबीन, उडीद
आणि मूग खरेदीसाठी आजपासून नोंदणी सुरू झाली असून १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष
खरेदीला सुरुवात होणार आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत पत्रकार
परिषदेत ही माहिती दिली. सोयाबीन, मूग, उडीद
खरेदीसाठी ॲप आणि पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. खरेदी केंद्रांवरील गर्दी
टाळण्यासाठी अॅपवर तारीख आणि वेळ नमूद करण्याची सोय आहे. त्यामुळे नोंद केलेल्या
वेळेला शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्रावर नेण्याचं आवाहनही मंत्री रावल यांनी
केलं.
पणन
महामंडळाकडून बारदाना खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून यंदा बारदाना
तुटवडा भासणार नाही यासाठी आम्ही दक्ष असल्याचही रावल यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन
महामंडळाला यंदाच्या दिवाळीत ३०१ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. गेल्या
वर्षीच्या दिवाळी हंगामातल्या उत्पन्नापेक्षा ते ३७ कोटी रुपयांनी जास्त आहे.
दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न
मिळालं असून यंदाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक उत्पन्न आहे. सर्वाधिक उत्पन्न पुणे
विभागाला मिळालं असून त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक विभागाचा क्रमांक लागतो.
****
लोहपुरुष सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर तसंच ७ नोव्हेंबर रोजी
भव्य पदयात्रेसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी या उपक्रमांची माहिती देत, जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी,
युवक आणि नागरिकांनी मोठ्या
संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट
– राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी
****
छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्ते अधिक मजबूत,
सुरक्षित आणि सुगम करण्यासाठी
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती
आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली आहे. यामुळं गावांमध्ये वाहतुकीची सुविधा सुधारुन
शेतीमाल वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांना दळणवळणाचा मोठा दिलासा मिळेल असं आमदार
चव्हाण यांनी सांगितल्याचं या बाबतच्या बातमित म्हटलं आहे.
****
आरक्षणासंदर्भात
विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने आज नांदेड इथं जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या
मोर्चाला संबोधित केलं, ओबीसी
नेते लक्ष्मण हाके तसंच नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात
सहभागी झाले होते.
****
फलटण इथल्या
डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार संदीप
क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ही
घटना अत्यंत दुर्दैवी असून याची
उच्चस्तरीय चौकशी करून मुंडे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी क्षीरसागर यांनी
केली.
****
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेलं मोंथा चक्रीवादळाचा जोर कमी झाला असून ते वायव्येच्या
दिशेनं पुढं सरकत आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे. मात्र या वादळामुळे
मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगर,
लातूर,
नांदेड,
परभणी,
हिंगोली,
बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांमधे पावसाने हजेरी लावली.
यामुळे नदी, नाले,
ओढ्यांना पूर आला आहे.
लातूर
जिल्ह्यात अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे, शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं सोयाबीन या पुरात वाहून गेल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान बीड
जिल्हातील माजलगाव धरणात पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी
विसर्ग वाढवून तो चार हजार ४२६ घनफूट प्रतिसेकंद करण्यात आला आहे. जायकवाडी
धरणाच्याही १८ दरवाजातून सुमारे ३८ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
सिंधफणा आणि
गोदावरी नदी काठावरील बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी आणि सतर्क
राहण्याचं आवाहन धरण प्रशासनानं केलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला आजपासून सुरूवात झाली. मात्र कॅनबेरा इथल्या ओव्हल मैदानावर झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या नऊ षटकं आणि चार चेंडुत एक बाद ९७ धावा झाल्या असताना पावसाला सुरूवात झाली अन् सामना रद्द करावा लागला. मालिकेतला दुसरा सामना परवा मेलबोर्न इथं खेळवला जाणार आहे.
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात उपांत्य फेरीचा पहिला सामना सुरू आहे. उद्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार आहे.
****
No comments:
Post a Comment