Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ११ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो
स्टेशनजवळ काल काल स्फोट
झाल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा आज
एक उच्चस्तरीय बैठक
घेणार आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर देशभरातून तसंच अनेक देशांकडून शोक व्यक्त करण्यात आला. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी मृतांच्या
कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, जखमींना लवकरात लवकर प्रकृतीसाठी सदिच्छा दिल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही घटना वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी असल्याचं म्हटलं आहे. तसंच केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव यांच्यासह इतर
मंत्र्यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. विरोधी पक्ष नेते राहुल
गांधी,
शरद पवार आणि अन्य नेत्यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख
व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्ली
स्फोटानंतर मालदिवचे राष्ट्राध्यक्ष आणि जपान, ब्रिटन, मोरोक्को,
अर्जेंटिना, इराण, श्रीलंका आणि बांगलादेशच्या राजदूतांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या
टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे.
सकाळी नऊ वाजेपर्यंत १४
पूर्णांक ५५ टक्के मतदानाची
नोंद झाली. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होत असून, एक
हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही
टप्प्याची मतमोजणी येत्या
१४ तारखेला होणार
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भूतानमध्ये
दाखल झाले. या दौऱ्यामुळे भारत-भूतान संबंधांना नवी ऊर्जा मिळेल, असं
पंतप्रधानांनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान भूतानचे राजे जीग्मे खेसर नामग्याल वांगचूक आणि
भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांची भेट घेतील. या दौऱ्यात
भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या
एक हजार २०
मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांगचु-दोन जलविद्युत प्रकल्पाचं
उद्घाटनही
पंतप्रधानांच्या हस्ते होणार
आहे.
****
भीमाशंकर, औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर, या राज्यातल्या ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा सर्वसमावेशक
विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
यांनी दिल्या आहेत. मंदिर परिसरात सुरू असलेली कामं वेगानं
पूर्ण करा,
प्रस्तावित कामांचं योग्य नियोजन करा
असं मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातल्या बैठकीत काल सांगितलं.
भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षाप्रणाली कार्यरत करावी आणि भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा
तयार
करण्यासाठी गतीनं कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी
दिल्या.
****
भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्र
सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालय आणि ट्रायफेड यांच्यातर्फे
आयोजित आदि चित्र या प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुंबईत आदिवासी
विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते झालं. या प्रदर्शनात
देशभरातल्या १०० हून अधिक पारंपरिक आदिवासी चित्रांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठातल्या
आदिवासी अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटनही उईके
यांच्या हस्ते काल झालं. यावेळी ‘आदिवासी अस्मिता’ आणि त्यांचं
‘सांस्कृतिक महत्त्व’ या विषयीच्या चर्चासत्राचं
आयोजन करण्यात आलं होतं. निसर्गपूजक आदिवासी समाजानं आपल्या
श्रद्धा,
संस्कृती आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून
पर्यावरणाशी सुसंवाद साधत जीवन जगण्याची अद्वितीय परंपरा निर्माण
केली आहे. या परंपरेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी, शास्त्रशुद्ध
संशोधनाची
आवश्यकता असल्याचं उईके यावेळी म्हणाले.
****
राज्यात आगामी निवडणुकांसाठी महायुतीची चाचपणी शेवटच्या टप्प्यात आली असून, १७ नोव्हेंबरपर्यंत सगळं
चित्र
स्पष्ट होईल, अशी माहिती महसूल मंत्री
चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूर
इथं वार्ताहरांशी
बोलत होते. महायुतीचाच मार्ग योग्य आहे, मात्र जिथं
महायुती शक्य नसेल, तिथं
मैत्रीपूर्ण लढत घेताना मतभेद आणि मनभेद होणार नाहीत, याची खबरदारी
घेण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्याचं
त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात महायुती ५१ टक्के मतं मिळवून विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तिकीट वाटप आणि स्थानिक
निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष आणि गाभा
समितीला देण्यात आल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास
आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना पक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, कॉंग्रेस,
माकप, भाकप आणि मनसेच्या
नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन पदकं निश्चित झाली आहेत. काल
झालेल्या उपांत्य फेरीत रिकर्व पुरुष संघ आणि कंपाऊंड
महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. रिकर्व पुरुष
संघाल्या यशदीप भोगे, अतानू दास आणि
राहुल यांनी कझाकिस्तानवर ५-३ असा विजय मिळवला, तर महिला संघातल्या दीपशिखा, ज्योती
सुरेखा वेण्णम आणि प्रितिका प्रदीप यांनी बांगलादेशचा पराभव
केला.
****
No comments:
Post a Comment