Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता-ढोल
ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना
प्रारंभ
· गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
· ऐतिहासिक माथाडी कायदा
कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही
· मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
आणि
· आशियायी क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक
प्रकारात भारताचा सुवर्णवेध
****
गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची आज
सांगता होत आहे. घरगुती
तसंच सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची
लगबग सर्वत्र पाहायला
मिळत आहे. सकाळच्या
सत्रात घरगुती गणपतींना
निरोप दिल्यानंतर दुपारनंतर
सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन
मिरवणुकांना प्रारंभ होत
आहे.
मुंबईत दुपारपासूनच गणरायाच्या
भव्य मिरवणुकांना सुरुवात
झाली. लालबागच्या राजासह,
अनेक गणपतींच्या मिरवणुका
वाजत गाजत आणि भाविकांच्या
गर्दीत सुरू आहेत. गिरगावसह
दादर आणि जुहूचौपाटीसह ६७
नैसर्गिक विसर्जन स्थळं
आणि ३८३ हून अधिक
कृत्रिम तलावावर यंदा
गणेश विसर्जन होत
आहे. विसर्जनादरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडू
नये यासाठी मुंबईत
२४ हजारांहून अधिक
पोलीस कर्मचारी तैनात
आहेत.
पुण्यातही मानाच्या पाच
गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीपाठोपाठ इतर मंडळांच्या मिरवणुकांना
सुरुवात झाली आहे. सकाळी
सुमारे दहा वाजता मानाचा
पहिला कसबा गणपती बाप्पा
विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या
मध्यवर्ती भागातील वाहतुकीत
बदल करण्यात आले
असून, पोलिसांचा मोठा
बंदोबस्त तैनात करण्यात आला
आहे.
मराठवाड्यातल्या विसर्जन सोहळ्याबाबत
अधिक माहिती आमच्या
प्रतिनिधीकडून:
छत्रपती
संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून गणेश विसजर्नाची मिरवणूक काढण्यात आली.
पालकमंत्री संजय सिरसाट, इतर
मागास मंत्री अतुल सावे, खासदार
संदिपान भुमरे, पोलिस
आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. शहरातल्या पाच मोठ्या विसर्जन
विहिरींवर सकाळपासून गणपती मूर्तींचं विसर्जन सुरू आहे. ढोल ताशांचा गजर आणि गणपती
बाप्पा मोरयाच्या जयघोषात आबालवृद्धांची गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी होत आहे.
महापालिकेच्या वतीनं शहरात ४७ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्रं तसंच निर्माल्य संकलन
केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं, दिसून येत आहे.
लातूर
महानगरपालिकेनं विसर्जनासाठी उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती संकलन केंद्रांना
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा शहरात १६ ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात
आली असून, चार
फुटांपर्यंतच्या घरगुती गणेशमूर्ती स्वीकारण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या
चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीं विमानतळ रस्त्यावरच्या १२ नंबर खाणीत विसर्जित
करण्यात येत आहे. पाणीटंचाईच्या संकटात पर्यावरण संवर्धनासाठी लातूरकरांनी महापालिकेच्या
या उपक्रमाला दिलेली साथ विशेष ठरत आहे.
जालना
इथं मानाच्या गणपतीसह मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. महापालिकेने
शहरातल्या मोतीतलाव इथल्या कुंडात गणपती विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं २८ गणपती मंडळांच्या
विसर्जन मिरवणुका
अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरु आहेत. अनेक गणेश मंडळांनी ढोल-ताशा, झांज, लेझीम आणि पारंपारिक वाद्यांच्या स्वीकार केल्यामुळे मिरवणुका अधिक उठावदार ठरत आहेत.
नाशिक इथं पालकमंत्री
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या
विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. नाशिक महापालिकेने ७७ ठिकाणी
अधिकृत विसर्जन स्थळे घोषित केली आहेत, घरगुती गणेश मूर्तींच दान स्वीकारण्यासाठी महापालिकेकडून व्यवस्था
करण्यात आली आहे.
****
माथाडी कामगारांना सामाजिक
सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण
देणारा ऐतिहासिक माथाडी
कायदा कोणत्याही परिस्थितीत
संपवला जाणार नाही, अशी
ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली आहे.
माथाडी चळवळीचे संस्थापक
स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील
यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त
वाशी इथं कृषी उत्पन्न
बाजार समितीत भव्य
कामगार मेळावा आयोजित
करण्यात आला होता, त्यावेळी
ते बोलत होते. कष्टकरी
कामगारांच्या हक्कांचे रक्षण
करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाचे
जीवन मिळवून देण्यासाठी
शासन पूर्णपणे कटिबद्ध
असल्याचे सांगतानाच, वडाळा
येथील गृहप्रकल्पात सुमारे
तीन हजार माथाडी कामगारांना
हक्काची घरे दिली जातील
आणि वाशी एपीएमसी मार्केट
यार्डचा पुढील ५० वर्षांचा
विचार करून जागतिक दर्जाचा
पुनर्विकास करण्यात येईल,
अशा महत्त्वपूर्ण घोषणा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मुंबई इथं
मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन
विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, यांच्यासह
मंत्रालयातील अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
****
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबद्दलचे अनेक निर्णय इतर २ निवडणूक आयुक्तांच्या सहमतीशिवाय झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक आयुक्त
ज्ञानेश कुमार
यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयआरसंदर्भातले सगळे निर्णय बेकायदा ठरवून आधीप्रमाणे
फॉर्म ६ची प्रक्रिया लागू करावी, मतदार याद्यांमधून १३ कोटी मतदारांची नावं कशी वगळली, याची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, तसंच ज्ञानेश कुमार
यांच्यासह इतर
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी या
याचिकेत केली आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या
औषध निरीक्षक गट
ब मुख्य परीक्षेतल्या पेपरफुटी
प्रकरणी आणखी चार आरोपींना
अटक झाली आहे. आरोपींमध्ये
दोन विद्यार्थ्यांचा समावेश
आहे. आतापर्यंत एकून
११ जणांना अटक
करण्यात आल्याची माहिती
मुंबई गुन्हे शाखेच्या
अधिकाऱ्यांनी दिली आहे. साजिद
सांडे आणि विजय किंगार
अशी या दोन विद्यार्थ्यांची नावं आहेत. सांडे
हा सांगलीचा तर
किंगार हा बुलढाण्याचा रहिवासी
आहे. या दोघांवर प्रश्नपत्रिका
बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप
आहे. तर संदीप खलाटे
आणि भैरवनाथ कदम
या दोन अन्य आरोपींवर
मध्यस्थी केल्याचा आरोप
ठेवण्यात आला आहे.
****
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं
५०० हून जास्त विहिरी
अधिग्रहित केल्या आहेत.
त्यातल्या ६७ विहिरीतून १४२
गावं आणि ९१ वाड्यांना
२४६ टँकर्समार्फत पाणीपुरवठा
सुरु केला आहे. इतर
साडेतीनशे विहिरींमधून नळावाटे
पाणीपुरवठा केला जात असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सोनेगाव इथं
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज पिकांची प्रत्यक्ष पाहणी
करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पिकांची सद्यस्थिती, पावसाचं प्रमाण, पिकांची वाढ आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी
जाणून घेतल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत आवश्यक
उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी अनेक अधिकारी आणि
शेतकरी उपस्थित होते.
****
राष्ट्रीय पोषण पंधरवड्या निमित्त धाराशिव जिल्ह्यात दोन
हजार ४६ अंगणवाड्यांमध्ये सुमारे १३ हजारावर उपक्रम राबवले
जात आहेत. याबाबत अधिक
माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर –
बाईट – देविदास पाठक
****
लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम आज घेण्यात
आला. या कारखान्यात गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये ५ लाख मेट्रीक टन गाळप झालं असून, गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३१३१ रुपये प्रमाणे ऊस
बिल अदा करण्यात आलं आहे. यंदाचा हंगाम वेळेवर सुरू
करण्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा
दोन अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. सन दोन हजार सव्वीस हे वर्ष
महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर ‘महिला शेतकरी कायदा दोन हजार सव्वीस’ची प्रभावी अंमलबजावणी
सुरू करण्यात आली आहे.
****
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत १० मीटर
एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताचा कमलजीत आणि सुरुची सिंह या जोडीनं आज
सुवर्णपदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत
रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्य प्रताप तोमर आणि नीरज कुमार
यांनी रौप्यपदकाची कमाई केली. १० हजार मीटर स्पर्धेत
गुलबीरसिंह याने रौप्यपदक तर बारानिका
एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कांस्यपदक पटकावलं.
महिला कबड्डी संघानं नेपाळवर ४८-२४ असा विजय मिळवून अंतिम
फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर ६६-२८ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश
केला. टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरीत मानुष शहा आणि दिव्या चितळे या जोडीनं
हाँगकाँगच्या जोडीवर मात करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. बॅडमिंटनमध्ये
मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
केला,
तर पुरुष दुहेरीत गतविजेते सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि
चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा धक्का बसला.
या स्पर्धेत भारतानं
आतापर्यंत २१ पदकं पटकावली
आहेत, २ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारत १२ व्या
स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment