आकाशवाणीऔरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१६ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
राज्यातील पहिल्या टप्प्यातल्या १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या
निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी,
हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, जळगाव, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा,
चंद्रपूर आणि गडचिरोली इथल्या एकूण दोन हजार पाचशे सदूसष्ठ जागांकरता ११ हजार ९८९ उमेदवार
निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २४ हजार ३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली
असून, संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. या निवडणुकीत जवळपास सर्वच
ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत
आहेत.
लातूर तालुक्यातल्या मतदान केंद्रांवर पहिल्या मतदाराचं
स्वागत साखर देऊन करण्यात आलं. जिल्ह्यातली मतदान केंद्र सुशोभित करण्यात आली असून,
२० मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आली आहेत, उमेदवाराच्या शपथपत्राचा
गोषवारा मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर
रोडगे यांनी दिली.
****
ई
व्हिसाधारक पर्यटकांना विमानतळावरच उतरताच मोबाईल सीम कार्ड देण्यात येणार आहे. पर्यटन
मंत्री महेश शर्मा यांनी ही माहिती दिली, दिल्लीच्या विमानतळावर ई व्हिसाधारक पर्यटकांना
शर्मा यांच्या हस्ते नि:शुल्क सीम कार्ड वितरित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
सध्या ही सुविधा दिल्लीच्या विमानतळावर सुरु करण्यात आली असून, लवकरच देशातल्या सर्व
विमानतळांवर सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय पर्यटन उद्योग प्रगती करत
असून, विमुद्रीकरणाचा यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. डिजिटल
अर्थव्यवस्था आणि ई व्यवहारांचा पर्यटन उद्योगावर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं
ते म्हणाले.
//*******//
No comments:
Post a Comment