आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६
नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्वामुळे गेल्या चार वर्षात देशात
नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
ते नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. देशातली आरोग्यसेवा
आणि शिक्षणाचं क्षेत्रं यांची, जगभरातल्या या व्यवस्थांशी तुलना करताना जेटली म्हणाले
की, भारतात अशा संस्थांना धार्मिक समूह किंवा उद्योगांच्या सामाजिक बांधिलकीतून आर्थिक
मदत मिळत असते.
****
देशाच्या अनेक भागात आलेली थंडीची
लाट आणखी तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्यता असून, थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर
भारतात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंजाब, राजस्थान
आणि हरयाणात थंडीची लाट कायम राहणार असून, ती मध्यप्रदेश, छत्तीसगड, सौराष्ट्र, आणि
कच्छमधे पसरण्याची शक्यता आहे, कश्मीरमधे श्रीनगर
वगळता इतरत्र पारा गोठ बिंदूच्या खाली घसरला. तिथे पाणी गोठल्यानं पाणी पुरवठा थांबला
आहे. हिमाचल प्रदेशात केलाँग इथं उणे नऊ पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली. दरम्यान, मराठवाड्यात मात्र थंडी
कमी झाली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा काल
समारोप झाला. मराठवाडा साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांचं अनुदान देण्यात यावं, उदगीर
जिल्हा निर्मिती करावी, मराठवाड्यातल्या सर्व रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करून मध्य
रेल्वेशी जोडण्यात यावं, उदगीर इथं पशुधन विद्यापीठ स्थापन करावं, आदी बारा
ठराव यावेळी संमत करण्यात आले.
****
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्यात पहिल्या दिवशी दोन बाद १५५ धावा केल्या आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी पत्करली. मयांक अग्रवालनं सुरेख फलंदाजी करताना पदार्पणात १६१ चेंडूंमध्ये
७६ धावा केल्या. सलामीवीर हनुमा विहारी केवळ आठ धावांवर बाद झाला. चेतेश्र्वर पुजारा
४० धावांवर आणि कर्णधार विराट कोहली २३ धावा काढून खेळत आहेत.
****
हैदराबाद इथं सुरू असलेल्या प्रिमीयर
बॅडमिंटन लीग स्पर्धेत काल हैदराबाद हंटर्सनं चेन्नई स्मॅशर्सवर ४-१ अशी मात करत सलग
दुसऱ्या विजयाची नोंद केली. महिला एकेरीत मात्र हैदराबाद हंटर्सच्या पी व्ही सिंधुला
चेन्नई स्मॅशर्सच्या सुंग-जी-ह्यून हीनं १३-१५, १५-१४, ७-१५ असं पराभूत केलं.
*****
***
No comments:
Post a Comment