Sunday, 23 July 2023

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.07.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.07.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

***

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि चंद्रशेखर आजाद या स्वातंत्र्ययोद्ध्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची मागणी करत ब्रिटीश साम्राज्याला हादरा दिला. त्यांचा संघर्ष , साहस आणि समर्पण नेहमी प्रेरणा देत राहील. तर महान क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यांचं मातृभूमीच्या संरक्षणासाठीचं बलिदान कायम प्रेरणा देईल असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****

आज राष्ट्रीय प्रसारण दिवस . १९२७ साली आजच्या दिवशी मुंबईतून इंडिया ब्रॉडकास्टींग या खाजगी कंपनीच्या माध्यमातून पहिलं प्रसारण कारण्यात आलं ८ जून १९३६ रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टींग सेवेला ऑल इंडिया रेडिओ हे नाव देण्यात आलं.  तर ऑगस्ट १९३७ मध्ये  केंद्रीय समाचार संघटना स्थापन झाली. त्यानंतर ५ वर्षांनी ही संघटना समाचार सेवा प्रभाग आणि विदेश सेवा प्रभाग अशी विभाजीत करण्यात आली आणि १९५६ मध्ये लोक प्रसारक चं आकाशवाणी असं नामकरण झालं.

****

राज्यातील सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असून  यासाठी आवश्यक निधी लवकरच उभा केला जात आहे. असं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री, हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. काल  कोल्हापूर इथल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.  

****

जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसामुळं नद्या नाल्यांना पूर आला आहे. मुक्ताईनगरचा संपर्क तुटला आहे. नागोई नदीच्या पुरात विरोदा रस्त्याच्या पुलाला भगदाड पडल्यानं शेतीशिवारातील विरोदा गावचा संपर्क तुटला आहे. तर अहिरवाडी आणि निरूळ इथल्या वस्तीत पाणी शिरलं आहे.

****

No comments:

Post a Comment