Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
July 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
शिवराज सिंह चौहान यांनी विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन, अर्थात व्हीबीजी
राम जी अधिनियम, २०२५ यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
या मोहिमेअंतर्गत राज्यांना २५ हजार कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित
केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे यशस्वीपणे VB-G RAM
G योजनेत रूपांतर झाल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट- केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री
शिवराज सिंह चौहान
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून
इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे
राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून मोदींचा हा दौरा आहे. पंतप्रधान
मोदी यांची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे. तर, मे २०१८ मध्ये
भारत-इंडोनेशिया 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'चा दर्जा मिळाल्यानंतरची ही
पहिलीच द्विपक्षीय चर्चा असणार आहे.
दरम्यान, परराष्ट्र
व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर आजपासून दहा जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवेत आणि
ओमानच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर
भर दिला जाईल, तसंच प्रादेशिक बाबी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचार-विनिमय करण्यात येईल.
यानंतर, एस. जयशंकर १३ जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या
वर्ष २०२८-२९ या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर १४
जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत-युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या
तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
****
जागतिक शांतता राखण्याच्या
मोहिमेत, भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या
भारतीय लष्कराच्या ६५१ जवानांना प्रतिष्ठित 'युनायटेड नेशन्स मेडल' प्रदान करण्यात
आलं आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेत, भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल
हा सन्मान मिळाला आहे.
****
श्री अमरनाथजी वार्षिक यात्रेला
उत्साहपुर्ण वातारणात शुभारंभ झाला आहे. यात्रेच्या सुरुवातीच्या दोन दिवसात ३२ हजार
३१३ भाविकांनी दर्शन घेतलं. तर, दर्शनासाठी साडेसहा हजारांहून जास्त भाविकांचा चौथी तुकडी
आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्री निवासातून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.
काही जण पारंपरिक पहलगाम मार्गे तर काही भाविक बालतल मार्गाद्वारे पुढील प्रवास करणार
असल्याचं वृत्त आहे.
****
प्रसिद्ध लोकगीत गायिका-पद्म
विभूषण तीजन बाई यांचं आज पहाटे रायपूर इथं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या सत्तर वर्षांच्या
होत्या. छत्तीसगढ़च्या प्रसिद्ध पंडवानी अर्थात महाभारतातील कथांवर आधारित पारंपारिक
शैलीत सशक्त आवाज, मंचावरील प्रभावशाली उपस्थिति आणि वैशिष्ट्यपूर्ण कथाशैलीद्वारे
तीजन बाई यांनी भारतासह विदेशात आपली गायन कला सादर केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
यांच्यासह पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी तीजन बाई यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
जालना इथं संत मुक्ताबाई पालखीचा
पहिल्यांदाच आयोजित रिंगण सोहळा आज सकाळी उत्साहासह भक्तीमय वातावरणात पार पडला. आषाढी
एकादशीनिमित्त मुक्ताईनगरहुन पंढरपूरकडे या पालखीचा प्रवास सुरु आहे. शहरातील जे.ई.एस.
महाविद्यालयाच्या प्रांगणात, रिंगण सोहळ्यात पालखीतील अश्वांनी ठराविक मार्गावर प्रदक्षिणा
घालत धाव घेतली. भाविक मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते.
****
हवामान
भारतीय हवामान विभागानं आज
विदर्भासह मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांना
रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच नाशिक आणि पुण्याच्या बहुतांश भागात उद्यापर्यंत मुसळधार
पावसाचा अंदाज आहे. कोकण परिसरातील पंचगंगा- अंबा या नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत
आहेत. कोल्हापूर इथंही एनडीआरएफ पथक तैनात झालं आहे. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या
पाण्याच्या पतळीत मोठी वाढ झाली आहे, गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे
उघडल्याचं वृत्त आहे. येत्या ७२ तसांत अशाच मुसळधार पावसाची राज्यात शक्यता असल्याचं
सांगण्यात आलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधल्या
जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर, रायगड जिल्ह्यातील
अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं लोकप्रिय पर्यटनस्थळांवर
येत्या तीस सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी घातली आहे.
दरम्यान, मराठवाड्यात
आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे.
****
आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज दुपारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या
लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment