Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, काल
राज्यासह देश परदेशात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात
गणेशाचं आगमन झालं. पुढचे बारा दिवस चालणाऱ्या
या चैतन्यपर्वाला पारंपरिक पद्धतीनं
श्री गणेश प्रतिष्ठापनेनं सुरुवात
झाली. कोल्हापूरच्या श्री
अंबाबाई मंदिरात तसंच
धाराशीव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी
मंदिर परिसरात श्री
गणेशाची स्थापना करण्यात
आली. दरम्यान, आज दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे.
****
महाराष्ट्रात गेल्या
दोन दिवसांपासून
अनेक ठिकाणी
पावसानं जोरदार
हजेरी लावली
आहे. पुढील
२४ तासांसाठी
पालघर, ठाणे, नंदुरबार,
नाशिकच्या घाट
परिसर आणि
गडचिरोली जिल्ह्यात
ऑरेंज अलर्ट
जारी करण्यात
आला आहे. कोकण आणि मध्य
महाराष्ट्रातील अनेक
जिल्ह्यांत मध्यम
स्वरूपाचा पाऊस
पडण्याची शक्यता
हवामान विभागानं
वर्तवली आहे.
तर मराठवाडा
आणि विदर्भात
काही ठिकाणी
वादळी पावसाचा
अंदाज आहे.
****
आज दूरदर्शनचा
६७ वा
स्थापना दिवस आहे.
१९५९ मध्ये
आकाशवाणीअंतर्गत प्रायोगिक
दूरचित्रवाणी सेवा
म्हणून दूरदर्शनची
सुरुवात झाली.
गेल्या ६७ वर्षांत
दूरदर्शन हे
माहिती प्रसार, संस्कृतीचं जतन आणि
राष्ट्रीय एकात्मतेचं
महत्त्वाचं माध्यम
बनलं आहे.
उपग्रह आणि
डीटीएच सेवांच्या
माध्यमातून दूरदर्शन
देशाच्या जवळपास
१०० टक्के
लोकसंख्येपर्यंत पोहोचत
आहे.
****
आज अभियंता दिन आहे. भारतरत्न सर एम.विश्वेश्वरैया यांच्या
जन्मदिनाच्या औचित्यानं हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एम. विश्वेश्वरैया
यांना आदरांजली वाहिली आहे. विश्वेश्वरैया यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातल्या
योगदानाला आज देश नमन करत आहे. कृष्णसागर धरणापासून चिनाब पूल, टल बोगदा,
स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि नवीन पंबन पुलापर्यंत भारतीय
अभियंते नवोन्मेषाचीनवी क्षितिजं गाठत आहेत. अभियंत्यांच्या असाधारण प्रतिभा आणि
अतूट संकल्पामुळेच आत्मनिर्भर आणि विकसित भारताचं स्वप्न साकार होणार असल्यामुळे
देश अभियंत्यांचा कृतज्ञ असल्याची भावना आज व्यक्त होत आहे.
****
पालघरमधील खासगी
रुग्णालयात गोविंदांना
घेऊन डॉक्टरांना
झालेल्या मारहाण
आणि धमकीप्रकरणी
पोलिसांनी आणखी
९ जणांना
अटक केली
आहे. न्यायालयाने
अटक वॉरंट
जारी केल्यानंतर
पोलिसांसमोर शरण
आलेले शिवसेनेचे
माजी जिल्हाध्यक्ष
कुंदन संखे, नगरसेवक नीलम संखे
यांच्यासह ९ फरार
आरोपींचा अटकेमध्ये
समावेश आहे.
या कारवाईनंतर
प्रकरणातील अटक
झालेल्या आरोपींची
संख्या २३ वर
पोहोचली आहे. यापूर्वी राहुल घरत
आणि आमदार
राजेंद्र गावित
यांचा मुलगा
रोहित गावित
यांच्यासह इतर
आरोपींना पोलिसांनी
अटक केली
होती.
****
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मनीष देशमुख यांनी गाईच्या
शेणापासून बनलेल्या पर्यावरण पूरक
गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.त्यांनी य्दा जवळपास १००० मूर्ती तयार केल्या
असून जिल्ह्याच्या बाहेरही या मूर्तींची विक्री होते आहे. या मूर्तींच्या
विसर्जनानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येतो.त्यामुळे रोजगारनिर्मिती, अतिरिक्त उत्पन्न आणि पर्यावरण संवर्धन असा तिहेरी फायदा या उपक्रमातून साधला
असल्याचं देशमुख यांनी आमच्या वार्तहराशी
बोलतांना सांगितलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. ते काल आंतरवाली
सराटी इथं बोलत होते.
आज आपण एकटेच
मुंबईला जाणार
असल्याचं, जरांगे यांनी
स्पष्ट केलं. मात्र,
आपल्याला एकट्यालाही मुंबईत उपोषणाची
परवानगी नाकारल्यास सर्वांनी मुंबईकडे निघावे, असंही
त्यांनी सांगितलं. दरम्यान, सतरा दिवसांपासून सुरू
असलेल्या उपोषणादरम्यान कालपासून पाणी आणि उपचार घेणे बंद केल्याने जरांगे यांची
प्रकृती खालावली असल्याचं आमच्या वर्ताहरानं
सांगितलं.
****
दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखडा घोषीत करण्याची मागणी
मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली
आहे. याबाबतचं निवेदन
परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडे
सादर केलं आहे. पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे आणि उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांनी ही माहिती
दिली. कृती आराखडा घोषीत
न झाल्यास, मराठवाड्यात
जल जन आंदोलन उभारण्याचा इशारा परिषदेने दिला आहे.
****
भारत आणि अफगाणिस्थान यांच्यातला टी-20 क्रिकेट मालिकेतला
दूसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०
नं आघाडीवर आहे.
****
जम्मू-काश्मीरमधील
सुरक्षा परिस्थिती
लष्कराच्या अथक
प्रयत्नांमुळे पूर्णपणे
नियंत्रणात असल्याची
माहिती संरक्षण
मंत्रालयाच्या २०२५-२६
च्या वार्षिक
अहवालात देण्यात
आली आहे.
****
आज देशात, विशेषत: ओडिशामध्ये कृषी
आधरित लोक उत्सव नुआखाई साजरा केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या
उत्सवानिमित्त देशवासियांना, विशेषत: ओडिशावासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे सद्भाव कौटुंबिक आत्मीयता वाढते, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment