▼

Monday, 21 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज चार पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिंमांशूने २५२ पूर्णांक चार गुणांसह रौप्य पदक, तर रुद्राक्षने २३० पूर्णांक ९ गुणांसह कांस्य पदक जिंकलं.

मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने महिला पारंपरिक ६० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडुंचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाला अभिमान वाटला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे.

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मिश्र मार्शल आर्ट्समध्ये पदक जिंकल्याबद्दल सुचिका तारियालचं अभिनंदन केलं आहे. या प्रकारातलं हे देशाचं पहिलं पदक असून हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मांडवीय म्हटले आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौर्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवाडिया इथल्या एकता नगर इथं ७२वे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या ७५व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

****

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत 'नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया'च्या सातव्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. भारतातली फार्माकोविजिलन्स म्हणजेच औषधांच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवणारी आत्मनिर्भरतेचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

देशात सध्या औषधांच्या दुष्परिणामांवर नोंद आणि देखरेख ठेवणारी शंभराहून अधिक केंद्रेकार्यरत असून, ही यंत्रणा अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरापर्यंत विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नये, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं काटेकोर पालन करावं आणि औषध घेतल्यानंतर अचानक किंवा अनपेक्षितपणे कोणताही दुष्परिणाम आढळल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष न करण्याचं आवाहन अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केलं.

****

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१व्या अधिवेशनातील सप्ताहासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहे. त्यांच्या न्यूयॉर्क दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान वार्षिक उच्चस्तरीय महासभेतली सर्वसाधारण चर्चा होणार आहे. २६ सप्टेंबरला ते महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. विश्वास पुनर्स्थापित करणे, परिवर्तनाचं व्यवस्थापन आणि सर्वांसाठी परिणामकारक संयुक्त राष्ट्र’ ही ८१व्या अधिवेशनाची यंदाची संकल्पना आहे.

****

जागतिक अल्झायमर दिन आज पाळला जात आहे. हा आजार वाढत्या वयातील व्यक्तींच्या स्मरणशक्ती आणि विचार करण्याशी संबंधित आहे. या आजारासंबंधी विविध नवनवीन संशोधन सुरू असून, सुरुवातीची लक्षणं प्रौढ वयात रक्त तपासणीद्वारे ओळखता येतात, असं नवीन संशोधनातून समोर आलं आहे.

****

राज्यातल्या शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली गठित उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांचा आढावा घेत आहे. शहरातल्या स्मार्ट सिटी कार्यालयात या समितीतल्या सदस्यांनी विद्यार्थी आणि संबंधित घटकांना भेटून त्यांची मतं जाणून घेतली आहेत.

****

बीड जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातले ७२ प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत, तर ३१ प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या १६४ प्रकल्पांपैकी तब्बल १०३ प्रकल्पांमधला पाणीसाठा कमी झाला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातल्या १६४ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १७ पूर्णांक ८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, लघु प्रकल्पांमध्ये अवघा ६ पूर्णांक ६३ टक्के साठा आहे. तर, गेवराई तालुक्यात शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३२५ मिलिमीटर म्हणजे ४६ पूर्णांक ४८ टक्के पाऊस झाला आहे.

****

अकोला जिल्ह्यात काल रात्री एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण इंगळे असं त्याचं नाव असून, पावसाअभावी करपलेल्या पीकामुळे मशागत, बियाणे आणि खतांसाठी झालेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'महागणेशोत्सव' या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment