Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय
कृषी मंत्र्यांचं आवाहन-दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवणार
·
मंत्र्यांकडून विविध जिल्ह्यांत पीक परिस्थितीची पाहणी, शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्याचं
महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन
·
सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा विरोधकांचा आरोप, यासंदर्भात मागण्यांचं निवेदन
देणार असल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं प्रतिपादन
आणि
·
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची काल आठ पदकांची कमाई
****
रबी हंगामात पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम
ठरवण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. यंदाच्या रबी
हंगामासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते
बोलत होते. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्यसरकारांनी रबी हंगामाचं
नियोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा, याकरता खेत बचाओ अभियान सुरु
करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक
पाठवणार असल्याचंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट – केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान
****
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी
तालुक्यातल्या अराठी इथं पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यातल्या हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही
तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश आहे. या तालुक्यांमध्ये पीक परिस्थितीचे
तत्काळ पंचनामे करून नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देश देऊन, शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य
केलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, दुष्काळाचा फटका बसलेल्या
शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे ११ विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या
रजा रद्द करायच्या सूचना दिल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.
****
जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या कडेगाव, गेवराई बाजार, गोकुळवाडी तसंच जालना तालुक्यातल्या
गणेशनगर शिवारातल्या शेतांना भेट देऊन पिकांच्या स्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी
संवाद साधला. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात
येत असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी आणि पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन करण्यात
येत असून, चाऱ्याची तीव्र टंचाई असलेल्या
भागात तातडीने चारा डेपो सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
**
दरम्यान, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री
नितेश राणे यांनी काल जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी आणि सोमठाणा
तलावांतल्या मत्स्यव्यवसायाच्या स्थितीची पाहणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा
मत्स्यउत्पादन वीस टक्क्यांपर्यंत घसरल्याने नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून
नियमानुसार मदत देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
****
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात उत्पादित झालेला
किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास
पूर्णपणे बंदी घातली आहे. उपलब्ध चारा प्राधान्याने जिल्ह्यातले शेतकरी आणि गोशाळांमधल्या
पशुधनासाठी राखून ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.
****
दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना
अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेन आंदोलन सुरू
केलं आहे. काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं.
सरकारने दुष्काळाच्या संदर्भात काढलेल्या शासन निर्णयाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदपूर तसंच निलंगा इथं होळी करून निषेध नोंदवला.
दरम्यान, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक
मदत मिळावी, या मागणीसाठी मनसे शेतकरी
सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात रेणापूरच्या
रेणुका देवीला दंडवत घालून साकडं घातलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
इथं बैठक झाली. या बैठकीत सध्या राज्यात भेडसावणाऱ्या दुष्काळ निवारणासाठी काय करता
येईल, यावर चर्चा झाली. पक्षाचे
अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करतांना, येत्या दोन चार दिवसांत सरकारकडे
दुष्काळ निवारणासंदर्भात मागण्या करू, असं सांगत, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा
से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या
जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. देशभरात वस्तू आणि सेवा
कराची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. आज याविषयी जाणून घेऊ:
‘‘अप्रत्यक्ष करप्रणालीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी हा कायदा 1 जुलै 2017 पासून देशभरात
लागू झाला. ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेच्या दिशेने हे
महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांकडून आकारले
जाणारे अनेक अप्रत्यक्ष कर एकत्रित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक
कराबद्दल बोलताना आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या:
बाईट
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
जीएसटी लागू होऊन आता नऊ वर्षांहून अधिक कालावधी झाला
असून, देशाच्या करप्रणालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.’’
बाईट – पत्रकार अजय कुलकर्णी
****
बीड जिल्ह्यातल्या हिवरापहाडी इथल्या शाळेत विषय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली
आहे. इथल्या विद्यार्थिनींनी थेट वर्गातून सादर केलेल्या विशेष बातमीपत्राची उपमुख्यमंत्री
तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेत, तातडीने शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. याबाबत अधिक
माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...
बाईट – प्रतिनिधी
‘‘हिवरापहाडी इथल्या दुर्गम
भागातील शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते.
शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी, थेट वर्गातूनच अभिरुप बातमीपत्र सादर केलं. या साठी त्यांनी पाणी पिण्याच्या
प्लास्टिकच्या बॉटल्यांचा माईकसारखा वापर केला, ही चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा
प्रशासनाने शिवाजी जोगदंड यांची या शाळेत नियुक्ती केली, आदेश मिळताच, शिवाजी जोगदंड या शाळेत
रुजू झाले.’’
****
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल चार रौप्य
आणि चार कांस्यपदकांसह एकूण आठ पदकांची कमाई केली. यामुळे भारताची एकूण पदकसंख्या ४५
झाली असून, त्यात चार सुवर्ण, २० रौप्य आणि २१ कांस्य पदकांचा
समावेश आहे. पदकतालिकेत भारत बाराव्या स्थानावर आहे.
पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत यशवीरनं रौप्यपदक, तर रोहित यादवनं कांस्यपदक
मिळवलं. पुरुषांच्या एक हजार ५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं स्पर्धेतलं
आपलं दुसरं रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीत पारुल चौधरीनं कांस्यपदक
मिळवलं. लांब
उडी स्पर्धेत श्रीशंकर मुरलीने रौप्य पदक जिंकलं.
महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत विथ्या रामराजनं कांस्यपदक पटकावलं. या कामगिरीसह
तिनं पी. टी. उषा यांचा चार दशकांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला.
नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंगनं ३८ गुणांसह
रौप्यपदक मिळवलं. तर कुराशच्या महिलांच्या ७८ किलो वजनी गटात पिंकी बलहारनं कांस्यपदक
जिंकलं.
****
धाराशिव जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
कीर्तीकिरण पुजार यांनी दिले. ते काल यासंदर्भात आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेतली
कामं निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश देत
त्यांना आवश्यकतेनुसार काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची
शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment