Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 October 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०४ ऑक्टोबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर
यांनी फ्लाय दुबई' विमान
दुर्घटना रोखून दाखवलेल्या शौर्याबद्दल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी थेट फोनवरून संवाद साधत
त्यांच्या शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे भरभरून कौतुक केले आहे. संवादामध्ये नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांचा
"इस्रायल,
भारत आणि संपूर्ण जगाचा हिरो" असा गौरव केला. इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात
मुख्य दीप प्रज्वलित करण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित माछर
यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष निमंत्रण दिलं आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरात
यु.ए.ई.मधील दबई क्राउन प्रिन्स अर्थात
राजपुत्र आणि उपपंतप्रधान तथा संरक्षणमंत्री शेख हमदान बिन मोहम्म्द बिन राशीद
अल मख्तूम यांनी स्मित माछर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. स्मित यांचं कौतुक
करतांना शेख यांनी आमच्या देशासाठी सेवा देतांना यु.ए.ई.च्या करुणेचे-शांततेचे आणि
जीवनाचे असे राष्ट्र या संकल्पनेला स्मित माछर यांनी सार्थ केल्याचं म्हटलं
आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ
मार्शल ए. पी. सिंह यांनी फ्लाय दुबईचे कॅप्टन स्मित मच्छर यांच्या असामान्य
प्रसंगावधानाचे आणि मानसिक व शारीरिक धैर्याचे कौतुक केले. त्यांची कामगिरी
प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमरीकेचे उप-परराष्ट्र मंत्री
क्रिस्टोफर लॅंडो यांनीही माछर यांनी संभाव्य अतिरेकी घटना टाळल्याबद्दल माछर
यांचं कौतुक केलं आहे.
****
जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा
स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे
बंगळूरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
भारतीय महिला संघाने ४४ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीचे सुवर्णपदक
जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे. रात्री उशिरा, भारतीय क्रीडा
प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक विष्णू सुधाकरन यांनी संघाचे स्वागत केले.
खेळाडूंचा पुष्पहार घालून आणि पारंपरिक म्हैसूर पेठा देऊन सन्मान करण्यात आला.
संघातील बहुतेक खेळाडू साई बंगळूरु येथे प्रशिक्षण घेतात.
दरम्यान, आशियाई क्रीडा
स्पर्धेचा आज समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अतिशय गौरवास्पद
कामगिरी केली असून भारताची एकूण पदकसंख्या ८५ झाली आहे. यात २१ सुवर्ण, २७
रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
****
भारताला आघाडीची अर्थव्यवस्था
बनविण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचं प्रतिपादन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. काल
नागपूर इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पाणी, वीज, वाहतूक
- दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्मितीतूनच भांडवली गुंतवणूक, उद्योग-व्यवसाय
आणि रोजगाराच्या संधी वाढतील असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा
प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच
होतं. मात्र,
या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे
आंदोलनात विविध दोन तीन गट तयार झाल्याची स्थिती आहे. शहराच्या विविध भागात
झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा
दर्शवला.
****
पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन
लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिली आहे. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त काल अभिजात मराठी भाषा सप्ताह
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते मुंबईत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं
गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कार्यक्रमात मराठी
भाषा मंत्री उदय सामंत यांनी राज्यातल्या विविध बोलीभाषांचे शंभर कोश आणि नऊ विविध
ठिकाणी 'मराठी कौशल्य विकास केंद्र' उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती
दिली.
****
पद्मश्री कविवर्य दिवंगत नारायण सुर्वे
यांचं भव्य स्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं उभारण्यात
येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर
केला आहे. हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत
होते.
****
थोर क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा
यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावपूर्ण आदरांजली अर्पण
केली आहे. यानिमित्त समाज माध्यमावर त्यांनी कृतज्ञता संदेश प्रसारित केला.
****
अकोला शहरावर पुन्हा एकदा तीव्र
पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागलं आहे. अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा
मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा -महान
प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा झपाट्याने कमी होत असल्यानं शहरातील
पाणीपुरवठ्याचं अंतर वाढणार आहे. त्यानुसार आजपासून शहरात दहा दिवसांआड म्हणजेच
अकराव्या दिवशी पाणीपुरवठा होईल.
दरम्यान, सिंधुदुर्ग
जिल्ह्यातही संभाव्य पाणीटंचाईच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक
उपाययोजनांचं अंदाजपत्रक लवकर सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी
काल झालेल्या आकस्मिक पाणी आरक्षण आढावा पूर्वबैठकीत दिले.
****
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
आणि विदर्भात हवामान कोरडं राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं कळवली आहे.
****
No comments:
Post a Comment