Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 6 October
2026
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ६ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
१६
ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
राज्यातल्या
दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाची स्थापना, लवकरच
पाहणी दौरा
·
एमपीएससी
अध्यक्षांविरोधात कारवाईसाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची
राज्यपालांकडे शिफारस
·
औरंगाबाद
पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे सतीश चव्हाण तर महाविकास आघाडीचे दिलीप
घुगे यांचे अर्ज दाखल
आणि
·
हिंगोलीत
फटाक्याच्या गोदामाला आग- दोघांचा मृत्यू, दहा जखमी
****
राज्य सरकारने १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू
करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल सर्व स्थानिक
स्वराज्य संस्थांना यासंदर्भात निर्देश दिले. अपुरा पाऊस आणि सध्याची पाणीटंचाई या
पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांना
पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फलोत्पादन, बांधकाम
आणि साफसफाईसाठी वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर केला जाणार असून, उद्योगांना
त्यांच्या पाण्यापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यास सांगण्यात आलं
आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, प्रत्येक धरणातलं १० टक्के
पाणी आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवलं जाईल, पेयजल, जनावरांसाठी
आणि त्यांच्या चाऱ्यासाठी पाण्याची गरज भागवल्यानंतर रब्बी पिकांसाठी पाणी पुरवलं
जाईल, असं स्पष्ट करुन,
धरणे, नद्या किंवा कालव्यांमधून विनापरवाना
पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशाराही सरकारने दिला आहे. येत्या ३१
ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी वापरावर हे निर्बंध लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या
शासननिर्णयात नमूद आहे.
****
राज्यातल्या दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र
शासनाने केंद्रीय पथकाची स्थापना केली असून, हे पथक लवकरच राज्याचा
पाहणी दौरा करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव मुक्तानंद अग्रवाल
यांच्या अध्यक्षतेखालच्या या पथकात महत्त्वाच्या १० विभागांचे प्रतिनिधींचा समावेश
करण्यात आला आहे. हे पथक दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०२० नुसार दुष्काळाच्या
तीव्रतेचं मूल्यांकन करणार आहे.
****
दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दुष्काळाच्या परिस्थितीवर सुमारे तासभर चर्चा
झाली. दुष्काळाचं संकट मोठं असून, केंद्र सरकारकडून राज्याला भरीव मदत
मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
****
सांस्कृतिक कार्यविभागाकडून दुष्काळग्रस्त भागात
रोजगारनिर्मिती आणि जलसंवर्धन करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार
यांनी केली. काल मुंबईत,
सांस्कृतिक कार्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम
करावे, विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांचा उपयोग जलस्रोतांचं
पुनरुज्जीवन आणि रोजगारनिर्मितीसाठी करावा, त्यासाठी सांस्कृतिक
संचनालयाच्या आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पुरातत्व खात्याला निधी उपलब्ध
करुन देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले.
****
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दुष्काळी
परिस्थितीची पाहणी सुरू ठेवत वडवणी, धारूर, माजलगाव
आणि गेवराई तालुक्यांतल्या विविध गावांमध्ये काल पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या
आणि पिकांच्या नुकसानीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.
****
राज्यातल्या उपलब्ध जलसाठ्यांमधल्या पाण्याचं बाष्पीभवन
मोठ्या प्रमाणावर होत असून,
बाष्पीभवन-प्रतिबंधक रासायनिक एकस्तरीय आवरण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक
वापर करण्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूल तथा आपत्ती व्यवस्थापन
विभागाकडे केली आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर सूक्ष्म आवरण तयार
होऊन पाण्याच्या वातावरणात होणारं उत्सर्जन कमी करण्यास आणि परिणामी बाष्पीभवनाचा
वेग घटवण्यास मदत होते.
****
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातल्या
दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत व्यवहार्यता तपासून
प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल
मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागांमध्ये व्यवहार्य
असेल तर केंद्रीय स्वयंपाकघराचा पर्याय निवडावा, दुर्गम आणि आदिवासी
भागातल्या शाळांपर्यंत अन्न पोहोचायला उशीर होत असेल, तर
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत, शक्य
असेल तिथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचत गटांना द्यावी, विद्यार्थ्यांना
ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय
घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत, असे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी दिले.
**
राज्य लोकसेवा आयोगाचे माजी तसंच विद्यमान अध्यक्ष आणि
सदस्यांविरोधात कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. उच्च
न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, या
समितीच्या माध्यमातून तीन महिन्यात अहवाल मागवून, त्या निष्कर्षांच्या
आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस
त्यांनी केली आहे.
**
दरम्यान, काल मुंबईत पायाभूत सुविधांच्या आढावा
बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचं
काम पूर्ण करताना शहरात प्रत्येक घराला नळजोडणी मिळेल याची दक्षता घेण्याचे
निर्देश दिले. नळ जोडणी देताना पुन्हा खोदकाम करावं लागणार नाही, अशा
पद्धतीचे नियोजन करण्यास सांगून त्यांनी, निर्धारित मुदतीत काम पूर्ण
न करणाऱ्या कंत्राटदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा इशाराही दिला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५
वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा
आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या
जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कलम ३७० हटवणं, हा
देखील याच प्रयत्नांचा भाग. आज या संदर्भात जाणून घेऊ या,
केंद्र सरकारनं ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० मधील विशेष
तरतुदी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरचे पुनर्गठन करून
जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयानंतरच्या आपल्या भाषणात एक देश, एक राज्यघटना ही संकल्पना अधोरेखित केली.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कलम ३७० हटवण्याच्या निर्णय म्हणजे जम्मू-काश्मीर आणि
लडाखच्या विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे. हा केवळ घटनात्मक बदल नाही तर
राष्ट्रीय एकात्मता,
समान घटनात्मक अधिकार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
****
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा
आज अखेरचा दिवस आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून राष्ट्रवादी
काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जांची छाननी
उद्या होईल,
तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या निवडणुकीसाठी
२३ ऑक्टोबरला मतदान,
तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
दरम्यान, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी
धाराशिव जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ७६ मतदान केंद्रं प्रस्तावित करण्यात आली आहेत.
यात धाराशिव तालुक्यात १६,
तुळजापूरमध्ये ११, उमरगा १२, लोहारा
सहा, कळंब दहा,
भूममध्ये आठ, वाशीमध्ये पाच आणि परंडा
तालुक्यातल्या आठ मतदान केंद्रांचा सामवेश आहे.
****
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम अंतर्गत नांदेड
जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली
आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी ही माहिती दिली. यासाठी
कृषी विभागाने १७ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिलं असून, यासंबंधी
अडचणींसाठी संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे
यांच्या हस्ते उद्घाटन झालं. काल सकाळी विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढून
महोत्सवाला सुरूवात केली. या महोत्सवात १०७ महाविद्यालयातले साडे सहाशे विद्यार्थी
सहभागी झाले आहेत.
****
हिंगोली शहरात मारवाडी गल्ली भागात फटाक्याच्या गोदामाला आग
लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर आठ ते दहा जण जखमी झाले. या भागात
गोपाल बासटवार यांचं दुमजली घर असून, त्यांनी खालच्या मजल्यावर
फटाक्याचा साठा करून ठेवला होता. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक ही आग
लागली, अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि शेलगाव परिसरात छत्रपती
संभाजीनगर-जालना महामार्गाच्या हद्दीतली अतिक्रमणं प्रशासनानं काल हटवली. सर्वोच्च
न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही
कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment