आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ ऑगस्ट २०२० सकाळी ११.००
वाजता
****
अयोध्येत आज श्रीराम मंदिराचं
भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मोदी यांचं थोड्यावेळापूर्वीच
लखनऊ इथं आगमन झालं असून, काही वेळात ते हेलिकॉप्टरने अयोध्येकडे प्रस्थान करतील. या
सोहळ्यासाठी उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातले १७५
मान्यवर रामजन्मभूमी परिसरात दाखल झाले आहेत. आकाशवाणीवरून सकाळी अकरा वाजून ४० मिनिटांपासून
या सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन प्रसारित केलं जाणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
अठ्ठावन्न जणांचा अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यात ग्रामीण भागातले ३३ तर महानगर
पालिका हद्दीतल्या २५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातली कोरोना विषाणू
बधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार ३६८
कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ३ हजार
३४७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेना
उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्याच्यावर खाजगी रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे उपचार सुरू होते. अनिल
राठोड यांनी सलग पाच वेळा अहमदनगर जिल्ह्याचे आमदारपद भूषवले होते.
****
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव
पाटील निलंगेकर यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे. एक कुशल प्रशासक आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाला लातूर जिल्हा पोरका झाला,
या शब्दांत देशमुख यांनी निलंगेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
सातारा जिल्ह्यात काल पडलेल्या
मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी साठ्यात सहा दशलक्ष घनमीटर वाढ झाली आहे. सध्या
धरणात ६० पूर्णांक २८ दशांश घन मीटर इतका पाणीसाठा झाला आहे.
****
No comments:
Post a Comment