Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा; लाल
किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘सप्तधारा’ संकल्पनेवर पंतप्रधानांचा भर
· विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची
भूमिका बजावेल मुख्यमंत्र्यांना विश्वास
· मराठवाड्यात विविध कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
· महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५
· परळी वैजनाथ इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला
समारंभ आणि भूमिपूजन
आणि
· श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ‘वृक्षप्रसाद योजना’
सुरू
****
देशभरात ८० वा स्वातंत्र्यदिन
काल उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या
तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी, कृषी
आणि अन्न प्रक्रिया,
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, दळणवळण, संरक्षण
क्षेत्रात आत्मनिर्भरता,
हरित आणि सागरी अर्थव्यवस्था आणि आरोग्य मनोरंजन पर्यटन या
‘सप्तधारा’ संकल्पनेवर विशेष भर दिला. ते म्हणाले...
बाईट – पंतप्रधान नरेंद्र
मोदी 01
१४० कोटी देशवासियांच्या पुरुषार्थाच्या
बळावर 'विकसित भारत २०४७'
चं स्वप्न साकार करु, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त
केला. देशाच्या विकासाला नवी गती देण्यासाठी राष्ट्राला सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर
करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, स्वातंत्र्यानंतर
पहिल्यांदाच वंदे मातरम् हे गीत लाल किल्ल्यावर गायलं गेलं. याविषयी पंतप्रधान म्हणाले...
बाईट – पंतप्रधान नरेंद्र
मोदी 02
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या
युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा पंतप्रधानांनी
केली. जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहीती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान
स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. पूर्वीच्या नक्षल प्रभावित
भागात आता विकास,
विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र
ही देशाची स्टार्टअपची राजधानी झाली असून, राज्यात गुंतवणूक आणि रोजगाराच्या
संधी वाढत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या
हस्ते पुण्यातल्या विधान भवन इथं तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते
मुंबईत विधान भवनात ध्वजारोहण झालं. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले...
बाईट- उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
****
मराठवाड्यातही झेंडावंदनासह
दुचाकी फेऱ्या,
देशभक्तीपर गीतगायन आदी कार्यक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात
साजरा झाला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून
स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठवाड्यात
सर्वत्र ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा
पवार यांच्या हस्तेबीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचा मुख्य
शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर केलेल्या भाषणात पवार यांनी बीड
जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. त्या
म्हणाल्या...
बाईट- उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार
**
छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय
शिरसाट यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं.ध्वजारोहणानंतर
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर
महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या सहाय्यासाठी अत्याधुनिक यंत्रांचं लोकार्पण शिरसाट
यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलतांना शिरसाट यांनी, देशाच्या अस्मितेसाठी
सर्वांनी एकजुटीने सज्ज राहण्याचं आवाहन केलं..ते म्हणाले...
बाईट- छत्रपती
संभाजीनगरचे पालकमंत्री
संजय शिरसाट
**
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुंडे यांनी
जिल्हा वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिल्ह्यात सुरू असलेल्या
विविध विकास कामांचा आढावा घेतला.
**
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांगणात
पालकमत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. समाजकल्याण
विभागाच्या स्टॉलचे लोकार्पण तसंच जल सप्ताहाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं.
**
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर
बोलताना पालकमंत्र्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत
केल्याचं सांगत, शासन यापुढेही सर्वसामान्य शेतकऱ्याबरोबर असल्याचं आश्वस्त केलं.
**
लातूर इथं जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ‘नोकरी शोधणारी पिढी नव्हे, तर उद्योग आणि
रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी
भारत बास्टेवाड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हुतात्मा सैनिकांच्या
वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी दोन हेक्टर जमीन प्रदान करण्यात
आली.
**
नांदेड इथं पालकमंत्री अतुल
सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. या सोहळ्यास
महापौर कविता मुळे,
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री सावे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील
विकास कामांची माहिती देत शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख केला.
**
धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय
ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, सर्व अधिकारी तसंच
लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.धाराशिव जिल्ह्यातील वीस शालेय विद्यार्थ्यांची
नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
**
सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी, उल्लेखनीय सेवा देणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या
हस्ते गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त भारत तसंच मृद
आणि जलसंधारणाची सामुहिक शपथही आजच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर देण्यात आली.
**
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉा विजय
फुलारी यांच्या हस्ते,
स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर
चासकर यांच्या हस्ते
तर परभणी इथं
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ
इंद्र मणी मिश्रा
यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते काल महाडीबीटी पोर्टलवर नव्यानं २९ योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. यामुळे
महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही
टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणं अधिक सोपे होईल, असा
विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ
इथं पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ६३४ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या
महाविद्यालयात सुसज्ज इमारत, वसतिगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा
आणि संशोधन केंद्र उभारलं जाणार असून आजूबाजूच्या
५० ते १०० गावांतल्या जनावरांवर आधुनिक उपचार परळीतच होतील, दूध
उत्पादन वाढवणं आणि फायदेशीर शेळीपालनावर संशोधन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. पशुसंवर्धन
मंत्री पंकजा मुंडे,
आमदार धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अभिषेक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी
‘वृक्षप्रसाद योजना’ कालपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. या उपक्रमांतर्गत
भाविकांना वृक्षप्रसादाच्या स्वरूपात रोप देण्यात येत आहे. भाविकांनी हा वृक्षप्रसाद
स्वीकारून शक्य असलेल्या ठिकाणी त्याचं रोपण आणि संगोपन करावं, असं
आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
हवामान
राज्यात आज पुणे, सातारा
आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसराला आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा
यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment