Saturday, 29 July 2017

PRASANGIK 29.07.2017

AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी केंद्रीय कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज औरंगाबाद इथं केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन पवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या शारदाबाई पवार मुलींच्या वसतीगृहाचा कोनशिला समारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३०४ धावांनी जिंकला. भारतानं पहिल्या डावातल्या ६०० आणि दुसऱ्या डावातल्या २४० धावांच्या बळावर श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी ५५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ २४५ धावात सर्वबाद झाला. रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन, तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात १९० धावा करणारा शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यासोबतच भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी मिळवली आहे. या मालिकेतला दुसरा सामना तीन ऑगस्टपासून कोलंबो इथं सुरु होणार आहे. 

****

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या दोन आणि बहुजन समाज पक्षाच्या एक विधान परिषद सदस्याने सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. हे तीन आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. समाजवादी पक्षाचे बुक्कल नवाब आणि यशवंत सिंग आणि बसपाचे जय वीर सिंग अशी या राजीनामा दिलेल्या आमदारांची नावं आहेत. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत लखनऊमध्ये हे सदस्य भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

****

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करत असून, या मंत्र्यांचा पटण्यामध्ये राजभवनात शपथविधी सध्या सुरु आहे. या नव्या मंत्रीमंडळात ३५ आमदार शपथ घेत आहेत.  

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

येत्या हंगामात येणारं सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी होणार नसल्याची माहिती कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. ते आज लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सोयाबीनचे भाव स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आतापासूनच प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. सोयाबिनला चांगला भाव देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयातीवर आयात शुल्क वाढवून, आयात शुल्क आणि ग्राहकांना मिळणारा दर याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या जोडवाडी इथले शेतकरी मंचक इंगळे यांचा आज सकाळी उजनी पाटीजवळ अपघाती मृत्यू झाला, ते पीकविमा भरण्यासाठी घाटनांदूरकडे निघाले होते.

दरम्यान, संथ वेबसाईटमुळे पीकविमा भरताना खूप अडचणी येत आहेत, सर्व कामं सोडून दिवसरात्र संगणक केंद्राच्या बाहेर थांबावं लागत असल्यानं, शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरु असून मंचक इंगळे यांच्या मृत्यूस प्रशासनाची नियोजनशून्यता कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

****

पीक विमा भरताना शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम घेणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा बीड जिल्हा प्रशासनानं दिला आहे. शेतकऱ्यांचे पीक अर्ज दाखल करताना आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून वीमा रकमेव्यतिरिक्त आणखी रक्कम मागितली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा इशारा दिला आहे. या अर्जासाठी प्रती अर्ज २४ रुपये हे अनुदान शासनामार्फत देण्यात येत आहे.

****

जायकवाडी धरणातला पाणीसाठा ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासात सुमारे २० दशलक्ष घनमीटरनं वाढ झाली असून, धरणातला जिवंत पाणी साठा ९१२ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. हे प्रमाण धरणाच्या एकूण साठवण क्षमतेच्या ४२ पूर्णांक चार टक्के आहे. धरणात सध्या ४४ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.

****

AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2017 13.00.mp3

Text-AIR News Bulletin, Aurangabad 29.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जुलै २०१७ दुपारी १.००वा.

****

अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं ‘रोस वॅली चीट फंड’ घोटाळ्याप्रकरणी २९३ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या चीट फंड घोटाळ्यात पश्चिम बंगाल आणि ओडिशामधल्या हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि बिहार, कोलकातासह काही राज्यातल्या महत्वाच्या भुखंडांचा समावेश आहे. याप्रकरणात ईडीनं एकूण एक हजार ९५० कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

****

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला न्यायालयानं गुन्हेगार म्हणून घोषित केलं असून, त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास सुरूवात केली असल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणा - एन आय एनं नवी दिल्ली इथं सांगितलं. सध्या एन आय ए नाईकची दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि विदेशातून अवैधरित्या मिळालेल्या आर्थिक पुरवठ्याबाबत चौकशी करत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एन आय एनं नाईकविरोधात अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता.

****

गुजरात काँग्रेसनं आमदारांना काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये हलवलं आहे. येत्या आठ तारखेला राज्यसभेसाठी मतदान होणार असून, त्यामध्ये पक्ष उमेदवाराला या आमदारांचं मत सुनिश्चित करण्यासाठी गुजरात काँग्रेसनं हे पाऊल उचललं आहे. गुजरातमध्ये एकूण १८८ पैकी काँग्रेसचे ५७ आमदार असून, ४४ आमदार हे बंगळूरूमध्ये दाखल झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एन आय एनं काश्मीर खो-यात नुकतीच फुटीरवादी नेत्यांना केलेली अटक हे तात्पुरतं पाऊल असून, ही समस्या सोडवण्यासाठीची कायमस्वरुपीची उपाययोजना नसल्याचं, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली असून, खो-यामधल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार्या घटनेच्या ३७० या कलमामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करता कामा नये, असंही त्या म्हणाल्या.  

****

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज पाळण्यात येत आहे. वांघांच्या संरक्षणासाठी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड - जागतिक वन्यजीन निधीच्या अहवालानुसार, सध्या जगात तीन हजार ८९० वाघ असून, सगळ्यात जास्त अडीच हजार वाघ भारतात आहेत.

****

भारतीय व्यवस्थापन संस्था - आय आय एम वर असलेलं केंद्रीय मंत्रीमंडळाचं नियंत्रण कमी करुन अशा संस्थांना स्वायत्तता देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. ते नवी दिल्ली इथं बोलत होते. यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या विधेयकामुळे प्रतिष्ठित संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप मर्यादित राहणार असल्याचंही ते म्हणाले. भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७ हा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं ते म्हणाले.

****

संपूर्ण देशात आतापर्यंत एकंदर ७१९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ७६६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत खरीपाच्या पेरण्या झालेल्या क्षेत्रात यंदा सुमारे साडे पंचवीस लाख हेक्टरनं वाढ झाली असल्याचं कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.

****

राज्यात सहा हजार ७४२ सुश्रुषा गृहांमध्ये कायद्याच्या विविध तरतुदींचं उल्लंघन झालं असून, या सर्व केंद्रांना सहा महिन्यांत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात आलं असल्याचं, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल विधानसभेत सांगितलं. विविध पॅथलॅब - प्रयोगशाळांमध्ये काम करणारे पॅथॉलॉजिस्ट आणि तंत्रज्ञ प्रशिक्षित असावेत, तसंच सुश्रुषा गृहांमध्ये असलेल्या पॅथलॅबचं नोंदणीकरण बंधनकारक करण्यात येणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

****

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल तीन हजार तीस रुपये हमी भाव मिळतो, त्या पेक्षा अधिक दर मिळवून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.

*****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद १०७ धावा झाल्या होत्या. मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, भारतानं आपला दुसरा डाव २४० धावांवर घोषित केला. दुसर्या डावात कर्णधार विराट कोहलीनं १०३, अभिनव मुकुंदनं ८१ धावा केल्या. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी ४४३ धावांची आवश्यकता आहे.

****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 29 July 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:   29؍جولائی  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 مہاراشٹر میں 30؍ طلباء سے کم تعدادوالے ضلع پریشدکے تیرہ ہزاراسکولوں کوبندکرنے کافیصلہ واپس لے لیاگیاہے۔وزیرتعلیم ونودتائوڑے نے کل قانون سازاسمبلی میںیہ اعلان کیا۔حزبِ اختلاف رہنمارادھاکرشن ویکھے پاٹل کی جانب سے اٹھائے گئے اس معاملے پربولتے ہوئے تائوڑے نے کہا کہ غیر قانونی طورپرچل رہے اسکولوں پرکاروائی کرکے وہاں کے طلباء کونزدیکی تسلیم شدہ اسکولوں میںضم کیاجائے گا۔اس دوران تائوڑے نے طلباء کوآگاہ کرتے ہوئے کہا کہ ریاست میںخانگی کوچنگ انسٹی ٹیوٹ کی جانب سے جاری Integrated کورسیزجون2018 کے بعد سے ختم کردئیے جائیںگے اس لئے طلباء ایسے کالجوں میںداخلہ نہ لیں۔تائوڑے نے کہا کہ گیارہویں اوربارہویں جماعت کی سائنس شاخ کانصاب CBSE کی طرزپرتیارکیاجائے گا۔تائوڑے نے مزیدکہا کہ قومی سطح کے امتحانات کی تیاری کومدنظر رکھتے ہوئے گیارہویں اوربارہویں سائنس کے نصاب میںضروری تبدیلیاں کی جائیںگی۔
****************************
 دل کی بیاریوں کے آپریشن کے لئے استعمال ہونے والے آلات جراحی کی قانون کے مطابق قیمت طئے کی جائے گی اور ان آلات کے دوبارہ استعمال پرپابندی عائدکی جائے گی۔غذااورادویات کی فراہمی کے رِیاستی وَزیرگریش باپٹ نے کل قانون سازاسمبلی میںیہ اِطلاع دی۔اُنہوں نے کہا کہ ان آلات کودوبارہ استعمال کرنے والے سات بڑے اَسپتالوں کے خلاف مقدمہ درج کیاگیاہے۔
****************************
 متنازعہ اسلامی مبلغ ڈاکٹر ذاکرنائیک کوقومی تفتیشی ایجنسی این آئی اے نے مفرورقراردے دیاہے۔این آئی اے نے ڈاکٹر نائیک کی سو کروڑ روپیوں کی جائیدادیں ضبط کرنے کابھی حکم دیاہے۔جس پرکاروائی شروع کردی گئی ہے۔
****************************
 پارلیمانی کارکردگی کے 50 سال پورے ہونے پرسابق مرکزی وَزیرزِراعت اورنیشنلسٹ کانگریس پارٹی کے قومی صدرشردپوارکاآج اورنگ آبادمیںعوامی اِستقبال کیاجائے گا۔ٹرانسپورٹ کے مرکزی وَزیرنتن گڈکری کے ہاتھوں پوارکااِستقبال کیاجائے گا۔تقریب میںرِیاستی قانون سازاَسمبلی اِسپیکرہری بھائوباگڑے سمیت کئی سرکردہ شخصیات شرکت کریںگی۔اورنگ آبادشہرکے دیوگیری کالج کے احاطے میںدوپہرتین بجے تقریب کاانعقاد کیا جائے گا۔
****************************
 گئورکشاکے نام پربھیڑکے ذریعے ہورہے تشددکے خلاف کل اورنگ آبادمیںمہاراشٹر مسلم عوامی کمیٹی کی جانب سے دھرنااِحتجاج کیاگیا۔ دھرنے میںمعروف سماجی خدمتگارسوامی اَگنی ویش اورشاعرعمران پرتاپ گڑھی نے بھی شرکت کی۔
 ڈویژنل کمشنردفترپرہوئے اِس اِحتجاج کے بعدڈویژنل کمشنرکومطالباتی محضرپیش کیاگیا۔اِحتجاج کے منتظم فیضان رَضوی نے یہ اِطلاع دی۔
****************************
 فلم اداکاراندرکمارقلبی حملے کے بعدکل علی الصبح ممبئی میںچل بسے ۔ وہ 44؍ برس کے تھے۔اندرکمارنے معصوم ،کنوارا، باغی ، گج گامتی،کہیں پیار نہ ہوجائے،ماں تجھے سلام، تم کونہ بھول پائیںگے، بیٹنگ گیسٹ اوروانٹیڈجیسی کئی ہندی فلموں میںاپنی اداکاری کے جوہردیکھائے۔
****************************
 اورنگ آبادکے پیٹھن میںواقع جائیکواڑی ڈیم کاآبی ذخیرہ چالیس فیصد تک جاپہنچاہے۔ڈیم کی آبی سطح میںگذشتہ 24؍گھنٹوں میں قریب 18؍ملین گھن میٹرکااضافہ ہواہے۔فی الوقت ڈیم میں سات ہزارکیوسک گھن فٹ فی سیکنڈ کے حساب سے پانی کی آمدکاسلسلہ جاری ہے۔ناسک ضلع میں کل رات سے ہورہی بارش کی وجہہ سے ناندور،مدھیشوربندھارے سے 24؍ہزارگھن فٹ فی سیکنڈ پانی چھوڑاجارہاہے۔ناسک ضلع کے دیگر ڈیمس سے بھی پانی چھوڑے جانے کی وجہہ سے جائیکواڑی ڈیم میںآبی ذخیرہ مزیدبڑھنے کاامکان ہے۔
****************************
 ٹرانسپورٹ کے مرکزی وزیرنتن گڈکری آج پربھنی لوک سبھا حلقہ انتخاب کے مختلف ترقیاتی کاموں کاافتتاح کریںگے۔پربھنی ضلع کے پرتور تعلقے کے واٹورپھاٹے میںان کاموں کاافتتاح عمل میںآئے گا۔آبی فراہمی صفائی کے ریاستی وزیرببن رائو لونیکرنے کل پربھنی میںمنعقدہ اخباری کانفرنس میںیہ اطلاع دی۔لونیکرنے بتایا کہ ترقیاتی کاموں کے لئے چارہزارکروڑروپیوں کی رقم منظورکی گئی ہے۔جن میں9؍راستوں کے کاموں کی آج شروعات ہوگی اورانہیں آئندہ دوسالوں میںمکمل کرلیاجائے گا۔
****************************
 خواتین کے عالمی کپ کرکٹ مقابلوں میںبہترین کارکردگی کامظاہرہ کرنے والی تین خواتین کھلاڑیوں، پونم رائوت، سمرتی مندھانااورمونا میشرام کے لئے وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے فی کس 50؍لاکھ روپیوں کے انعام کااعلان کیاہے۔قانون سازاسمبلی میںکل وزیراعلیٰ کی جانب سے خواتین ٹیم کومبارکباددینے والی قراردادبھی منظورکی گئی۔
****************************
 سری لنکا کے ’’گال‘‘ میںجاری پہلے کرکٹ ٹسٹ میںکل تیسرے دن کاکھیل ختم ہونے تک بھارت نے اپنی دوسری اننگزمیںتین وکٹ پر 189؍ رن بنالئے تھے۔ابھینومکند81؍رن بناکرآئوٹ ہوئے جبکہ ویراٹ کوہلی 76؍ رن پرکھیل رہے ہیں۔شیکھر دھون اورچتیشورپجاراجلدی ہی آئوٹ ہوگئے۔اب بھارت کو498؍ رن کی سبقت حاصل ہے۔اورابھی اس کے سات وکٹ باقی ہیں۔
 اس سے قبل میزبان سری لنکاکی ٹیم 291؍ رن پرآئوٹ ہوگئی۔
****************************

29.07.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...