Tuesday, 30 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी सचिन अहीर यांचा महायुतीकडून अर्ज; महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे.एम.अभ्यंकर यांना उमेदवारी

·      बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत सरकार अनुकूल

·      वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

·      इंधनाच्या विक्री तसंच वितरणावर घातलेले निर्बंध केंद्र सरकारकडून रद्दबातल

आणि

·      राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला सुरूवात

****

विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आज अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे.एम.अभ्यंकर यांनी, तर महायुतीकडून सचिन अहीर यांनी अर्ज दाखल केला. अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करुन हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आता आवश्यकता भासल्यास उद्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत, सचिन अहीर यांचं स्वागत केलं. त्यांच्या येण्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं, एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले -

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गिरणी कामगारांचे प्रश्न आणि गृहनिर्माण क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि जनतेशी असलेली बांधिलकी लक्षात घेता सचिन अहिर यांची उपसभापतिपदासाठीची उमेदवारी अत्यंत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गो-हे यांनी दिली आहे.

दरम्यान, सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं, ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं, ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला.

****

गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, तसंच बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्यं करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

****

राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी, यासाठी या परीक्षांसाठी संगणकाधारित परीक्षा अर्थात CBT पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. या परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू, असंही ते म्हणाले.

****

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SoP तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. या समितीचा अहवाल चार ते सहा महिन्यांत घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा, अशी विनंती केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत ३० जून, म्हणजे आजपर्यंत होती. मात्र, अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ करण्यात आली आहे.

****

पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे एक जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

****

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलेल्या कारवाईत नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्रनिर्मितीचं साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफचं अभिनंदन केलं.

****

येत्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येत्या १० जुलैपासून श्री विठ्ठल-रुक्मिणीचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात येणार आहे. मंदिर परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

****

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत येत्या २९ जुलै पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात एक लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.

****

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत घरभेटीद्वारे गणना प्रपत्र भरण्याच्या महत्त्वपूर्ण मोहिमेला बीड जिल्ह्यात आज प्रत्यक्ष प्रारंभ झाला. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन केला. घराघरात जाऊन नागरिकांना गणना प्रपत्राचं महत्त्व समजावून सांगत त्यांनी स्वतः अर्ज वितरण आणि पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील, असं आश्वासन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या आरापूर, सुलतानाबाद आणि गवळी शिवरा या गावातल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ७६२ हेक्टर जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत.

****

येत्या सप्टेंबरमधे जपानमधे होणाऱ्या आशियाई क्रीडास्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीतकौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल.

****

हवामान

मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट तर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 30 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२६ दुपारी १.०० वा.

****

विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे.एम.अभ्यंकर यांनी, तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केले. अहिर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाल्या शिवसेनेत प्रवेश करुन हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. या अर्जांची आता छाननी होत असून, त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल.

दरम्यान, सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं, ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं.

****

गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्यं करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. अल्पवयीन बालकांना फूस लावून, पैसे देऊन, शस्त्र दिलं असेल तर सदर व्यक्ती घटनास्थळी नसली तरी त्यांनीच गुन्हा केला आहे असे समजून त्यांच्यावर कारवाईची तरतूद असणारी सुधारणा कायद्यात केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रीय विश्लेषणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

**

२०२३ ते मे २०२६ या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर चार घटना घडल्या, तर सक्तीच्या धर्मांतराची एक घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने तिथं काम करणाऱ्या तरुणींशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं.

**

महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत परफॉर्मन्स परवाना घेऊन त्यावर डान्सबार चालत असल्याचं निदर्शनास आलं असून, हे थांबवण्यासाठी, डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील, अशी दुरुस्ती यंदाच्याच अधिवेशनात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत आणू, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

**

राज्यात चाळीस टक्क्यांहून अधिक वीज गळती अथवा चोरी असणाऱ्या शहरात खासगी वितरण व्यवस्था सुरू केल्यावर हे प्रमाण निम्म्याहून कमी आलं आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता.

**

दरम्यान, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

****

संरक्षण दल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ समाप्त झाला. आज नवी दिल्लीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चार दशकांहून अधिक काळ भारतीय सेनेत काम करणं हे आपलं सौभाग्य होतं, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण दल प्रमुखपदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत.

****

राज्याच्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्रकुमार गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी हिला बिहारच्या पटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परिक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या, त्या बिजेंद्रकुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे चार अन्य आरोपी फरार असून, ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

****

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत येत्या २९ जुलै पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात एक लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.

****

पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास, संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर शहर आणि परिसरातल्या दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२० ठिकाणी भेटी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 30 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री तसंच वितरणावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने काल यासंदर्भात घोषणा केली. देशातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२ जून रोजीचा आदेश उद्या एक जुलै पासून मागे घेण्यात आला आहे.

****

राज्यशासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातली माहिती बँकेच्या शाखेत देण्याचं आवाहन सहकार विभागाने केलं आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचं सहकार विभागाचं नियोजन आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातल्या सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक तसंच जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

****

राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली. याअंतर्गत येत्या २९ जुलै पर्यंत मतदान-केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या पाच ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर चार सप्टेंबर पर्यंत प्रारुप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील, आणि सात ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात एक लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सुमारे २७ लाख ७७ हजार मतदारांचं विशेष सखोल पुनरिक्षण केलं जाणार आहे.

****

सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठं यश आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पाणी फाऊंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप २०२६ स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने राज्य शासन आणि केंद्र शासन त्र्यंबकेश्वर परीसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत असून, त्या पूर्ण झाल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर इथं ६१ कोटी रूपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. त्र्यंबकेश्वर इथं दर्शन पथ, नवीन घाट, रस्ते तयार करण्यात येत असून, गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असंही नियोजन करण्यात असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाच्या ‘हीट रेसिलियंट सिटीज’ अर्थात उष्णता-रोधक शहर उपक्रमासाठी देशातल्या निवडक १२ शहरांमध्ये नाशिकची निवड झाली आहे. याअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून शहरातल्या वाढत्या उष्णतेच्या परिणामांना कमी करण्यासाठी तसंच आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपयांचं अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. या समावेशाने ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’ आता पर्यावरणीय दृष्ट्या अधिक सक्षम होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.

****

२०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघाने ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला टी–ट्वेंटी स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल.

****

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फुलर्टन इथं झालेल्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला १५-२१, २१-१६,९-२१ असा पराभव पत्करावा लागला.

****

मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्हे, विदर्भ, खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 June-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۰۳/جون ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ آئندہ برس سے اساتذہ اہلیتی امتحان (TET) آن لائن طریقے سے لیا جائے گا:اسکولی تعلیم کے ریاستی وزیر کا اعلان۔
٭ بے موسم بارش سے متاثرہ کسانوں کی امداد کیلئے 717 کروڑ روپے منظور؛ تاہم کانگریس نے کسانوں کی قرض معافی کو قرار دیا دھوکہ۔
٭ نصراپور میں کمسن بچی کے ساتھ جنسی زیادتی اور قتل معاملے میں ملزم کو پھانسی کی سزا۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ کے آبی ذخائر گذشتہ برس کے مقابلے کم و بیش 9 فیصد کم۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
اسکولی تعلیم کے ریاستی وزیر دادا بھوسے نے اعلان کیا ہے کہ آئندہ برس سے اساتذہ اہلیتی امتحان (TET) آن لائن طریقے سے منعقد کیا جائے گا۔ وزیرِ موصوف کل اسمبلی میں اس معاملے پر بیان دے رہے تھے۔ انھوں نے بتایا کہ امتحان کیلئے ضروری بنیادی سہولیات فراہم کرنے کیلئے چیف سیکریٹری کی صدارت میں ایک کمیٹی تشکیل دی جائے گی۔ انھوں نے تیقن دیا کہ آئندہ یہ امتحان مکمل شفافیت کے ساتھ منعقد کیے جائیں گے۔ انھوں نے بتایا کہ طلبہ کو اس بار ہونے والے TET کے دوبارہ امتحان کیلئے کوئی فیس ادا نہیں کرنی ہوگی۔
دوسری جانب TET امتحانی پرچہ افشاء ہونے کے معاملے پر اسمبلی کے دونوں ایوانوں میں ہنگامہ آرائی ہوئی۔ اسمبلی اسپیکر نے اس معاملے میں مخالف جماعتوں کی جانب سے تحریک ِ التواء کو مسترد کردیا‘ جس کے بعد مخالف جماعتوں کے اراکین نے اسمبلی سے واک آؤٹ کیا۔ وہیں قانون ساز کونسل میں اپوزیشن نے اس معاملے کی جانچ مرکزی تفتیشی ایجنسی (CBI) سے کرانے‘ وزیرِ تعلیم کا استعفیٰ اور محکمہ تعلیم کے کمشنر کو معطل کرنے کا مطالبہ کرتے ہوئے ایوان کے وسط میں آکر نعرے بازی کی، جس کے باعث ڈپٹی چیئرمین کو ایوان کی کارروئی آدھے گھنٹے کیلئے ملتوی کرنا پڑا۔
***** ***** *****
ریاست کے تمام تعلیمی بورڈوں کے تحت چلائے جارہے تمام اسکولوں میں مراٹھی زبان پڑھائی جارہی ہے یا نہیں‘ اس کی جانچ کیلئے خصوصی مہم چلائی جائے گی۔ وزیرِ تعلیم دادا بھوسے نے کل اسمبلی میں وقفہئ سوالات کے دوران یہ اطلاع دی۔ وزیرِ موصوف نے بتایا کہ عظیم شخصیات کی خدمات پر مبنی ایک نئی کتاب نصاب میں شامل کی جائے گی۔ انھوں نے ایک تحریری جواب میں وضاحت کی کہ کم طلبہ والے اسکولوں کو بند کرنے یا ضم کرنے کا کوئی بھی فیصلہ حکومت نے نہیں کیا ہے۔
***** ***** *****
رواں برس مارچ اور اپریل کے دوران ریاست کے مختلف علاقوں میں آندھی‘ ژالہ باری اور بے موسم بارش سے ایک لاکھ 22 ہزار ہیکٹر زرعی علاقہ متاثر ہوا تھا۔ امداد اور بازآبادکاری کے ریاستی وزیر مکرند پاٹل نے اسمبلی میں بتایا کہ کسانوں کو ہونے والے اس نقصان کے معاوضے کے طورپر سات لاکھ نو ہزار کسانوں کیلئے 717 کروڑ روپئے منظور کیے گئے ہیں۔
***** ***** *****
اسمبلی میں کانگریس پارٹی کے قائد وجئے وڑیٹیوار نے الزام عائد کیا ہے کہ ریاستی حکومت کی اعلان کردہ قرض معافی دراصل کسانوں کے ساتھ ایک دھوکہ ہے۔ انھوں نے اسمبلی میں ضمنی مطالبات پر بحث کے دوران کہا کہ اگرچہ حکومت 56 لاکھ کسانوں کو فائدہ پہنچانے کا دعویٰ کررہی ہے، لیکن مسلسل چار مرتبہ قرض کی بروقت ادائیگی کی سخت شرط عائد کرکے کسانوں کو الجھایا گیا ہے۔
***** ***** *****
ریاست میں غیر قانونی سود خوری کی روک تھام کے قانون کے نفاذ کے بعد اس معاملے میں اب تک ساڑھے گیارہ ہزار شکایات درج کرائی جاچکی ہیں۔ تعاون اور امدادِ باہمی کے ریاستی وزیر بالا صاحب پاٹل نے اسمبلی میں بتایا کہ 830 ہیکٹر سے زائد زمین ساہوکاروں سے کسانوں کو واپس دلائی گئی ہے اور 549 مقدمات درج کیے گئے ہیں۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
قانون ساز کونسل کے ڈپٹی چیئرمین کا چناؤ آئندہ یکم جولائی کو ہوگا۔ ڈپٹی چیئرمین رام شندے نے بتایا کہ خواہش مند امیدوار آج دوپہر 12 بجے تک نامزدگی کا پرچہ داخل کرسکتے ہیں۔ انھوں نے بتایا کہ آج دوپہر ایک بجے اس خصوص میں نامزدگی کے پرچوں کی جانچ کی جائیگی۔
***** ***** *****
پونے ضلع سیشن کورٹ نے کل ضلع کے نصراپور میں بچی کے جنسی استحصال اور قتل کے معاملے میں ملزم بھیم راؤ کامبلے کو پھانسی کی سزا سنائی ہے۔ خصوصی جج ایس آر سالونکے کی عدالت نے گذشتہ 25 تاریخ کو مذکورہ ملزم کو قصوروار قرار دیا تھا۔ عدالت نے ملزم کو موت کی سزا سناتے ہوئے کہا کہ یہ جرم انتہائی ظالمانہ اور غیر انسانی ہے۔ عدالت نے اپنے فیصلے میں کہا کہ ملزم کے خلاف ساڑھے تین سالہ بچی کو جنسی تشدد کا نشانہ بنانے اور قتل کے معاملے میں پیش آئے حالات اور سائنسی ثبوت مضبوط ہیں۔ عدالت نے بتایا کہ صرف عمر سزا میں سہولت دینے کا آدھار نہیں بن سکتی۔
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے اس معاملے میں تیزی سے جانچ مکمل کرنے اور فیصلہ صادر کرنے کیلئے عدالت‘ پولس اور وکلاء کا شکریہ ادا کیا ہے۔ کل اسمبلی میں دئیے گئے ایک بیان میں انھوں نے کہا کہ اس کیس کے ذریعے ہمیں یہ تجربہ ہوا ہے کہ اگر تیز رفتاری سے کام کیا جائے تو انتہائی قلیل مدت میں عصمت ریزی کے ملزم کو پھانسی تک پہنچایا جاسکتا ہے۔ انھوں نے بتایا کہ مکمل کارروائی کی یہ مدت صرف 59 دن رہی۔ وزیرِ اعلیٰ نے متاثرہ کے اہلِ خانہ کیلئے اس موقعے پر تعزیتی کلمات کہے اور بتایا کہ اس تیز تر انصاف فراہمی سے وہ ضرور مطمئن ہوئے ہوں گے۔ وزیرِ اعلیٰ نے اس عزم کا اظہار کیا کہ آئندہ بھی اسی تیز رفتاری سے کام کرنے کی کوشش کی جائیگی۔
***** ***** *****
ناسک کے ترمبکیشور سے شری سنت نیورُتّی ناتھ مہاراج کی پالکھی کل پنڈھر پور کی جانب روانہ ہوئی۔ اس مذہبی جلوس میں 50 سے زائد دِنڈیاں اور 15ہزار سے زائد وارکری شرکت کررہے ہیں۔ اسی دوران آشاڑھی واری کے موقع پر پنڈھر پور جانے والے وارکریوں کی خدمت کیلئے وزیرِ اعلیٰ امدادی فنڈ اور خیراتی اسپتال کے امدادی مرکز کی جانب سے ”چرن سیوا“ مہم اس برس بھی جاری ہے۔ اس کے تحت صحت کی جانچ، ابتدائی طبّی امداد اور دیگر طبّی سہولیات فراہم کی جارہی ہیں۔ 11 اضلاع سے گذرنے والی پالکھی کے راستوں پر تقریباً 400 آرام گاہیں شامل ہیں۔
***** ***** *****
یکم اپریل 2019 سے پہلے رجسٹر کی گئی تمام گاڑیوں پر ہائی سیکوریٹی رجسٹریشن نمبر پلیٹ (HSRP) لگوانے کی آخری تاریخ آج ختم ہورہی ہے۔ اس سلسلے میں ضوابط کی خلاف ورزی کرنے والوں پر یکم جولائی سے موٹر وہیکل قانون کے ساتھ سخت کارروائی کی جائیگی۔ البتہ جن گاڑی مالکان نے آج 30 جون تک HSRP لگوانے کیلئے آن لائن طریقے سے وقت حاصل کرلیا ہے انھیں عارضی طور پر جرمانے سے راحت دی گئی ہے۔
***** ***** *****
گنّے کی کٹائی کرنے والے مزدوروں اور ان کے خاندانوں کے مسائل کے حل کیلئے انتظامیہ اور غیر سرکاری تنظیموں کو باہمی تال میل سے کام کرنا چاہیے۔ جالنہ کی ضلع کلکٹر آشیما متّل نے اس سلسلے میں منعقدہ ایک ضلعی سطح کے اجلاس میں یہ بات کہی۔ اس موقع پر انھوں نے گنّے کے مزدوروں کیلئے علیحدہ شناختی کارڈس جاری کرنے کیلئے نیا طریقہئ کار وضع کرنے کی ہدایت دی۔
***** ***** *****
پربھنی ضلع کے جنتور تعلقے کے گاؤں کسر میں محکمہ زراعت کی جانب سے BBF ٹکنالوجی کے ذریعے سویا بین کی کاشت کا عملی مظاہرہ کیا گیا۔ ضلع کی نگراں وزیر میگھنا ساکورے بورڈیکر نے مذکورہ کھیت کا دورہ کیا۔ اس موقع پر انھوں نے کسانوں سے جدید زرعی ٹکنالوجی کو اپنانے کی اپیل کی۔
***** ***** *****
ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر یونیورسٹی کے مجموعی فنڈ سے تنخواہ پر یونیورسٹی کے مختلف 38 شعبہ جات میں اساتذہ کی 116 آسامیوں پر تقرری کی جائیگی۔ آج سے آئندہ 15 جولائی تک آن لائن درخواستیں طلب کی گئی ہیں۔ امیدواروں کا انتخاب تحریری امتحان اور انٹرویو کے ذریعے ہوگا۔
***** ***** *****
لاتور ضلع شہری اور دیہی علاقوں میں بغیر اجازت لگائے گئے غیر قانونی ہورڈنگز، پوسٹروں اور بینروں کے خلاف ضلع انتظامیہ، میونسپل کارپوریشن اور پولس نے مشترکہ مہم شروع کی ہے۔ اس سلسلے میں اب تک 16‘ ایف آئی آر درج کی جاچکی ہیں۔
***** ***** *****
ناندیڑ ضلع مرکزی امدادِ باہمی بینک کے 23 ڈائریکٹرز کے انتخاب کیلئے نامزدگی داخل کرنے کا آج آخری دن ہے۔ اب تک تین موجودہ ارکانِ اسمبلی سمیت 84 امیدوار اپنے نامزدگی کے پرچے داخل کرچکے ہیں۔
***** ***** *****
ناندیڑ ضلع میں آج سے تقریبا 27لاکھ 77 ہزار رائے دہندگان کیلئے SIR یعنی خصوصی نظرِ ثانی مہم کا آغاز ہورہا ہے۔ اس کے تحت 29جولائی تک حکومت اہلکار گھر گھر جاکر متعلقہ فارم پُر کریں گے۔
***** ***** *****
اس برس موسمی بارش مانسون کے آنے میں تاخیر کے باعث مراٹھواڑہ کے آبی ذخائر میں گذشتہ برس کے مقابلے تقریباً 9 فیصد کمی آئی ہے۔ خطے کے 11 بڑے آبی منصوبوں میں اوسطاً 33 فیصد قابلِ استعمال پانی باقی ہے۔ پیٹھن کے جائیکواڑی ڈیم میں پانی کا ذخیرہ 21 فیصد سے کم ہے۔ جبکہ گذشتہ برس آج ہی کے دن یہ ذخیرہ 41 فیصد تھا۔ وہیں مانجرا اور ماجل گاؤں آبی منصوبوں میں 19 فیصد‘ نمن دودھنا ڈیم میں 25 فیصد‘یلدری ڈیم میں سب سے زیادہ 51.46 فیصد جبکہ سدھیشور ڈیم میں قابلِ استعمال پانی کا ذخیرہ نہ کے برابر ہے۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ آئندہ برس سے اساتذہ اہلیتی امتحان (TET) آن لائن طریقے سے لیا جائے گا:اسکولی تعلیم کے ریاستی وزیر کا اعلان۔
٭ بے موسم بارش سے متاثرہ کسانوں کی امداد کیلئے 717 کروڑ روپے منظور؛ تاہم کانگریس نے کسانوں کی قرض معافی کو قرار دیا دھوکہ۔
٭ نصراپور میں کمسن بچی کے ساتھ جنسی زیادتی اور قتل معاملے میں ملزم کو پھانسی کی سزا۔
اور۔۔۔٭ مراٹھواڑہ کے آبی ذخائر گذشتہ برس کے مقابلے کم و بیش 9 فیصد کم۔
***** ***** *****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      पुढील वर्षापासून ऑनलाईन टीईटी घेणार-शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच

·    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ७१७ कोटी रुपये मंजूर, तर कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची काँग्रेसची टीका

·      नसरापूर बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

आणि

·      मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे नऊ टक्क्यांनी घट

****

शिक्षक पात्रता परीक्षा – टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. काल विधानसभेत त्यांनी टीईटीसंदर्भात निवेदन सादर केलं. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. फेरीपरीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट- शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

 

दरम्यान, टीईटी पेपर फुटीप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

विधानपरिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं, आदी मागण्या करत, हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं.

****

राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं.

****

यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका एक लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी सात लाख नऊ हजार शेतकऱ्यांना ७१७ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात दिली.

****

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला, तरी चार वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही, अशा कठोर अटी घालून सरकारने शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

****

राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून साडे ११ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. ८३० हेक्टर पेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून, ५४९ गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली.

****

विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या एक जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेचच दुपारी एक वाजता होईल, असं सभापतींनी सांगितलं.

****

पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला काल फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गेल्या २५ तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. साडे तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत, केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयाने नमूद केलं.

प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकीलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत काल यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात विणेकरी, टाळकरी यासह ५० हून अधिक दिंड्या आणि १५ हजार वारकरी सहभागी झाले आहेत.

**

दरम्यान, आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात ११ प्रमुख जिल्ह्यांतून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे ४०० विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे.

****

राज्यात एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत आज संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार उद्या एक जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, आज ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी अधिकृतपणे वेळ घेतलेल्या वाहनधारकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

****

ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करावं, असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्रं देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्यावतीने बीबीएफ म्हणजेच रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक काल घेण्यात आलं. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली, तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ३८ विभागात शिक्षकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून १५ जुलै पर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून, उमेदवारांची लेखी परीक्षा, मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदन मागवण्यात आले असून यांची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स आणि बॅनर्सविरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे तीव्र मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये १६ एफआयआर दाखल करण्यात आले असून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २३ संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत तीन विद्यमान आमदारांसह ८४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

यंदा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे नऊ टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात ११ प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी ३३ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातला जलसाठा हा २१ टक्क्यांच्या खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत सुमारे ४१ टक्के जलसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव १९ टक्के, निम्न दुधना धरणात २५ टक्के, तर येलदरी धरणात सर्वाधिक ५१ पूर्णांक ४६ टक्के जलसाठा असून, सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे.

****

छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये शंभर मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...