Tuesday, 3 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०३ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस आज पाळला जात आहे. सर्वच प्रवर्गातल्या शारीरिक दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींचे अधिकार आणि त्यांची प्रकृती यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. २०३० संबंधित विकास कार्यात दिव्यांगांचा सहभाग आणि त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास हा यंदाचा या दिवसाचा विषय आहे.
****
महिलांवरचे लैंगिक अत्याचार आणि निर्भया निधीच्या वापरासंबंधी मानक संचालन प्रक्रियेवरील अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्र, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. लैंगिक अत्याचारबाबत माध्यमांमधे आलेल्या वृत्ताची दखल घेत आयोगाच्या समितीनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्भया निधीबाबत सहा आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे. तसंच निर्भया निधीची उपलब्धतता आणि गेल्या तीन वर्षात केलेल्या खर्चाचा तपशिल मागवला आहे. आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस महासंचालकाना नोटिस जारी करुन मानक संचालन प्रक्रिया आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणात ते अवलंबत असलेल्या सर्वोत्तम पद्धतीची माहिती मागितली आहे.
****
हैद्राबादमधे पशुवैद्यक महिलेवर सामुहिक लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. राज्यसभेत विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांनी महिलांविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी कायदा आणि पोलीस व्यवस्थेत बदल तसंच कठोर शिक्षेची मागणी केली.
लोकसभेतही सर्वच सदस्यांनी या क्रूर घटनेचा निषेध केला. या विषयावर चर्चा करण्याची आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी अधिक कठोर कायदे करण्याची ग्वाही सरकारनं सभागृहाला दिली.
****
नेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तान संघाशी होणार आहे. महिलांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ संघात होणार आहे. बॅटमिंटन स्पर्धेतही भारताचे महिला तसंच पुरुष संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्य पदकं जिंकून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक-03.12.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र



Regional Urdu Text  Bulletin, Aurangabad, Date : 03.12.2019, Time : 8.40 - 8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 03 December-2019
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:۳؍ دسمبر  ۲۰۱۹؁
وَقت :  ۴۰:۸۔ ۴۵:۸
***** ***** *****
مرکزی حکومت نے سبھی ریاستوںسے کہا ہے کہ وہ پیاز کی ذخیرہ اندوزی کرنے والے تاجروںکیخلاف سخت کاروائی کرے اور پیاز کا محفوظ ذخیرہ تیار کرے۔ مرکزی کابینہ کے سیکریٹری راجیو گوبا نے کل نئی دلّی میں پیاز اُگانے والی گیارہ اہم ریاستوںکے چیف سیکریٹریوں کے ساتھ ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے بات چیت کی۔ اس دوران انھوں نے یہ ہدایت دی۔ ساتھ ہی ریاستوں سے یہ بھی کہا گیا ہے کہ وہ درآمد کی گئی پیاز کی مناسب داموں پر فروخت کے انتظامات بھی کریں۔ ملک بھر میں پیاز کی بڑھتی قیمتوںپر قابو پانے کیلئے یہ اقدامات کیے جارہے ہیں۔ چیف سیکریٹری گوبا نے بتایا کہ پیاز کی عارضی قلّت کے مدِنظر پیاز کی دستیابی بڑھانے اور پیاز کی خریداری کرکے اُسے مناسب قیمت پر دستیاب کروانے کی ہدایت غذا اور اناج کی فراہمی کے محکمے کو بھی دی گئی ہے۔ دوسری جانب پیاز کی قلّت کی وجہہ سے مرکزی حکومت نے اُس کی برآمد پر روک لگادی ہے اور ایک لاکھ بیس ہزار ٹن پیاز درآمد کرنے کا فیصلہ کیا ہے۔
اس بیچ مہاراشٹر کی سب سے بڑی ناسک کی پیاز منڈی میں کل پیاز بارہ ہزار روپئے فی کوئنٹل کی ریکارڈ سطح پر فروخت ہوئی۔
***** ***** *****
مہاراشٹر کے سابق وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے بی جے پی کے رکنِ پارلیمنٹ اننت کمارہیگڑے کے ذریعے لگائے گئے الزامات سے صاف انکار کردیا ہے۔ ہیگڑے نے کہا تھا کہ گذشتہ مہینے میں دیویندر پھڑنویس نے ضروری تعداد نہ ہونے کے باوجود بھی حکومت اس لیے بنائی تھی تاکہ وہ مرکزی حکومت کے چالیس ہزار کروڑ روپئے مرکز کو لوٹا سکیں۔ اپنی صفائی میں پھڑنویس نے کہا کہ مرکزی حکومت نے نہ ہی کسی رقم کو لوٹانے کا مطالبہ کیا اور نہ ہی ریاستی حکومت نے کوئی رقم مرکز کو واپس بھیجی ہے۔
***** ***** ***** 
بھارتیہ جنتا پارٹی کی رہنما پنکجا منڈے کے سیاسی مستقبل کے بارے میں ہورہی قیاس آرائیوں کے بیچ پارٹی کے مہاراشٹر صدر چندر کانت پاٹل نے کہا ہے کہ پنکجا منڈے پارٹی نہیں چھوڑیں گی۔ پنکجا منڈے کی جانب سے اپنے سوشل میڈیا پروفائلس سے بی جے پی کا نام ہٹائے جانے کے بعد کھلبلی مچ گئی تھی، جس کے پسِ منظر میں پاٹل نے یہ وضاحت کی۔ پاٹل نے پنکجا منڈے کے بی جے پی چھوڑ جانے کی خبروں کو سرے سے خارج کرتے ہوئے کہا کہ وہ پنکجا منڈے سے رابطے میں ہیں۔ پاٹل کا کہنا تھا کہ پنکجا منڈے ودھان سبھا میں ہوئی ہار کے بعد اپنا محاسبہ کررہی ہیں، لیکن اس کا یہ مطلب نہیں ہوتا کہ وہ پارٹی چھوڑ دیں گی۔ چندرکانت پاٹل نے شیوسینا رہنما سنجے رائوت کے اُس بیان کو بھی خارج کیا جس میں رائوت نے کہا تھا کہ کئی بی جے پی رہنما شیوسینا کے رابطے میں ہیں۔ پاٹل نے کہا کہ مہاراشٹر میں حادثاتی طورپر اقتدار میں آئی حکومت اس طرح کی بے بنیاد خبریں پھیلا رہی ہے۔
***** ***** ***** 
مرکزی حکومت کی ٹیکہ اندوزی مہم ’’اِندر دھنُش‘‘ کے دوسرے مرحلے کی کل سے شروعات ہوئی۔ اس مہم کے تحت کھانسی‘ پولیو‘ ٹی بی اور دماغی بخار اس جیسی دیگر بیماریوں سے بچائوکیلئے حاملہ خاتون اور دو سال سے کم عمر بچوں کو ٹیکہ دیا جاتا ہے۔ اس کے علاوہ کچھ چنندہ علاقو ںمیں جاپانی بخار اور فلو سے بچائو کیلئے بھی ٹیکہ دیا جاتا ہے۔ مارچ 2020ء تک ملک بھر کی 27/ ریاستوں کے 272/ ضلعوں میں یہ مہم چلائی جائیگی۔ مشن اِندر دھنُش کے پہلے مرحلے کی شروعات وزیرِ اعظم نریندر مودی نے اکتوبر 2017ء میں کی تھی۔ 
***** ***** ***** 
حیدر آباد کی خاتون ڈاکٹر کی اجتماعی عصمت دری اور بعد میں جلا کر قتل کرنے کے جرم کیخلاف کل ہنگولی ضلع کے جولا بازار میں تاجروں نے کاروبار بند رکھ کے اپنا احتجاج درج کروایا۔ بلڈانہ ضلع کے کھام گائوں میں بھی خواتین تنظیموں نے آندولن کیا۔ دھولیہ میں بھی کئی ہندو تنظیموں نے مظاہرے کیے اور خاتون ڈاکٹر کے قاتلوں کو پھانسی کی سزا دینے کا مطالبہ کیا۔ اس موقع پر دھولیہ ضلع کلکٹر کو مطالباتی محضر بھی پیش کیا گیا۔
***** ***** ***** 
ہنگولی شہر میں کل ٹریفک پولس نے ہیلمٹ سختی مہم چلائی اور ہیلمٹ کا استعمال نہ کرنے والوںپر کاروائی کی۔ وہیں ہیلمٹ کا استعمال کرنے والے ٹووہیلر سواروں کا پھول دیکر خیر مقدم بھی کیا گیا۔
***** ***** ***** 
امراوتی ضلعے کے بڈنیرا میں ہونے والے تبلیغی اجتماع کیلئے ناندیڑ سے نارکھیر کے درمیان ایک خصوصی ٹرین چلائی جائیگی۔ یہ ٹرین ناندیڑ سے چھ دسمبر کو روانہ ہوگی۔ دوسری جانب یہ ٹرین 9/ دسمبر کو نار کھیر سے واپسی کا سفر شروع کرے گی۔
***** ***** ***** 
ممبئی ہائیکورٹ نے بھیما کورے گائوں تشدد معاملے میں سماجی کارکن گوتم نولکھا کو چھ دسمبر تک گرفتاری سے راحت دی ہے۔ واضح ہو کہ نولکھا سمیت کئی کارکنوںپر غیر قانونی کاروائی مخالف قانون کے تحت کیس درج ہیں۔
***** ***** ***** 
ممبئی ہائیکورٹ نے احمد نگر ضلعے کے سونئی میں 2013ء میں ہوئے تہرے قتل معاملے کے چھ میں سے پانچ ملزموں کی پھانسی کی سزا برقرار رکھی ہے۔ عدالت نے ثبوتوں کی کمی کو وجہہ بتاتے ہوئے ایک ملزم کو بری کردیا۔ واضح ہو کہ ناسک کی سیشن عدالت نے سبھی چھ ملزموں کو پھانسی کی سزا سنائی تھی، جسے ان ملزموں نے ممبئی ہائیکورٹ میں چیلنج کیا تھا۔
***** ***** ***** 

Akashwani Aurangabad Urdu Bulletin, 03.12.2019 8.40-8.45 AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.12.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ डिसेंबर २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** कांद्याची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे आणि आयात कांद्याची माफक दरानं विक्री करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश; नाशिक जिल्ह्यात कांद्याला विक्रमी भाव
** माजी मंत्री पंकजा मुंडे पक्ष सोडणार नसल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण
** रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
** इंद्रधनुष लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ
आणि
** अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई हत्याकांड प्रकरणातल्या पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयात कायम, एकजण निर्दोष
****
कांद्याची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे तसंच सुरक्षित साठा निर्माण करण्याची आणि आयात केलेल्या कांद्याची माफक दरानं विक्री करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारला दिले आहेत. नवी दिल्लीत काल केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल कांदा उत्पादक असलेल्या ११ प्रमुख राज्यांच्या मुख्य सचिवांची दूरदृश्य संवाद प्रणालीमार्फत बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. तात्पुरती टंचाई लक्षात घेऊन कांद्याची उपलब्धता वाढवण्याची तसंच कांद्याची खरेदी करून माफक दरात विक्री करण्याची सूचनाही सूचनाही त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाला केली आहे. कांदा टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असून एक लाख २० हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 
दरम्यान, राज्यात सर्वाधिक कांदा उत्पादन होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात काल कांद्याला विक्रमी प्रति क्विंटल बारा हजार रूपये भाव मिळाला. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहरण

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावात चढ – उतार काय माहित वणी इथल्या बाजार समितीत कांदयाचा आज पर्यंतच्या सर्वांत अधिक विक्रमी म्हणजे बारा हजार प्रति क्विंटल असा भाव मिळाला. तर कळवण इथं बाजार समितीत अकरा हजार रूपये भाव प्रति क्विंटल मिळाला. कमीत कमी चार हजार रुपये असे मिळाले लासलगाव बाजार समितीत मात्र उन्हाळी कांद्याची आवक घटली आहे. इथं कांद्याला आठ हजार १५२ रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. राजस्थानातील कांद्याला आवक कमी झाल्यानं स्थानिक काद्यांला मागणी मिळाली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे भाव वाढल्याचं  बाजार समितीच्या सुत्राने सांगितले.
****
भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या आरोपांचं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडण केलं आहे. फडणवीस यांना गेल्या महिन्यात केवळ केंद्र सरकारचा चाळीस हजार रुपयांचा निधी वाचवण्यासाठी बहुमत नसताना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं, असं खासदार हेगडे यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं कोणत्याही निधीची मागणी केली नाही आणि राज्य सरकारनं कोणताही निधी पाठवला नाही, असं फडणवीस यांनी या संदर्भात म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंडे यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रतिमेतून पक्षाचं नाव हटवल्यानं खळबळ उडाल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्या भाजप सोडतील या आशयाच्या वृत्तांचंही पाटील यांनी खंडण केलं आहे. भाजपचे नेते मुंडे यांच्या संपर्कात आहेत. त्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आत्मपरिक्षण करत आहेत, परंतु त्या भाजप सोडत आहेत, असा याचा अर्थ होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी इन्कार केला. राज्यात अपघातानं सत्तेवर आलेलं सरकार अशा निराधार बातम्या पसरवत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तीन लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे यांनी, या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं.
****
इंद्रधनुष या लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला काल सुरुवात झाली. केंद्र सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदूज्वर आणि काविळ या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी गर्भवती महिला आणि २ वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जाणार आहे. याशिवाय काही ठराविक भागांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे. आगामी मार्च २०२०पर्यंत देशभरातल्या सत्तावीस राज्यांमधल्या २७२ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई इथं २०१३साली झालेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी  सहापैकी पाच दोषी आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे, मात्र एक जणाची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. नाशिकच्या सत्र न्यायालयानं यातल्या सहाही आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती. त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. या प्रकरणात प्रकाश, रमेश  आणि पोपट  दरंदले या तीन सख्या भावांसह  गणेश ऊर्फ प्रविण दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाच जणांची फाशीची शिक्षा न्यायालयानं कायम ठेवली आहे, तर अशोक नवगिरेची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात, सोनईच्या गणेशवाडी शिवारात प्रेम प्रकरणातून धुळे जिल्ह्यातल्या तीन मजूर युवकांची या सर्व आरोपींनी अतिशय निर्दयीपणे हत्या केली होती.
***
हैद्राबाद इथं झालेल्या डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी काल हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार इथं बाजारपेठ बंद ठेऊन निषेध नोंदवण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं महिला संघटनांनी आंदोलन केलं. धुळे शहरात विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्वादी संघटनांनी निदर्शनं करून डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना फाशीची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. 
****
हिंगोली शहरात काल वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबवली. हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवरही यावेळी कारवाई करण्यात आली. हेल्मेटधारी वाहनचालकांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या पंतप्रधान मातृवंदन योजनेचा जालना जिल्ह्यातल्या प्रथम गरोदर आणि स्तनदा माता मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या २२ हजार ८१५ महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत सात कोटी ५९ लाख १३ हजार रूपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काल संध्याकाळी कळमनुरी तालुक्यातल्या वारंगा फाटा, तोंडापूर आणि वसमत तालुक्यातल्या कौंडा परिसरात संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हलका पाऊस झाला. या पावसामुळे तूर आणि कापूस पीके धोक्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथून सुटणाऱ्या श्रीगंगानगर-नांदेड - श्रीगंगानगर या साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक या दोन्ही एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डब्बा तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्यात आला असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा इथं होणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या इज्तेमासाठी नांदेड ते नारखेर दरम्यान एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही गाडी नांदेड इथून सहा डिसेंबर रोजी सुटेल, तर परतीच्या प्रवासात ती नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नारखेर इथून सुटेल.
****
येत्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.
****
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना सहा डिसेंबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. नवलखांसह इतर काही कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल आहे.
****
धुळे तालुक्यातल्या नकाणेवार गावालगत पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करणाऱ्या धुळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम यांच्या पथकावर काल हल्ला करण्यात आला. यात तहसिलदार कदम आणि अन्य एक जण जखमी झाला आहे. धुळे जिल्हा तलाठी संघानं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरुद्ध निदर्शनं केली.
****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक - 03.12.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक - 03.12.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...