Tuesday, 29 May 2018

“राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या” यह और अन्य समाचार सुनने के लिए इस लिंक पर क्लिक करें

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 29.05.2018 - Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली. राज्य मंडळाकडून फेब्रुवारी -मार्चमध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यात कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार आणि वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा निकाल मंडळाच्या www.maharashtraeducation.com या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. याशिवाय इतरही सहा संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. या वर्षी ८६ पूर्णांक सात टक्के इतका निकाल लागला असून एकूण चार विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या चौघांनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.

****

राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, आणि औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील शास्तीच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार आता - ० ते ६०० चौरस फुटाच्या निवासी बांधकामाला - शास्ती माफ करण्यात आली असून, ६०१ ते १००० चौरस फुटाच्या निवासी बांधकामाला - मालमत्ता कराच्या ५० टक्के इतकी शास्ती करण्यात आली आहे तर १००१ चौरस फुटापेक्षा अधिक निवासी बांधकामाला सध्याच्याच दरानं शास्ती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.



अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांसाठी असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण तसंच स्वाभिमान योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार रेडिरेकनरची किंमत अधिक २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा तरीही जमीन मिळत नसल्यास २० टक्क्यांच्या पटीत १०० टक्केपर्यंत म्हणजेच रेडिरेकनरच्या दुपटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. जिरायतीसाठी कमाल मर्यादा आता प्रतिएकरी पाच लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी आठ लाख रूपये एवढी करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची ३३ पदं आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्यावर आज दुपारी रवाना झाले. दोन जूनपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात पंतप्रधान हितसंबंधांसंदर्भात या देशांच्या प्रमुख नेत्यांशी बातचीत करतील. तसचं विविध विषयांवर करार केले जाणार आहेत.

****

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या राजनंदगाव जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यात एका उप कमांडरचा समावेश आहे.

*****

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातल्या अनेक भागात काल रात्री जोरदार वादळ, पाऊस, गारपिट आणि वीज पडून झालेल्या दुर्घटनांमुळे ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. दरम्यान, दक्षिण पश्चिमी मान्सून आज केरळात दाखल झाला. येत्या ४८ तासांत तो संपूर्ण केरळमध्ये पोहोचेल.

****

राज्यातल्या सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार असून हे क्षेत्र १९ टक्क्यांवरून ४० टक्के होणार असल्याची माहिती केंद्रीय जल संसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत समर्थनासाठी संपर्क या भारतीय जनता पक्षाच्या अभियानाच्या निमित्तानं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्याचार वर्षात भाजपानं केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

****

औरंगाबादेत ऑनलाईन खरेदी करून मागविलेल्या तलवार, चाकूसह इतर २८ शस्त्रास्त्र कुरीअर कंपनीच्या कार्यालयावर छापा मारुन पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरात नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रास्त्र मागवण्यात आली असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणात कुरीअर कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाला अटक केली असून, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. दरम्यान, औरंगाबाद पोलीस आयुक्तपदाचा पदभार चिरंजीव प्रसाद यांनी स्वीकारला. यानंतर बोलताना त्यांनी शहरातील धार्मिक सलोखा कायम राखण्यावर भर राहणार असल्याचं सांगितलं.

****

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इंथल्या मंडळ अधिकाऱ्यास आठ हजार रूपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ अटक केली. विष्णू जायभाये, असं लाच घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून, वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

****

एक जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचा विरोध असल्याची माहिती समितीच्या वतीनं देण्यात आली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक आज औरंगाबाद इथं झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१८ दुपारी १.०० वा.

****



 प्रधान मंत्री मुद्रा योजना जाहीर केल्या पासून बँका आणि वित्तीय संस्थांनी आतापार्यंत १२ कोटी युवकांना ६ लाख कोटी रूपये कर्जाचं वाटप केलं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. १२ कोटी लाभार्थ्यांपैकी २८ टक्के म्हणजेचं ३ कोटी २५ लाख युवकांनी पहिल्यांदाच उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज घेतलं आहे. या लाभार्थ्यांमध्ये ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी महिलांचा समावेश आहे. तर यातील ५५ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू झाली होती. या योजनेतंर्गत विनासहकारी, सुक्ष्म, लघु उद्योगांच्या उभारणीसाठी १० लाख रूपयांचं कर्ज बँका, वित्‍तीय संस्थार्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे

*****



 केंद्रीय माध्यमिक मंडळ- सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लिंक झाली होती. यात सहभागी विद्यार्थ्यांची यादी दिल्ली पोलिसांनी सीबीएसईकडे आज पाठवली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी २७ आणि २८ मार्च रोजी विद्यार्थी आणि खाजगी शिकवणी चालकांविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. प्रश्नपत्रिका लिंक झाल्यामुळे बारावीच्या अर्थशास्त्र विषयांची पुर्नपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. तर दहावीच्या गणित विषयाची पूर्नपरीक्षा घेण्यास सीबीएसईनेच विरोध दर्शविला होता.



 दरम्यान, सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

****



 जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या पाच अदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्‍येकी २५ लाख रूपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करता आले नाही.  त्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी दहा लाख रूपयाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

****



 तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्याच्या चेंजेरला इथं आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची एक बस विरूद्ध दिशेनं येणाऱ्या लॉरीला धडकून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यु झाला तर १५ जण जखमी झाले. ही बस वारंगलहून करीमनगरला जात होती.

*****



 दक्षिण पश्चिम मॉनसून आज केरळ मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागान, येत्या २४ तासात अंदमान, निकोबार, केरळ, कर्नाटकचा तटवर्ती भाग, तसंच तमिळनाडू इथं जोराचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.   दरम्यान, विभागानं या वर्षी देशात ९७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

****

 गेल्या वर्षीच्या जुलै मध्ये लागू करण्यात आलेल्या वस्तु आणि सेवा कराच्या कायद्यात शेतकऱ्यांशी संबधित कर आकारणीच्या नियमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. कृषि, मत्स्य, पशुपालन यासारख्या सेवांना  वस्तु आणि सेवा करातून मुक्त ठेवण्यात आलं असल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

 औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले  चिरंजीव प्रसाद आज दुपारनंतर आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. काल त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. प्रसाद सध्या नांदेड परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक पदी कार्यरत आहेत.

****

 जागा नसल्यानं हिंगोली बाजार समितीत गेल्या गुरूवार पासून  बंद करण्यात आलेली हळद खरेदी कालपासून पुन्हा सुरू झाली. सध्या चार हजार क्विंटलच्या जवळपास हळद विक्रीसाठी दाखल झाली असून  प्रतिक्विंटल सात हजार ते साडे सात हजार रूपये  भाव असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.

****

 गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात साठ लहान मोठ्या तलावांमधून  आतापर्यंत तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ काढण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या ३१७ गावांतल्या ३३५ तलावांची गाळ काढण्यासाठी  निवड करण्यात आली आहे.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2018_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



२९   मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापुर या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या दौऱ्यात पंतप्रधान परस्पर हितसंबंधां संदर्भात या देशांच्या प्रमुख नेत्यांशी बातचीत करतील.

****

 देशभरातल्या सर्व सरकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी उद्यापासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. पगारवाढी संदर्भात गेल्या १६ मे पासून या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहेत. दरम्यान, राज्यातल्या जवळपास ५५०० सरकारी बँकांचे ३२ हजाराहून अधिक कर्मचारी आणि ८००० अधिकारी या संपात सहभागी होत आहेत.

****

 राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्यास, सहमत असल्याचं, निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. केंद्रीय माहिती आयोगानं यासंदर्भात तीन जून २०१३ रोजी जारी केलेल्या निर्णयाशी आपण सहमत असून, राजकीय पक्षांना मिळणारी वर्गणी आणि त्यांचे वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, माहिती अधिकाराच्या कक्षेत आणले जाणार असल्याचं, निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

 कापडी पिशव्यांच्या वापरावर प्रत्येकानं भर द्यावा, असं आवाहन, औरंगाबादचे  जिल्हाधिकारी, आणि जिल्हा पर्यावरण समितीचे अध्यक्ष उदय चौधरी यांनी केलं आहे. जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. समितीनं वर्षातून दोन ऐवजी चारवेळेस बैठक घ्यावी, तसंच समितीच्या मान्यतेनं औरंगाबाद शहरात हवा प्रदूषणाची गुणवत्ता दर्शवणारा फलक तत्काळ लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

 झिंकच्या कमतरतेनं होणाऱ्या अतिसाराला नियंत्रित करण्यासाठी पाच वर्षाखालील बालकांना ९ जूनपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवाड्यांतर्गत ओआरएसच्या पाकिटांचं वाटप करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढाकार घेऊन पंधरवडा यशस्वी करावा, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अतिसार नियंत्रण पंधरवडा बैठकीत ते बोलत होते.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 May 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹  ؍مئی  ۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 مہاراشٹر کی بھنڈا را-گوندیا اور پال گھر لوک سبھا حلقوں کے ضمنی انتخا بات کے لیے کل ووٹ ڈالے گئے۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ بھنڈا را - گوندیا حلقے میں42.25؍ فیصد اور پال گھر میں قریب47؍ فیصد رائے دہی ہو ئی۔ دو نوں حلقوں کے کئی مقا مات پر الیکٹرونک ووٹِنگ مشینوں کے بند پڑ جا نے کی شکا یتیں سامنے آئیں جسکے بعد اِن مقا مات پر نئی ووٹِنگ مشینوں کو لا یا گیااور رائے دہی کا عمل معمول کے مطا بق جاری رہا۔
 اِس بیچ کانگریس،NCP اور ریپبلیکن پارٹی آف اِنڈیا، بہو جن مہا سنگھ نے مطالبہ کیا ہے کہ جن مقا مات پر ووٹِنگ مشینوں میں خرا بی آئی تھی وہاں دو بارہ رائے دہی کر وائی جائے۔ سا بق مرکزی وزیر پر فُل پٹیل نے دعویٰ کیا کہ بھنڈا را- گوندیا حلقے میں25؍ فیصد ووٹِنگ مشینیں بند پڑی رہیں۔
اُنھوں نے الزام لگا یا کہ ووٹِنگ کے بعد نکلنے والی پر چیVVPAT کی مشینیں بھی ٹھیک طرح سے کام نہیں کر رہی تھیں۔
 دوسری جانب کانگریس کے ریاستی صدر اور  رکن پارلیمنٹ اشوک چو ہان نے ووٹوں کی گنتی کے موقع پر VVPAT رسیدوں کی بھی گنتی کر نے کا مطالبہ کیا۔ اِس دوران مرکزی انتخا بی کمیشن نے وضا حت کی کہ بھنڈا را- ٰؑ گوندیاانتخا بی حلقے کے کسی بھی رائے دہی مرکز پر کی گئی ووٹِنگ کو ردّ نہیں کیا گیا ہے۔ کمیشن نے کہا کہ تکنیکی خرابی کی شکار ووٹِنگ مشینوں کو عام طور پر آدھے گھنٹے میں تبدیل کر لیا جا تا ہے اور اِس وجہ سے رائے دہی کے عمل پر شکوک و شبہات کا اظہار نہیں کیا جا سکتا۔
 دوسری جانب سانگلی ضلع کے پلوس کڑے گائوں ودھان سبھا حلقے کے لیے بھی کل ووٹ ڈالے گئے۔ یہاں بی جے پی کے امید وار کی جانب سے اپنی امید واری واپس لیے جانے کے بعد کانگریس کے وشوجیت کدم بلا مقا بلہ منتخب ہو گئے ہیں۔
***** ***** *****
 موسمی بارش کے آج شام تک کیرالہ میں داخل ہو نے کا امکان ہے۔ محکمہ موسمیات کے ایڈیشنل ڈائریکٹر جنرل Mrutyunjay Mahapatra
نے یہ اطلاع دی۔ اُنھوں نے بتا یا کہ فی الحال کیرا لہ میں بارش جیسے حالات بنے ہوئے ہیں لیکن مو سمی بارش کی کچھ شرائط ابھی پو ری نہیں ہو ئی ہیں۔
 دوسری جانب ایک پرائیویٹ مو سمیاتی تنظیم Skymet کا کہنا ہے کہ موسمی بارش کل ہی کیرا لہ میں داخل ہو چکی ہے۔ اِس دوران اگلے36؍ گھنٹوں میں وسطی مہاراشٹر اور مراٹھواڑہ میں تیز ہوائوں اور بجلی کی گھن گرج کے ساتھ بارش ہو نے کی پیشن گوئی محکمہ مو سمیات نے کی ہے۔
***** ***** *****
 دریںاثناء مراٹھواڑہ کے کچھ مقا مات پر کل بھی بارش ہوئی۔ لاتور ضلع کے نلِنگا تعلقے سے کل طو فا نی ہوائوں کے ساتھ بارش کی اطلاع ملی ہے۔ ہمارے نمائندے نے بتا یا کہ تیز ہوائوں سے گھروں کی چھتیں اُڑگئیں اور بجلی کے کھمبے اور درخت اُکھڑ گئے۔
 عثمان آباد ضلع کے تُلجا پور اور پرنڈا میں بھی کل موسلا دھار بارش ہوئی۔ اِس بارش سے کچھ گھروں کوبھی نقصان پہنچا۔ ہنگولی ضلعے کے بسمت تعلقے کے گِر گائوں میں بھی بارش سے کیلے کے با غوں کا بڑے پیما نے پر نقصان ہوا ہے۔ کسا نوں کی جانب سے اِس نقصان کے فوری پنچنا مے کر نے کا مطا لبہ کیا جا رہا ہے۔
***** ***** *****
 CBSE کے دسویں جماعت کے نتیجوں کا آج اعلان ہو گا۔ طلباء آج شام چار بجے سے CBSE کی ویب سائٹ
www.cbse.nic.in  پر اپنے نتیجے دیکھ سکتے ہیں۔
***** ***** *****
 رکن اسمبلی امیت دیشمکھ نے کہا ہے کہ لاتور کے رابطہ وزیر سنبھا جی پاٹل نِلنگیکر کو چا ہیے کہ وہ لاتور کے خواتین پالی ٹیکنِک کالج سے متعلق غیر یقینی صو رتحال سے پردہ اُٹھا ئیں۔ امیت دیشمکھ نے کہا کہ حا لانکہ نِلنگیکر اور وزیر تعلیم کہہ چکے ہیں کہ مذکو رہ پالی ٹیکنِک کالج بند نہیں ہو گا
تا ہم انتظا میہ کی جانب سے اِسے بند کر نے کا عمل جاری ہے۔ دیشمکھ نے اِسے حکو مت اور انتظا میہ کے در میان تا ل میل کی کمی قرار دیتے ہوئے سخت نکتہ چینی کی۔ اُنھوں نے کہا کہ حکو مت پا لی ٹیکنِک کالج سے متعلق غیر یقینی صورتحال کو دور کر تے ہوئے اِسے بند کر نے کے عمل پر فوری روک لگا ئے۔
***** ***** *****
 اورنگ آ باد میں اٹھا رہ دن پہلے ہوئے فسادات سے متا ثرہ کئی چھو ٹے دکانداروں میں جماعت اسلامی ہند کی جانب سے کل قریب ساڑھے تیرہ لاکھ روپیوں کی امداد تقسیم کی گئی۔
 دریں اثناء اورنگ آ باد شہر کے پولس کمشنر کے عہدے پر ناندیڑ رینج کےIG چرنجیو پر ساد کو نامزد کیا گیا ہے۔ اِس بارے میں سر کا ری حکم نا مہ کل جا ری کر دیا گیا۔ چِرنجیو پر ساد نے اِس سے پہلے اورنگ آ باد اور جالنہ میں پولس سُپرنٹنڈنٹ کے طور پر خد مات انجام دی ہیں۔
***** ***** *****
 پیٹرول اور ڈیزل کی برھتی قیمتوں کے خلاف کل اورنگ آ باد میں نیشنلِسٹ کانگریس پارٹی کی یُوک کانگریس کی جانب سے مظا ہرے کیئے گئے۔ احتجاج میں شامل کار کنوں نے سر کار مخالف نعرے بازی کر تے ہوئے ایندھن کی قیمتوں میں ہو رہے اضا فے کو واپس لینے کا مطالبہ کیا۔اِس دوران ایندھن کی قیمتوں میں آج لگا تار 16؍ ویں دن بھی اضا فہ ہواہے۔
***** ***** *****
 کپڑے سے بنی ما حو ل دوست تھیلیوں کے استعمال کی اپیل اورنگ آ باد کے ضلع کلکٹر اور ضلع ماحو لیاتی کمیٹی کے صدر اُدئے چو دھری نے کی ہے۔ وہ کل ضلع ما حو لیاتی کمیٹی کی میٹنگ میں بول رہ تھے۔ اِس موقع پر ضلع کلکٹر نے ضلع ما حو لیاتی کمیٹی کی میٹِنگ سال میں دو کی بجائے چار مر تبہ منعقد کر نے اور کمپٹی کی منظوری سے اور نگ آباد شہر میں آب و ہوا کے معیار کو ظا ہر کر نے والا بو رڈ فوری آ ویزاں کر نے کی ہدا یت بھی دی۔
***** ***** *****
 جلگائوں ضلعے کے عمل نیر میں زراعت کے محکمے نے قریب سوا دو لاکھ روپیوں کے نقلی بیج ضبط کیئے ہیں۔ محکمہ زراعت اور پولس کی اِس مشتر کہ کار وائی میں چو پڑہ مارگ سے چار افراد کو حراست میں بھی لیا گیا ہے۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...