Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल
उद्या, बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे प्रभारी
सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी दिली. राज्य मंडळाकडून फेब्रुवारी -मार्चमध्ये बारावीची
परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची
परीक्षा दिली होती. यात कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार
आणि वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हा निकाल मंडळाच्या
www.maharashtraeducation.com या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. याशिवाय इतरही सहा
संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ -सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला.
या वर्षी ८६ पूर्णांक सात टक्के इतका निकाल लागला असून एकूण चार विद्यार्थ्यांनी देशात
पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या चौघांनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.
****
राज्यातल्या
महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, आणि औद्योगिक नगरी अधिनियमात अनधिकृत बांधकामावरील
शास्तीच्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत
घेण्यात आला. यानुसार आता - ० ते ६०० चौरस फुटाच्या निवासी बांधकामाला - शास्ती माफ
करण्यात आली असून, ६०१ ते १००० चौरस फुटाच्या निवासी बांधकामाला - मालमत्ता कराच्या
५० टक्के इतकी शास्ती करण्यात आली आहे तर १००१ चौरस फुटापेक्षा अधिक निवासी बांधकामाला
सध्याच्याच दरानं शास्ती करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
अनुसूचित
जाती आणि नवबौद्ध घटकातल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांसाठी असलेल्या कर्मवीर दादासाहेब
गायकवाड सबलीकरण तसंच स्वाभिमान योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ
करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार रेडिरेकनरची किंमत अधिक
२० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा तरीही जमीन मिळत नसल्यास २० टक्क्यांच्या पटीत १०० टक्केपर्यंत
म्हणजेच रेडिरेकनरच्या दुपटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. जिरायतीसाठी कमाल मर्यादा
आता प्रतिएकरी पाच लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी आठ लाख रूपये एवढी करण्यात
आली आहे.
नैसर्गिक
आपत्तीत तत्काळ मदतीसाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यासही या बैठकीत
मान्यता देण्यात आली.
नागरी
स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची ३३ पदं आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी
प्रशासनाकडे देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्यावर आज दुपारी
रवाना झाले. दोन जूनपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात पंतप्रधान हितसंबंधांसंदर्भात या देशांच्या
प्रमुख नेत्यांशी बातचीत करतील. तसचं विविध विषयांवर करार केले जाणार आहेत.
****
महाराष्ट्र
राज्याच्या सीमेवर असलेल्या राजनंदगाव जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत
तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यात एका उप कमांडरचा समावेश आहे.
*****
बिहार,
झारखंड आणि उत्तर प्रदेशातल्या अनेक भागात काल रात्री जोरदार वादळ, पाऊस, गारपिट आणि
वीज पडून झालेल्या दुर्घटनांमुळे ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
दरम्यान, दक्षिण पश्चिमी मान्सून आज केरळात दाखल झाला. येत्या ४८ तासांत तो संपूर्ण
केरळमध्ये पोहोचेल.
****
राज्यातल्या
सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होणार असून हे क्षेत्र १९ टक्क्यांवरून ४० टक्के होणार असल्याची
माहिती केंद्रीय जल संसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते आज मुंबईत समर्थनासाठी
संपर्क या भारतीय जनता पक्षाच्या अभियानाच्या निमित्तानं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी गेल्याचार वर्षात भाजपानं केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
****
औरंगाबादेत
ऑनलाईन खरेदी करून मागविलेल्या तलवार, चाकूसह इतर २८ शस्त्रास्त्र कुरीअर कंपनीच्या
कार्यालयावर छापा मारुन पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरात नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या
पार्श्वभूमीवर ही शस्त्रास्त्र मागवण्यात आली असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणात कुरीअर
कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाला अटक केली असून, गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. दरम्यान,
औरंगाबाद पोलीस आयुक्तपदाचा पदभार चिरंजीव प्रसाद यांनी स्वीकारला. यानंतर बोलताना
त्यांनी शहरातील धार्मिक सलोखा कायम राखण्यावर भर राहणार असल्याचं सांगितलं.
****
जालना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अंबड तालुक्यातल्या रोहिलागड इंथल्या मंडळ अधिकाऱ्यास
आठ हजार रूपयांची लाच स्वीकारताना आज रंगेहाथ अटक केली. विष्णू जायभाये, असं लाच घेणाऱ्या
मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून, वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यानं लाचेची
मागणी केली होती.
****
एक
जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचा विरोध असल्याची माहिती
समितीच्या वतीनं देण्यात आली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक
आज औरंगाबाद इथं झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment