आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
*****
कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आज विधानसभेत
विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. निवडणुकीनंतर धर्मनिरपेक्ष जनता दलानं काँग्रेस सोबत झालेल्या आघाडीच्या बळावर कर्नाटकात सरकार
स्थापन केलं असून, इतर दोन सदस्यांसह एकूण ११७ आमदारांच्या
पाठिंब्याचा दावा त्यांनी केला आहे. आज अध्यक्षांची
निवड होईल, आणि त्यानंतर कामकाज
सुरु होईल. काँग्रेसचे रमेश कुमार आणि भाजपाचे सुरेश कुमार यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी
अर्ज दाखल केले आहेत. भाजपाचे बी एस येडियुरप्पा विधानसभेतले विरोधी पक्षनेते असतील.
****
सामान्य जनता आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना संसर्गाची
लक्षणं आणि त्याचा संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सूचना जारी केली आहे. झाडावरुन
पडलेले कच्चे खजूर, अर्धवट खाल्लेली फळं खाऊ नये, प्रतिबंधित
वहिरींपासून दूर रहावं तसंच स्वच्छ धुतलेलीच फळं खावीत अशा सूचना मंत्रालयानं जारी
केल्या आहेत. निपाह विषाणूंचा संसर्ग हा साथीचा रोग नसून, स्थानिक
पातळीवरच आढळून येतो असं आरोग्य मंत्रालयानं स्थापन केलेल्या केंद्रीय उच्च -स्तरीय
पथकानं म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या नागरिकांनी
निपाह आजाराला न घाबरण्याचं
आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी
केलं आहे. औरंगाबाद
शहर पर्यटन नगरी असल्याच्या अनुंषगानं या आजाराचा धोका लक्षात घेऊन महापौरांनी काल मनपा
वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी मनपाच्या सर्व रुग्णालयांनी सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
****
जालना जिल्ह्यात सध्या एकशे तीन टँकरनं पाणी पुरवठा सुरू
आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ४५, जाफ्राबाद २२, बदनापूर १७, जालना १४, परतूर
तीन तर घनसावंगी तालुक्यात दोन टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना
ऊस उत्पादकांचे प्रलंबित पैसे १५ ऑगस्ट पर्यंत देण्यात येतील, आश्वासन कारखान्याचे
अध्यक्ष आमदार केदा आहेर यांनी दिल्यानंतर, या कारखान्याला लावलेले टाळे शेतकऱ्यांनी
काढले आहेत. २०१७-१८ या हंगामासाठी ऊस दिल्यानंतर पैसे न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी कारख्यान्याला
टाळे लावले होते.
//************//
No comments:
Post a Comment