Monday, 1 October 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01 10 2018 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 October 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ ऑक्टोबर २०१८ दुपारी १.०० वा.

****

 राज्यात असलेल्या प्लॅस्टिक बंदीचं उल्लंघन करत अशा वस्तूंचं उत्पादन करत असलेल्या कंपन्यांवर आजपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. किरकोळ विक्रेत्यांनी घेतलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू परत घेण्याची यंत्रणा निर्माण करण्याची मुदत काल संपल्यानंतर मंडळानं हे निर्देश दिले आहेत. या वर्षीच्या २३ मार्चला राज्य सरकारनं काही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घोषित केली होती आणि ती २४ जूनपासून लागू झाली होती.

****

 स्वच्छता हा महात्मा गांधी यांच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता, असं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते राजकोटमध्ये एका सभेत काल मार्गदर्शन करत होते.  गांधीजींना स्वच्छता आणि स्वातंत्र्य यात निवड करायची असती तर त्यांनी स्वच्छतेची आधी निवड केली असती, येवढी त्यांची स्वच्छते संदर्भातील वचनबद्धता होती, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.  गेल्या चार वर्षांतील्या कार्यकाळात स्वच्छतेसंदर्भात मोठं काम झालं असल्याचं माहिती त्यांनी दिली.  स्वच्छता २०१४मध्ये केवळ ३५ टक्के होती आता ती ९५ टक्के झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटमध्ये महात्मा गांधी संग्रहालयाचं यावेळी उदघाटन झालं.  

****



 भारताचे सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या कारकीर्दीचा आज शेवटचा दिवस असून, त्यांच्या नंतर सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई येत्या तीन तारखेला शपथ घेणार आहेत.

****

 निवडणूक प्रचाराच्या काळात निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्यावर परिणाम करेल, अशा कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या मंचाचा वापर होऊ देणार नाही, असं आश्वासन गूगल या प्रमुख इंटरनेट कंपनीनं आणि  फेसबुक आणि ट्विटर या समाज माध्यमांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे. या आश्वासना संदर्भात एक छोटी प्रायोगिक चाचणी पार पडली असून, लोकसभा निवडणुकी पूर्वी एक मोठी चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी दिली आहे.

****

 या वर्षीचा पावसाळा संपल्याचं भारतीय हवामान खात्यानं घोषित केलं असून, यावर्षी देशात दीर्घकालीन सरासरीच्या एक्क्याण्णव टक्के इतक्या पावसाची नोंद झाल्याचं जाहीर केलं आहे. हा पाऊस सर्वसाधारण श्रेणीच्या खालच्या श्रेणीचा असल्याचंही हवामानखात्यानं म्हटलं आहे.पावसाळा संपला असला तरीही महाराष्ट्र आणि गोव्यात या आठवड्यात पाऊस होणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

****

 नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाच्या पथकानं धाड घालून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या सव्वीस विक्रेत्यांकडून दंड वसूल केला आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थाची विक्री होत असल्याचं दिसून आल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

 गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर काल रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत चार हरणांचा मृत्यू झाल्यानं वन्यजीव प्रेमींनी हळहळ व्यक्त केल्याचं आमच्या वर्ताहरानं कळवलं आहे. देवरी तालुक्याला लागूनच नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सीमा असून, या प्रकल्पातले वन्यजीव ज्या ठिकाणाहून नेहमी रस्ता ओलांडतात, त्या ठिकाणी उड्डाण पूल बांधावा अशी मागणी गोंदीया जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

****

 प्रख्यात कवी, लेखक आणि गीत रामायणकार ग.दि. माडगूळकर यांची आज जयंती आहे. हे वर्ष गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, गीत रामायणकार गदिमांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, अशा शब्दांमध्ये गदिमांना आदरांजली वाहिली आहे.

****

 तुर्कस्थान मध्ये झालेल्या तिरंदाजी विश्व चषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीनं महिला एकेरी गटात काल कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं पुरुष एकेरी गटात कांस्य तर मिश्र दुहेरी गटात ज्योति सुरेखा वेन्नमच्या साथीनं रौप्यपदक याआधीच जिंकल्यानं, भारताची या स्पर्धेतली पदकसंख्या तीन वर पोहचली आहे.

****

 आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाच्या, एक दिवसीय क्रिकेटच्या ताज्या मानांकन यादीमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर तर शिखर धवन पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. संयुक्त अरब अमिरातीत नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीनंतर या दोन खेळाडूंच्या मानांकनात ही सुधारणा झाली आहे. भारताचा विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

*****

  ***  

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01 10 2018 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस आहे. वृद्धजनांच्या मानवाधिकारांना आणि मूलभूत स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याबाबतची कटिबद्धता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी एक ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. या वर्षी या दिवसाचं घोषवाक्य आहे, ‘मानवाधिकारांचे अग्रदूत वृद्धजन‘.

 या दिनानिमित्त बीडच्या गोपिका ज्येष्ठ नागरिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं दिला जाणारा  जीवन गौरव पुरस्कार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर द्वारकादास लोहिया, यांना जाहीर झाला आहे.

 या दिनानिमित्त आज औरंगाबाद शहरात भारतीय स्टेट बँकेच्या शहागंज शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शाखेचे मुख्य प्रबंधक दीनबंधू रॉय यांनी दिली आहे.

****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आज असलेल्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती समाजातल्या प्रत्येक वर्गाशी घनिष्ठतेनं जोडलेले आहेत आणि त्यांच्या ज्ञानामुळे भारताला लाभ होत आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.

****



 उझबेकिस्तानचे राष्ट्रपती  शौकत मिरजियोयेह यांचं दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. आज राष्ट्रपती भवनात त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं .ते आज भारताच्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार आहेत.

****

 संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस  अँटेनिओ गुटेरस हे चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज भारतात येत आहेत. ते उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात होणार असलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे मध्ये सहभागी होतील. आपल्या या भारत भेटीत गुटेरस, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेणार असून, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या सोबत प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत.

****

 पंजाब नॅशनल बँक आर्थिक घोटाळा प्रकरणासंदर्भात सक्त वसुली संचालनालयानं फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीची, भारतासह इतर चार देशातली, सहाशे सदोतीस कोटी रुपये मूल्याची संपत्ती जप्त केली असल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.

****

 प्रख्यात चित्रपट अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं आज सकाळी मुंबईत वृद्धापकाळामुळे निधन झालं. त्या सत्त्याऐंशी वर्षांच्या होत्या.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 01.10.2018 ,Time : 8.40-8.45 am

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 01 October 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 01؍اکتوبر  ۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
***** ***** *****
مہاراشٹر کے وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے کہا ہیکہ لاتور اور عثمان آباد ضلعوں کے زلزلے سے متاثرہ خاندانوں کے اہلِ خانہ کو اُنکی ضرورت کے مطابق جگہ یا گھر دئیے جائیں گے‘ ساتھ ہی زلزلے سے متاثرہ کسانوں کی بازآباد کاری کیلئے انہیں خطۂ اراضی فراہم کی جائیگی۔
وزیرِ اعلیٰ پھڑنویس لاتور زلزلے کی برسی کے موقعے پر کل منعقدہ تقریب میں بول رہے تھے۔ تقریب میں سابق مرکزی وزیرِ دا خلہ شیوراج پاٹل چاکورکر‘ NCP کے قومی صدر شردپوار‘ لاتور کے رابطہ وزیر سنبھاجی پاٹل نلنگیکر‘ عثمان آباد کے رابطہ وزیر ارجن کھوتکر اور حزبِ اختلاف رہنما دھننجے منڈے کے علاوہ کئی سرکردہ شخصیات اور عوامی نمائندوں نے شرکت کی۔
وزیرِ اعلیٰ نے کہا کہ زلزلے سے متاثرہ علاقوں میں پینے کا صاف پانی فراہم کرنے والے اُس منصوبے کو شمسی توانائی کی مدد سے دوبارہ شروع کیا جائیگا جو بجلی بل ادا نہ کرنے کی وجہ سے بند ہوگیا ہے۔ اس موقعے پر محکمۂ جنگلات کی جانب سے بنائی گئی یادگار پر خراجِ عقیدت پیش کیا گیا۔ تقریب سے خطاب کرتے ہوئے NCP صدر شردپوار نے لاتور زلزلے کی تباہی کو یاد کیا۔ وہیں شیوراج پاٹل چاکورکر نے قدرتی آفات سے نمٹنے میں اجتماعی کوششوں کی اہمیت پر زور دیا۔
***** ***** *****
وزیرِ اعظم نریندر مودی نے کہا ہیکہ بھارت کا ہمیشہ ہی امن و امان پر بھروسہ رہا ہے اور وہ اسے قائم کرنے کے اپنے عہد کا پابند بھی ہے‘ لیکن وہ خودداری اور ملکی سالمیت سے کبھی سمجھوتہ نہیں کرسکتا۔ آکاشوانی سے نشر ہوئے من کی بات پروگرام میں کل عوام سے خطاب کرتے ہوئے مودی نے یہ بات کہی۔ وزیرِ اعظم نے کہا کہ بیسویں صدی میں لڑی گئی دو عالمی جنگوں میں ایک لاکھ بھارتی فوجیوں نے اپنی جانیں قربان کیں‘ حالانکہ ان جنگوں سے بھارت کا کوئی تعلق نہیں تھا۔ مودی نے کہا کہ اقوامِ متحدہ کی اَمن فوجوں میں سب سے بڑا کردار نبھانے والے ملکوں میں بھارت پیش پیش ہے اور دنیا میں امن قائم کرنے میں بہادر بھارتی فوجی دہائیوں سے اہم کردار نبھا رہے ہیں۔ پاکستان کی جانب اشارہ کرتے ہوئے مودی نے کہا کہ دہشت گردی کی آڑ میں درپردہ جنگ کرنے والوں کو بھارتی فوج نے 2016ء میں سرجیکل اسٹرائیک کے ذریعے منہ توڑ جواب دیا ۔ سرجیکل اسٹرائیک کے ضمن میں ملک بھر میں مختلف مقامات پر فوج کی جانب سے نمائش کا انعقاد کیا گیا ہے۔ اس کا مقصد نوجوانوں کو بھارت کی طاقت اور عوام کی حفاظت کیلئے فوج کے جذبے سے واقف کروانا ہے۔مودی نے کہا کہ 8/ اکتوبر کو ’’ایئر فورس ڈے‘‘ منایا جائیگا۔ وزیرِ اعظم نے 1947,1965,1971 اور 1999ء میں بھارتی فضائیہ کی دلیرانہ کاروائیوں کا بھی ذکر کیا۔
***** ***** *****
پاکستان کے شہر پشاور میں 2014ء میں آرمی پبلک اسکول پر ہوئے دہشت گردانہ حملے میں بھارت کا ہاتھ ہونے کے پاکستانی الزام کی بھارت نے سخت تردید کی ہے۔
اقوامِ متحدہ میں تعینات بھارتی افسر انعام گمبھیر نے کہا کہ پاکستان کی جانب سے اس طرح کا الزام عائد کرنا حملے میں جان گنوانے والے بچوں کی یادوں سے توہین کے مترادف ہے۔ گمبھیر نے اقوامِ متحدہ کی جنرل اسمبلی میں پاکستان کے وزیرِ خارجہ شاہ محمود قریشی کی جانب سے بھارت پر لگائے گئے الزامات کا بھرپور جواب دیا۔ انھوں نے کہا کہ پاکستان کے سبھی الزامات بے بنیاد ہیں اور ان کا مقصد صرف پڑوسی ممالک میں عدم استحکام پھیلانا ہے۔
***** ***** *****
 اورنگ آباد میں کل دھنگر سماج کو ریزرویشن دلانے کیلئے دھنگر یلغار کانفرنس منعقد کی گئی تھی۔ قانون ساز اسمبلی اسپیکر ہری بھائو باگڑے کے ہاتھوں کانفرنس کا افتتاح عمل میں آیا۔ کانفرنس میں دھنگر سماج کو درجِ فہرست ذاتوں اور جماعتوں کے زمرے میں شامل نہ کرنے اور ریزرویشن سے محروم رکھنے پر شدید ناراضگی کا اظہار کیا گیا۔ اس دوران چرواہوں کے گھروں پر ہورہے ڈاکہ زنی کے واقعات اور خواتین پر ہونے والے جنسی مظالم کے مدِنظر اُنکے خاندان کو ذاتی دفاع کیلئے بندوق رکھنے کی اجازت دینے کا بھی مطالبہ کیا گیا۔ اس موقعے پر ریاست بھر سے آئے دھنگر سماج کے افراد نے اپنے روایتی لباس میں کانفرنس میں شرکت کی۔
***** ***** *****
سینئرسٹی زن کا بین الاقوامی دن آج منایا جارہا ہے۔ اس موقعے پر مختلف پروگراموں کا انعقاد کیا گیا ہے۔ اس سلسلے میں بھارتی اسٹیٹ بینک کی شاہ گنج شاخ میں وظیفہ یاب افراد کیلئے مفت طبّی کیمپ منعقد کیا گیا ہے۔ بینک کے چیف مینیجر دین بندھو رائے نے یہ اطلاع دی۔ یہ کیمپ صبح 10/ بجے شروع ہوگا۔
اورنگ آباد ضلع پنشنرس اسوسی ایشن کے وسنت سبنیس اور مستجب رضوی نے سبکدوش افراد سے مفت کیمپ سے فائدہ اُٹھانے کی اپیل کی ہے۔
***** ***** *****
 مدکھیڑ۔ ناندیڑ۔ پربھنی ریلوے ٹریک کو ڈبل لائن کرنے کا کام تیزی سے جاری ہے۔ اس لیے 4/ سے 9/اکتوبر کے درمیان اس روٹ پر ٹرینوں کی آمد و رفت ٹھپ رہیگی۔ اس دوران کچھ ٹرینیں منسوخ کردی گئی ہیں جبکہ کچھ ٹرینیں تاخیر کے ساتھ دوسرے روٹ پر چلیں گی۔ ریلوے کے تعلقاتِ عامّہ محکمے نے یہ اطلاع دی ہے۔
***** ***** *****
 غذائیت کی کمی سے آنے والی نسل کو بچانے اور انہیں صحت مند اور باصلاحیت بنانے کیلئے مِڈڈے میل اِسکیم پر مؤثر عمل آوری کی ضرورت ہے۔ ناندیڑ کے ضلع کلکٹر ارون ڈونگرے نے یہ بات کہی۔ وہ کل ناندیڑ میں پوشن ابھیان مہاریلی سے خطاب کررہے تھے۔ اس موقع پر انھوں نے عوامی بہبود کے منصوبوں کو عوام تک پہنچانے کیلئے عوامی نمائندوں اور افسران سے پہل کرنے کی اپیل بھی کی۔
***** ***** ***** 

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01 10 2018 06 50AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 October 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ६.५० मि.

****



§  लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या भुकंपग्रस्त भागातल्या वाढीव कुटुंबियांना घर देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

§  आत्मसन्मान आणि सार्वभौमत्वाशी तडजोड न करता शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत कटिबद्ध - पंतप्रधान नरेंद्र मोदी

§  जोड व्यवसाय म्हणून महिलांनी पशुपालन करण्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे  यांचं आवाहन

आणि

§  अनुसूचित जमाती समावेश करण्याची मागणी पूर्ण होत नसल्याबद्दल धनगर आरक्षण एल्गार मेळावा आणि मेंढपाळ हक्क परिषदेत नाराजीचा सूर

****



 लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या भुकंपग्रस्त भागातल्या वाढीव कुटुंबियांना त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त जागा किंवा घर देण्यात येईल, तसंच पुनवर्सनासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार भूखंड देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.



 राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित ‘लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार’ समारंभात ते काल बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे, यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते. भुकपंग्रस्त भागातल्या पिण्याच्या पाण्यासाठी ज्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना केल्या होत्या. त्या विज बील न भरल्यामुळे बंद पडल्या आहेत. या योजना पुन्हा शंभर टक्के सौर उर्जेचा वापर करुन सुरु करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी  केली.



 यावेळी वन विभागाच्या स्मृतीस्तंभाला भेट देऊन मान्यवरांनी भुंकपात मरण पावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली.



 भारतीय जैन संघटना दुष्काळमुक्तीसाठी उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जलसंधारणाची कामं कशी करणार आहे याची माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.

आपल्या भाषणात खासदार पवार यांनी भुकंपाच्या काळातली आठवणींना उजाळा दिला. शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपत्ती व्यवस्थापनात सामुहिक कार्याला महत्व असल्याचं सांगुन आपत्तीच्या काळात कसे सहकार्य केलं याची माहिती दिली.

****



 भारताचा शांततेवर दृढ विश्वास असून, शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, मात्र आत्मसन्मान आणि  सार्वभौमत्वाशी तडजोड करून नव्हे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना बोलत होते. २०व्या शतकात जगात झालेल्या दोन युद्धांमधे एक लाख भारतीय सैनिकांनी, भारताचा याच्याशी संबंध नसतानाही आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेत मोठं योगदान देणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. जगात शांतता नांदावी यासाठी दशकांपासून शूर भारतीय सैनिक मोठी भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले.



 दहशतवादाच्या आडून छुपं युध्द पुकारणाऱ्यांना भारतीय सैन्यानं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं, असं सांगून २०१६ मधे केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याचं स्मरण देश करत आहे असं पंतप्रधान म्हणाले. या निमित्त देशात विविध ठिकाणी सैन्य दलानं प्रदर्शनं आयोजित केली आहेत. भारताच्या सामर्थ्याचं आणि जनतेचं रक्षण करण्यासाठी आपले जवान प्राणांची बाजी कशी लावतात याची जनतेला, विशेष करून युवकांना माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे. येत्या आठ ऑक्टोबरला ‘हवाई दल दिन’ साजरा होणार आहे त्याविषयी बोलतांना, १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये हवाई दलानं बजावलेल्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.



 ‘स्वच्छ भारत अभियान’ केवळ भारतातच नव्हे तर जगात यशोगाथा ठरलं आहे, असं मोदी यांनी सांगितलं. स्वच्छताविषयक जगातले सर्वात मोठं संमेलन, ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता  संमेलन’ भारतानं आयोजित केलं आहे. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि तज्ञ याला उपस्थित राहणार असून आपले अनुभव विषद करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीदिनी त्याची सांगता होणार आहे. डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तिंनी गांधीजींच्या विचारातून सामर्थ्य प्राप्त केलं. गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्याला जन चळवळीचं स्वरूप दिलं हे त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं   सर्वात मोठं योगदान आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

****



 २०१४ साली पाकिस्तानच्या पेशावरमधल्या शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या मदतीनं झाल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं खंडन केलं आहे. हा आरोप म्हणजे त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या स्मृतींचा अपमान आहे, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी एनाम गंभीर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी भारतावर केलेल्या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचे हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि शेजारील राष्ट्रांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 महिलांनी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करुन आपली आर्थिक उन्नती साधली पाहिजे, असं  राज्याच्या ग्राम विकास तथा महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे  म्हटलं आहे.    बीड जिल्ह्यात परळी इथं काल प्रथमच संगणकीय प्रणालीद्वारे होत असलेल्या  विसाव्या शासकीय   पशुगणना कार्यक्रमाचा शुभारंभ  मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आमदार आर. टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, आणि आमदार लक्ष्मण पवार, उपस्थित होते. महिला आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत सक्षम होत नाहीत, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, यासाठी महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याकरता महिलांनी नगदी उत्पन्न देणाऱ्या शेळीपालन, कुक्कुटपालन आणि  दुग्ध व्यवसाय करावा. यासाठी महिला आणि बालविकास विभागासह पशुसंवर्धन विभागातर्फे  मदत केली जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 औरंगाबाद इथं काल ‘धनगर आरक्षण एल्गार मेळावा आणि मेंढपाळ हक्क परिषद’ झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याबद्दल परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली.



 दरम्यान,मेंढपाळांच्या वाड्यांवर पडणारे दरोडे आणि त्यात स्त्रीयांवर होणारे अत्याचार लक्षात घेता या कुटुंबांच्या स्वसंरक्षणार्थ बंदुकीचा परवाना मिळणाची मागणी  परिषदेत झाली. राज्यभरातून पारंपरिक वेशभूषेत आलेले धनगर समाज बांधव यावेळी  मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****



 लातूर इथं आयोजित दोन दिवसीय १७व्या प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचा समारोप  काल जेष्ठ सामाजिक  कार्यकर्ते डॉक्टर अशोकराव कुकडे आणि सिनेअभिनेते प्रविण तरडे यांच्या उपस्थितीत झाला. अखिल भारतीय विद्यार्थ्यी परिषदेतर्फे याचं आयोजन करण्यात आलं होतं. संमेलनात काल  कथा कथन, अभिवाचन, गीतकार संदिप खरे यांची मुलाखत झाली. पथनाट्य सादरीकरण आणि विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरण करण्यात आलं.

****



 परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात स्वच्छ भारत योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयं बांधण्यात आली असून या शौचालयांचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत केलं जात आहे.  पेठ शिवनी इथले भगवान कारंजे यांनीही आपल्या घरी शौचालयाचं बांधकाम केलं आहे. या शौचालयामुळे मोठी सुविधा झाल्याचं त्यांनी सांगितलं.



मी भगवान गणपतराव कारंजे.  परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील मौजे पेठ शिवनी येथिल रहिवासी आहे. स्वच्छ भारत अभियान योजनें अंतर्गत  घरी शौचालयाचे बांधकाम केले. त्यापोटी मला शासनाकडून १२ हजार रूपये अनुदान मिळाले. या योजनेमुळे मी शौचालय बांधू शकलो. मी व माझे कुटूंब शौचालयासाठी बाहेर जाणे, त्यामुळे बंद झाले. घरी शौचालय झाल्यामुळे आमची शौचालयांची वेवस्था झाली. आमच्या कुटूंबात या मुळे समाधान लाभले. हे सर्व प्रधानमंत्र्यामुळे झाले. त्याबद्दल त्यांचे आभार.

****



 मुदखेड-नांदेड-परभणी  रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचं काम प्रगतीपथावर असून यासाठी येत्या चार ते नऊ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे विभाग काही काळासाठी रेल्वे वाहतूक बंद करणार आहे. यामुळे या काळात काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही उशिरा धावतील तर काहींच्या मार्गात बदल होईल, असं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.

****



 कुपोषणमुक्तीसह भावी पिढी सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी पोषण अभियान प्रभावी असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं काल पोषण अभियान महारॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना आणि हनी मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्या मधल्या निसर्ग परिचय केंद्रात आयोजित  कार्यक्रमात बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन मधुमक्षिका पालन पेटीचं वाटप करण्यात आलं. वन्य जीवांसाठी आरक्षित असलेल्या अभयारण्यालगतच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा आणि अभयारण्यात मानवी हस्तक्षेप थांबावा, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

*****

***

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...