Tuesday, 29 August 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017_17.25

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात विविध क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार सरदार सिंह तसंच रियो पॅरालिंपिकमध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे देवेंद्र झांझरिया यांना देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच विविध क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट कामगिरीकरता १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.

****

क्रीडा पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत पुढील वर्षापासून बदल केला जाईल असं केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीतल्या ध्यानचंद मैदानावर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आगामी वर्षापासून क्रीडा पुरस्कार निवडीसाठी एका समितीची स्थापना करण्याचा सरकार विचार करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध व्हावा या हेतूनं कांद्याचे दर कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचा विचार सरकार करत आहे. रास्त दरात पुरेसा कांदा उपलब्ध होईल या दृष्टीनं उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिल्या आहेत. केंद्रीय नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याच्या उत्पादन आणि पुरवठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात साखरेच्या किंमती वाढू नयेत म्हणून साखर कारखान्यांना पहिल्या दोन महिन्यांसाठी साठवण क्षमता निश्चित करून देण्यात आली असल्याचं पासवान यांनी सांगितलं.

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतुक सुरळीत होण्यासाठी किमान एका दिवसाचा अवधी लागेल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार रेल्वे प्रशासनाच्या संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेऊन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. आसनगाव आणि वासिंद स्थानकांच्या दरम्यान मोठा पाऊस झाल्यानं रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे डबे रुळावरून घसरले, मात्र मोठा अपघात टळला, असं सांगितलं जात आहे. या अपघातामुळे या मार्गावरच्या अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

****

मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पाऊस झाला. काल रात्रीपासून पावसानं जोर धरला असल्यानं, अनेक सखल भागात पाणी साचलं. उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाली, दृश्यमानता कमी असल्यानं, विमानसेवेवरही याचा परिणाम झाला. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं, वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, आवश्यक ते निर्देश दिले.

मराठवाड्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. परभणी जिल्ह्यात आजही जोरदार पाऊस झाला, लातूर जिल्ह्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उस्मानाबाद इथंही मोठा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

या पावसामुळे जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

अवयवदानात महाराष्ट्रानं देशात सहाव्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अवयव दानासंदर्भात जागृती व्हावी आणि अवयव दान मोहिमेत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, असं त्यांनी सांगितल.

****

वैद्यकीय संचालनालय, आयुष विभाग आणि शासकीय आरोग्य विभागाच्या वतीनं नांदेड शहरात आज महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या फेरीत पथनाट्याद्वारे अवयवदानाबाबत जागृती केली.

****




AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017_13.00

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑगस्ट २०१७ दुपारी १.००वा.

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे नऊ डबे आज सकाळी ठाण्याजवळ आसनगाव ते वासिंद दरम्यान घसरले. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून, सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं राज्य शासनानं म्हटलं आहे. आज सकाळी सुमारे साडे सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघात स्थळाहून प्रवाशांना मुंबईला आणण्याकरिता वैद्यकीय पथकासह दहा रुग्णवाहिका आणि २० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, अनेक खासगी वाहनांचीही यासाठी मदत घेण्यात आली. रेल्वेमार्गावरून डबे हटवण्याचं काम सुरू असून, यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडे जाणारी, मंगला एक्सप्रेस नाशिकरोड इथून मनमाड पुणे मार्गे एर्नाकुलमला परत गेली असून, मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस तसंच राज्यराणी एक्सप्रेस इगतपुरी इथं अडकून पडल्या आहेत. वाराणसी, कामायनीसह काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस पुणे, दौंड मार्गे वळवण्यात आली असून, पुष्पक, भागलपूर, गोरखपूर आदी अतिजलद गाड्याही लोणावळा -पुणे- दौंड मार्गे मनमाडकडे वळवण्यात आल्या आहेत. जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस मनमाडहून परत जालन्याकडे वळवण्यात आली आहे.

****

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस देशभरात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातले क्रीडापटू तसंच क्रीडाप्रेमींनी या दिनानिमित्त शुभेच्छा देत ध्यानचंद यांना अभिवादन अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात विविध क्रीडा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार सरदार सिंह तसंच रियो पॅरालिंपिकमध्ये भाला फेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे देवेंद्र झांझरिया यांना देशातला सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. याव्यतिरिक्त इतर १७ खेळाडूंना मानाचे अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कारही राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं सकाळी क्रांती चौकातून शालेय विद्यार्थ्यांनी अभिवादन फेरी काढून ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण केली. शहरातल्या विविध शाळांचे विद्यार्थी तसंच क्रीडापटू या अभिवादन फेरीत सहभागी झाले होते.

****

गणराया पाठोपाठ आज सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे. गौरीच्या मखरासह सजावटीच्या इतर साहित्यानं बाजारपेठा सजल्या असून, घराघरात उत्सवाच्या वातावरणात गौरींच्या स्वागताची तयारी सुरू आहे. उद्या घरोघरी पारंपरिक पद्धतीनं ज्येष्ठा गौरी पूजन होणार आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी इथं जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत कोसळून झालेल्या शाळकरी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी निंबोडी गावकऱ्यांनी अहमदनगर जामखेड रस्ता सुमारे चार तास रोखून धरला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, संपूर्ण शाळेचं नव्यानं बांधकाम करावं, मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या.

****

राज्या-राज्यातील गुन्हेगारांचे आणि गुन्हेगारीसंबंधीच्या माहितीची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशानं काल नागपुरात आंतरराज्यीय गुन्हे समन्वय परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील गुन्हेगारांना पायबंद घालण्यासाठी त्या राज्यातील सीआयडी अन्य राज्याच्या सीआयडी आणि पोलिसांमध्ये समन्वयक म्हणून भूमिका वठविणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत ठिकठिकाणच्या ५५० गुन्हेगारांच्या माहितीचं आदानप्रदान करून त्यांना कसं नियंत्रित करायचं, यासंबंधी काही निर्णय घेण्यात आले.

****

देशभरात अवयव दानाच्या चळवळीला गती मिळत असून, गाव पातळीवर ही मोहीम राबवण्यासाठी, आज आणि उद्या राज्यस्तरीय महा अवयव दान अभियान हाती घेण्यात आलं आहे. आज विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून गावागावात अवयव दाना विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जालना इथं ही याच अनुषंगानं, आज सकाळी, महाफेरीचं आयोजन करण्यात आलं.

****

बीड जिल्हा उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातले पदाधिकारी, तसंच नागरिकांनी शौचालय बांधून प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी केलं आहे. काल बीड इथं संवादपर्व कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छ भारत मिशन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. दोन ऑक्टोबरपर्यंत बीड जिल्हा उघड्यावर शौचापासून १०० टक्के मुक्त करण्यासाठी  स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग नोंदवावा असं, आवाहनही गोल्हार यांनी केलं.

****




AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29082017_10.00

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.08.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२९ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे नऊ वातानुकूलित डबे सकाळी पावणे सातच्या दरम्यान आसनगाव-वाशिंद स्थानकादरम्यान ईमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे रुळावरून घसरले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळं आसनगावकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचं रेल्वेप्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागपूर-मुंबई दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजेनंतर मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या आठ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

****

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कर्जदार शेतकऱ्यांनी काल लातूर-नांदेड रस्त्यावर शासकीय विश्रामगृहासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी येत्या दिवाळी सणाच्या आठ दिवस आधी संप पुकारणार आहेत. एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र मोटे यांनी औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

****

परभणी महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा, काल सभापती गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पाणीपुरवठा योजनेच्या निविदांना तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 29 August 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹ ؍اگست  .۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 تازہ خبر کے مطا بق ناگپور سے ممبئی آ رہی دُرانتو ایکسپریس آج علی الصبح پٹری سے اُتر گئی ۔ حادثے میں ٹرین کا انجن اور 4؍ ڈبّے پٹری سے اُتر گئے ہیں۔ یہ حادثہ آسن گائوں اور وا شِند کے در میان ٹِٹوالا کے قریب پیش آ یا۔
****************************
 ہر یا نہ کے ڈیرہ سچّا سودا کے سر براہ گُر میت سنگھ بابا رام رحیم کو CBI کی خصو صی عدالت نے کل عصمت دری کے دو معا ملوں میں 20؍ سال قید کی سزا سنائی ہے۔ ساتھ ہی عدالت نے با با رام رحیم پر 30؍ لاکھ روپیوں کا جر ما نہ بھی عائد کیا ہے۔اِس معاملے میں گذشتہ جمعہ کو رام رحیم کو قصور وار قرار دیئے جانے کے بعد کل CBI نے روہتک جیل میں ہی عا رضی عدالت قائم کی اور دو نوں فریقوں کے دلائل سُنے۔ اِسکے بعد عدالت نے تعز رات ہند کی دفعات376،506؍ اور509؍ کے تحت رام رحیم کو عصمت دری کے دو الگ الگ معا ملوں میں 10-10؍ سال قید اور 15-15؍ لاکھ روپیوں کی جر ما نے کی سزا سنائی۔عدالت نے یہ بھی ہد ا یت دی ہے کہ دو نوں معا ملوں کی متا ثرہ سادھویوں کو رام رحیم پر عائد 30؍ لاکھ جر ما نے سے 14-14؍ لاکھ روپئے ادا کیئے جائیں ۔
****************************
 پنجاب اور ہر یا نہ میں امن و امان کی کشیدہ صورتحال کے مد نظر امرتسر سے ناندیڑ آنے والی اور ناندیر سے امرتسر جانے والی دو نوں ٹرینیں منسوخ کر دی گئی تھیں اسلیے اِن میں سے کوئی ٹرین آج ناندیڑ نہیں پہنچے گی لیکن ناندیڑ سے امرتسر جانے والی نا ندیڑ امرتسر سچکھنڈ ایکسپریس آج اپنے مقر ر ہ وقت پر ناندیڑ سے روانہ ہو گی۔ جنوب وسطی ریلوے کے ذرائع نے یہ اطلاع دی۔
****************************
 جسٹِس دیپک مِشرا ملک کے45؍ ویں چیف جسٹِس بن گئے ہیں۔ جسٹِس مِشرا نے کل چیف جسٹِس کے عہدے کا حلف اُٹھا یا۔ صدر جمہوریہ جناب رامناتھ کو وِند نے جسٹِس مِشرا کو عہدے اور راز داری کا حلف دلا یا۔ جسٹِس مِشرا 13؍ مہینوں تک چیف جسٹِس کے عہدے پر فائز رہیں گے۔
****************************
 مہا راشٹر حکو مت نے ممبئی ہائی کورٹ کے جج جسٹِس ابھئے اوک پر لگائے گئے تعصب اور امتیازی رویہ اپنا نے کے الزا مات غیر مشروط طور پر واپس لے لیے ہیں۔ واضح ہو کہ آ واز کی آ لو دگی معا ملے میں جسٹِس ابھئے اوک نے سخت موقف اپنا یا تھا۔ جمعرات کو ہائی کورٹ میں اپنا موقف پیش کر تے ہوئے ریا ستی حکو مت نے جسٹِس ابھئے اوک پر متعصب رویہ اپنا نے کا الزام لگا یا تھا۔ حالانکہ ریاستی حکو مت نے الزا مات واپس لے لیے ہیں۔ لیکن عدالت نے حکو مت کی سرزنش کر تے ہوئے اُسے اِس معاملے میں افسوس کا اظہار کر نے والا حلف نا مہ داخل کرنے کو کہا ہے۔
****************************
 گوّا ریاستی اسمبلی کی 2؍ نشستوں کے لیے ہوئے ضمنی انتخا بات میں بھارتیہ جنتا پارٹی نے دو نوں نشسوں پر کامیابی حاصل کی ہے۔ پنجی اسمبلی حلقہ انتخا ب سے گوّا کے وزیر اعلیٰ منو ہر پرّیکر نے اور ولپوئی حلقہ انتخا ب سے بی جے پی امید وار وِشو جیت رانے  نے جیت حاصل کی ہے۔
****************************
 ریاستی تعلیمی بورڈ کی جانب سے دسویں جماعت کے لیے لیئے گئے دو با رہ امتحا نات کے نتائج کا آج دو پہر اعلان کیا جائے گا۔ نتائج دو پہر ایک بجے کے بعد سے بورڈ کی ویب سائٹ پر دستیاب ہو ں گے۔ اِن نتیجوں میں کامیا ب قرار دیئے گئے طلباء گیارہویں جماعت کے لیے جاری داخلہ جاتی عمل میں شامل ہو سکتے ہیں۔ حاصل کر دہ نمبرات کی دو با رہ جانچ کے لیے کل سے8؍ سِتمّبر تک در خواستیں داخل کی جا سکتی ہیں۔
****************************
 بیڑ ضلع میں کل لگا تار دوسرے دن بھی کئی مقا مات پر موصلا دھار بارش کا سلسلہ جار ی رہا۔ اِس با رش سے بِندو سرا ندی میں طغیا نی آ گئی۔ بِندو سرا ڈیم لبریز ہو گیا ہے۔ بیڑ ضلع کے 17؍ چھو ٹے اور 2؍ بڑے آ بی پرو جیکٹوں میں سطح آب میں اضا فہ ہوا ہے۔ بِندو سرا ندی پر بنے پرا نے پل کے مخدوش ہو جانے کی وجہ سے بنا یا گیا متبا دل پل بھی کل آئی طغیا نی میں بہہ گیا جِس سے دھو لیہ شو لا پور شا ہراہ کا رابطہ منقطع ہو گیا ہے۔
 محکمہ مو سمیات کے مطا بق آئندہ 2؍ دنوں تک طو فا نی بارش کا سلسلہ جا ری رہے گا۔ انتظا میہ نے ندی کنا رے آباد گائوں کو چو کس رہنے کا اشا رہ دے دیاہے۔
****************************
 مہا راشٹر میں کل پیش آئے 3؍ مختلف حادثوں میں 16؍ افراد کی موت ہو گئی۔ احمد نگر ضلع کے نِمبوڑی گائوں میں ضلع پریشد اسکول کی چھت گر جانے سے3؍ طلباء کی موت ہو گئی جبکہ 32؍ طلباء زخمی ہو گئے ۔ گذشتہ 2؍ دنوں سے احمد نگر میں موصلا دھار بارش کا سلسلہ جاری ہے۔ ہمارے نمائندے نے بتا یا کہ مخدوش اسکولی عما رت کی چھت بارش کی وجہ سے گر پڑی۔
  ایک دیگر حادثے میں احمد نگر ضلع کے ہی4؍ نو جوانوں کی آبشار میں گر نے سے موت ہو گئی۔ وامبو ری گھاٹ کے قریب گو کُل کُنّڈ میں یہ حادثہ پیش آیا۔
 ایک دیگر واقعے میں کل اعلی الصبح پونے-ناسک شاہراہ پر ایس ٹی بس اور ٹرک کے در میان ہوئے تصا دم میں 9؍ افراد کی موت ہو گئی۔ مہلو کین میں ایس ٹی بس میں سوار 7؍ مسا فر وں کے علا وہ ٹرک ڈرائیور اور کلینر بھی شامل ہیں۔ حادثے میں16؍ مسا فر زخمی بھی ہوئے ہیں۔
****************************
 بھارت اور چین کے در میان ڈو کلام کی وجہ سے پیدا ہوئی کشید گی کل اُس وقت ختم ہو گئی جب دو نوں مما لک نے ڈو کلام سے اپنی اپنی فو جیں واپس بلا نے کا فیصلہ کیا۔ بھارت نے کہاہے کہ تعطل کے مقام ڈو کلام سے اپنے اپنے سر حدی عملے کو واپس بلانے کا عمل تقریباً مکمل ہو گیا ہے۔ ڈو کلام میں فو جیوں کو واپس بلائے جانے سے متعلق سوا لوں کا جواب دیتے ہوئے وزا رت خارجہ کے تر جمان رویش کمار نے بتا یا کہ بھارت کا ہمیشہ موقف رہا ہے کہ اسطرح کے معا ملات پر اختلاف کو صرف سفا رتی ذرائع سے ہی دور کیا جا سکتا ہے۔ اُنھوں نے کہا کہ بھا رت کا یہ مو قف رہا ہے کہ سر حدی معا ملوں پر سمجھو تے اور مفا ہمت نامے ہوئے ہیں اُنکا احترام کیا جا نا چا ہیے۔
****************************

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...