आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Tuesday, 29 January 2019
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.01.2019....Evening Bulletin
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्र
सरकारनं नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित सहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय
आपत्ती निवारण निधीतून सात हजार कोटी रुपये अतिरिक्त सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला
आहे. यात महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी चार हजार ७१४ कोटी
रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश,
आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ
सिंह यांच्या अध्यक्षतेखालच्या एका उच्चस्तरीय समितीनं हा निधी देण्यास मंजुरी दिली.
****
लोक
आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली. यामुळे लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकतील. सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.
गावातल्या
मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्यास,
उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतल्या
नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के फरकाची रक्कम
देण्यासही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
एकात्मिक
नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट
देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता
दिली.
औद्योगिक
वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर अधिमूल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास
परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून
घेण्यास मदत होणार आहे.
२०१५
मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी
२०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६६ मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली.
****
कृत्रिम
बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातल्या सर्वच घटकांच्या सहभागामुळे
आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज चौथ्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी
जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली असल्याचं ते म्हणाले.
****
माजी
केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी विद्यासागर
राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जॉर्ज फर्नांडीस
हे स्वातंत्र्योत्तर काळातले कामगार आणि कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते होते, असं राज्यपालांनी
आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. देशातल्या कामगार चळवळीचे प्रणेते फर्नांडीस यांच्या
निधनानं आपण एक महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्त्व गमावल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी
त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
****
प्रजासत्ताक
दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप आज बीटिंग द रीट्रिट
कार्यक्रमानं होत आहे. ऐतिहासिक विजय चौकात हा कार्यक्रम होत असून, लष्कर, नौदल, हवाई
दल, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे बँड्स एकूण २७ रचना त्यात सादर
करत आहेत.
****
बालमृत्यू
तसंच कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातल्या नवजात बालकांना देण्यात येणार्या
‘मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट’ या योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा
मुंडे यांच्या हस्ते आज झाला. शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या
प्रसुतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे कीट मोफत देण्यात येणार आहे.
बालमृत्यू, कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीनं ही योजना महत्वपूर्ण ठरेल,
असं मुंडे यावेळी म्हणाल्या.
****
भारत
आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान माऊंट मौंगानुई इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय
सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या
संघानं भारतीय संघाला १६२ धावांचं लक्ष्य दिलं, हे लक्ष्य भारतीय महिलांनी ३६व्या षटकातच
पूर्ण केलं. स्मृती मानधनानं ९०, तर मिताली राजनं ६३ धावा केल्या. तीन सामन्याच्या
मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
विदर्भात
तापमानात उल्लेखनीय घट, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट झाली
आहे. राज्यात आज सर्वात कमी सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअ तापमान यवतमाळ इथं नोंदवलं
गेलं. नाशिक आणि औरंगाबाद सरासरी सात, परभणी आठ पूर्णांक दोन, बीड नऊ पूर्णांक सहा,
उस्मानाबाद दहा पूर्णांक सात, तर नांदेड इथं ११ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.01.2019 13.00
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
29 january 2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२९ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
परीक्षा
महत्त्वाच्या आहेतच, पण परीक्षेपलिकडेही मोठं आयुष्य असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी
बोलत होते. पालक तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरात पंतप्रधानांनी,
पालकांनी पाल्यांना सातत्यानं प्रोत्साहन द्यावं, आपल्या अपेक्षांचं ओझं पाल्यांवर
लादू नये, पाल्याचा कल ओळखून त्याच्या कौशल्याचा विकास करावा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये
परीक्षेबाबत सुसंवाद निर्माण व्हावा, अशी मतं मांडली. पालकांनी पाल्यावर कोणत्याही
प्रकारचा दबाव आणू नये, एखाद्या परीक्षेत अपयश आल्यास, आयुष्य ठप्प होत नाही, असंही
त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करून, स्वत:चेच विक्रम मोडावेत,
असं आवाहन त्यांनी केलं.
विचारांना संकुचित
करणारं तंत्रज्ञान विकासासाठी धोकादायक असून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, आपल्या
क्षमतांचा विचार करून योग्य लक्ष्य निर्धारित करावं आणि ते प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध
वाटचाल करावी, असं पंतप्रधानांनी सांगितलं. विज्ञान शाखेइतक्याच इतरही शाखा महत्त्वाच्या
असून, आपल्या संकल्पना सुस्पष्ट असाव्यात, असंही ते म्हणाले. वेळेचं नियोजन, यावर पंतप्रधानांनी
भर दिला.
या कार्यक्रमात देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसह
त्यांचे पालक आणि शिक्षक तसंच बाहेरच्या अनेक देशातले विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडीस यांचं
आज पहाटे दिल्ली इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. आणिबाणीविरोधात
लढा पुकारणारे फर्नांडीस यांनी कामगारांच्या अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. रेल्वे कामगारांसाठी
त्यांनी उभारलेला ऐतिहासिक लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. समाजवादी चळवळीत त्यांचं
मोलाचं योगदान आहे. आणिबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई सरकारमध्ये फर्नांडीस
यांनी उद्योगमंत्री म्हणून, व्ही पी सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून तर अटल बिहारी
वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली. त्यांनी
स्थापन केलेल्या समता पक्षाचं, रामकृष्ण हेगडे यांच्या लोकशक्ती पक्षात विलीनीकरण होऊन,
संयुक्त जनता दलाची निर्मिती झाली आहे.
नऊ वेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेचे सदस्य असलेले
फर्नांडीस, गेल्या सुमारे आठ वर्षांपासून स्मृतिभ्रंश आणि कंपवातानं आजारी होते. गेल्या
काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान
आज सकाळी त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष खासदार शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी
फर्नांडीस यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
अयोध्येत रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त
२ पूर्णांक ७७ शतांश एकरची जागा वगळून उर्वरित ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी,
अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे. या बाबत केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात
अर्ज सादर केला. ही जागा केंद्र सरकारनं अधिग्रहीत केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं
या निर्णयाला स्थगिती दिली होती.
दरम्यान, रामजन्मभूमी-
बाबरी मशीद खटल्याची आज होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. सुनावणीची
पुढची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही.
****
केंद्रीय
विद्यापीठ आणि महाविद्यालयामधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि परीक्षा नियंत्रकाचे भत्ते
तसंच विशेष भत्त्यांमधे वाढ करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केले
आहेत. कुलगुरुंसाठी सुधारित विशेष भत्ता मासिक ११ हजार २५० रुपये, प्रकुलगुरुसाठी
मासिक नऊ हजार रुपये, पदव्यूत्तर महाविद्यालयातल्या प्राचार्यासाठी सहा हजार
७५० रुपये आणि पदवी महाविद्यालयातल्या प्राचार्यासाठी मासिक साडे चार हजार रुपये विशेष
भत्ता असेल. केंद्रीय विद्यापीठांमधल्या तीस हजार आणि अभिमत विद्यापीठांमधल्या
साडे पाच हजार शिक्षक आणि समकक्ष कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल, असं मंत्रालयानं एका
निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या अप्रतिम मीडियाच्या
वतीनं देण्यात येणाऱ्या चौथा राज्यस्तरीय स्तंभ पुरस्काराची काल घोषणा करण्यात आली.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी युवा पत्रकार रमेश
भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
राज्यातल्या शल्यक्रिया तज्ज्ञांची मॅसिकॉन परिषद
३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान औरंगाबाद इथं, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात होणार
आहे. या परिषदेत देशातले १७०० तज्ज्ञ सहभागी होत असून, ३५ ते ४० शल्यक्रिया मोफत केल्या
जाणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 January 2019
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ جنوری ۲۰۱۹ئ
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
مہاراشٹر کے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ اُنکی حکو مت ریاست میں قحط سے متا ثرہ کسا نوں کے ساتھ مضبو طی سے کھڑی ہے اور کسا نوں کو فصل بیمہ اور قحط سے نمٹنے کے لیے دی جانے والی اِمداد کی رقم فروری میں اُن کے بینک کھاتوں میں جمع کر دی جائے گی۔ پھڑ نویس کل جالنہ میں بی جے پی کی ریاستی مجلس عاملہ کی میٹِنگ کے بعد منعقد ہوئے جلسہ ٔ عامل سے خطاب کر رہے تھے۔ وزیر اعلیٰ نے لوک سبھا انتخا بات کے لیے اپو زیشن جماعتوں کے اتحاد پر بھی تنقید کی۔ اِس سے پہلے مجلس عاملہ کی میٹِنگ میں پھڑ نویس نے کہا کہ اُنکی پارٹی جو ساتھ آئے اُنھیں ساتھ لے کر اور جو ساتھ نہ آئیں اُنکے بغیر انتخا بی میدان میں اُتریگی ۔ اُنھوں نے کہا کہ اپو زیشن جماعتوں کے ایک ساتھ آنے سے کوئی تبدیلی نہیں آئے گی۔
فصل بیمہ منصوبے میں بد عنوانی ہونے کے اپو زیشن جماعتوں کے الزام کو خارج کر تے ہوئے پھڑ نویس نے اُنھیں بحث کر نے کا چیلنج کیا۔ وزیر اعلیٰ نے دعویٰ کیا کہ ریاست ِ مہاراشٹر میں بھارتیہ جنتا پارٹی کے 3؍ سالہ دورِ اقتدار کے دوران کسا نوں کو بارہ ہزار کروڑ روپئے دیئے گئے ہیں۔ پھڑ نویس نے کہا کہ اُنکی حکو مت نے دلا لوں کا راج ختم کیا ہے اور جب تک آخری کسان کو قرض معا فی نہیں مل جاتی تب تک چھتر پتی شیواجی مہاراج شیتکری سنمان یو جنا بند نہیں ہو گی۔
***** ***** *****
اِس بیچ شیو سینا صدر اُدّھو ٹھا کرے نے کہا ہے کہ اُنھیں بی جے پی کی جانب سے انتخا بی اتحاد کر نے سے متعلق کوئی تجویز موصول نہیں ہوئی ہے۔ اُدّھو کل ممبئی میں شیو سینا اراکین ِ پارلیمنٹ کے اجلاس کے بعد بول رہے تھے۔ اُنھوں نے مزید کہا کہ شیو سینا مہاراشٹر میں بڑے بھائی کا رول ادا کرے گی اور اپنی شر طوں پر ہی سیاست کریں گی۔
***** ***** *****
ممبئی ہائی کورٹ نے مہاراشٹر حکو مت کو ہدا یت دی ہے کہ وہ مراٹھا ریزر ویشن سے متعلق پسماندہ طبقات کے کمیشن کی رپورٹ کی کاپی در خواست گذاروں اور اپو زیشن اراکین کو فراہم کرے۔ سماعت کے دوران کل عدالت نے کہا کہ ریاستی حکو مت پسماندہ طبقات کے کمیشن کی رپورٹ کو جوں کی توں در خواست گذاروں کو دستیاب کروائے ۔ حکو مت نے کہا کہ وہ یہ رپورٹCD کی شکل میں فراہم کرے گی۔
دوسری جانب در خواست گذاروں کے وکیل گُن رتن سدا ورتے نے عدالت کے فیصلے کا خیر مقدم کیا ہے۔
***** ***** *****
وزیر اعظم نریندر مودی امتحا نات کے تنا ظر میں ’’پریکشا پر چر چا‘‘ کے تحت آج طلباء سے خطاب کریں گے۔ اِس پروگرام کے ذریعے وہ دسویں اور بارہویں جماعت کے طلباء اسا تذہ اور سر پرستوں سے مخا طب ہوں گے۔ پریکشا پر چر چا میں2؍ ہزار طلبائ، اُنکے سر پرست اور اسا تذہ کے علا وہ بیرونی ممالک کے کئی طلباء بھی حصّہ لیں گے۔
آکاشوانی اور دور درشن کے قومی چینلوں سے صبح 10:55؍ منٹ سے پریکشا پر چر چا کو براہِ راست نشر کیا جا ئے گا۔ مہاراشٹر حکو مت نے ریاست کے سبھی اسکو لوں سے اِس پروگرام کو طلباء کو دکھانے کو کہا ہے ۔
***** ***** *****
ستارہ ضلعے کی ملکا پور نگر پنچا یت میں ہوئے انتخا بات میں کانگریس نے جیت حاصل کی ہے۔ وہیں رائے گڑھ ضلع کی کر جت نگر پالیکا انتخا بات میں بی جے پی - شیو سینا اتحاد نے بازی ماری ہے۔ دوسری جانب ناگپور ضلع کی مہادُلا نگر پریشد انتخا ب میں بی جے پی نے فتح حاصل کی ہے۔
***** ***** *****
پر بھنی ضلعے کے مانوت تعلقے کے ہفتہ واری با زار میں ایک ہوٹل میں رکھے گیس سِلینڈر کے دھما کے کے بعد آگ لگ گئی۔ اِس آگ میں آس پاس کی 5؍ دُکانیں جل کر خاک ہو گئیں۔ فائر بریگیڈ کے عملے نے قریب دیڑھ گھنٹے کی مشقت کے بعد آگ پر قابو پا یا۔
***** ***** *****
نیوزی لینڈ کے خلاف جا ری ایک روزہ کر کٹ مقا بلوں کی سیریز کا کل کھیلا گیا میچ بھارت نے ایک -صفر کی سبقت حاصل کرکے جیت لیا ہے۔ مائونٹ مونگا نُوئی میں کل کھیلے گئے تیسرے ایک روزہ مقابلے کو بھارت نے 7؍ وکٹ سے اپنے نام کیا۔ پہلّے بلّے بازی کر تے ہوئے نیو زی لینڈ کی ٹیم نے بھارت کے سامنے 244؍ رنوں کا نشانہ رکھا جواب میں بھارتی ٹیم نے43؍ ویں اوور میں ہی یہ ہدف حاصل کر لیا۔ اِس دوران بھارت نے
3؍ وکٹ کھو ئے ۔ روہت شر ما نے62؍ اور وِراٹ کو ہلی نے60؍ رن بنائے۔ امبا تی رائڈو 43؍ رن بنا کر ناٹ آئو رہے ۔ سیریز کا اگلہ مقابلہ جمعرات کو ہو گا۔
***** ***** *****
اِس دوران بھارت اور نیوزی لینڈ کی خواتین کر کٹ ٹیمیں بھی آج ایک دوسرے سے ٹکرا ئیں گی۔ خواتین ٹیم آج مائونٹ مونگا نُو ئی میں ہی اپنا مقابلہ کھیلے گی۔ سیریز میں بھارتی خواتین ٹیم بھی ایک-صفر کی بر تری حاصل کیئے ہوئے ہے۔

Subscribe to:
Posts (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...