Saturday, 1 April 2017

AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 1.00pm

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.

*****

देशाच्या अर्थव्यवस्थेत २०१७ या वर्षात सात पूर्णांक दोन टक्क्यांनी, तर २०१८ मध्ये सात पूर्णांक सात टक्क्यांनी वाढ होणं अपेक्षित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ब्रिक्स राष्ट्रांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या वार्षिक बैठकीत बोलत होते. भारतात पायाभूत सुविधांमधल्या गुंतवणुकीसाठी दोनशे कोटी डॉलर्सच्या कर्जाची मागणी बँकेकडे केल्याचं ते म्हणाले.

****

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारु विक्री बंदीच्या गेल्या १५ डिसेंबरला दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं सुधारणा केली आहे. नवीन आदेशानुसार महामार्गालगत २२० मीटर अंतरावर दारु विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीच्या आदेशात ५०० मीटर अंतरासाठी ही बंदी घालण्यात आली होती. मद्यपान करुन गाडी चालवण्यामुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा आदेश दिल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.

****

मोटार वाहन कायदा २०१६च्या सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. या सुधारणेनुसार वाहन नोंदणी, तसंच वाहन चालविण्याचा परवाना आता आधारशी संलग्न करण्यात येणार आहे. अल्पवयीन चालकांनी केलेल्या अपघातासाठी पंचवीस हजार रुपये दंड, तसंच तीन वर्ष तुरुंगवास, तसंच वाहन नोंदणी रद्द करण्याची तरतूद या मसुद्यात आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत सादर झालेलं हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं होतं. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता हे विधेयक संसदेसमोर सादर केलं जाईल.

****

प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी सरकारने आजपासून आयटीआर-१ हा एक पानी अर्ज करदात्यांसाठी आणला आहे. आधीच्या आयटीआर-२ ए या सात पानी अर्जाऐवजी आता आयटीआर -१ हा एकच पानी अर्ज असेल. वेतन, घर आणि व्याज या माध्यमातून ५० लाखांपर्यंत उत्पन्न मिळणारे करदाते हा अर्ज भरू शकतील. दरम्यान, आजपासून ऑनलाईन प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणे सुरू होत असून, त्यासोबत आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

ऑनलाईन रेल्वे तिकिटांवर सेवा शुल्क न आकारण्याची मुदत रेल्वे विभागानं ३० जून पर्यंत वाढवली आहे. सरकारनं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ऑनलाईन तिकिटांवरील सेवा शुल्क ३१ मार्च पर्यंत आकारणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँक स्वतंत्र सक्तवसुली विभाग सुरु करणार आहे. सोमवारपासून हा विभाग सुरु होणार असून, यात बँकेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास चौकशी करण्यात येणार आहे, तसंच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली.   

****

शिर्डी इथल्या श्री साईबाबा यांच्या महानिर्वाणास १८ ऑक्टोबर २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन आणि संस्थानमार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध कामांसाठी सुमारे तीन हजार २३ कोटी १७ लाख रुपयांच्या कृती आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मान्यता दिली. केंद्र शासनाच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांनाही मान्यता देण्यात आली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधिक्षक आदी वर्ग एक आणि वर्ग दोनच्या विविध पदांसाठी उद्या राज्यातल्या ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परिक्षा होणार आहे.

****

उद्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आपल्या घरातील पाच वर्षाखालील बालकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात पोलिओची लस द्यावी, असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

अंबाजोगाई इथले डॉ. आदित्य पतकराव यांच्या पुणे इथल्या “आदित्य डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर”ला युरोपियन मेडिकल असोसिएशनचा “जागतिक सॉक्रेटिस पुरस्कार” जाहीर झाला आहे. येत्या चार जुलैला स्वित्झर्लंड इथं हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.

****

आदिवासी शेतकऱ्यांनी आर्थिक फायदा आणि उत्पन्नातील सातत्य टिकवण्यासाठी विविध पिकांचं बीजोत्पादन करावं, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केलं आहे. नांदेड इथल्या कापूस संशोधन केंद्रामध्ये आदिवासी शेतकरी प्रशिक्षण आणि उपकरण वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी शेतकऱ्यांनी नैसर्गिक साधनांवर आधारित कृषी व्यवसाय सुरू करून कृषिपूरक जोडधंदे करण्यास पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कार्यक्रमात नांदेड इथल्या आदिवासी शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणांचं वाटप करण्यात आलं.

//********//

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 10.00pm


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राष्ट्रीय वयोश्री योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. आंध्रप्रदेशात नेल्लोर इथं नागरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत या योजनेला प्रारंभ होईल. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक उपकरणं मोफत पुरवली जाणार आहेत. येत्या तीन वर्षात सुमारे साडे पाच लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी ४८५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

*****

मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांच्या नोंदणी शुल्क - रेडीरेकनरच्या दरात आजपासून वाढ होण्याचे संकेत आहेत. मुद्रांक शुल्क, नोंदणी विभागासह संबंधित विविध विभागांमार्फत सर्वेक्षण करून प्राप्त अहवालानुसार रेडीरेकनर दर निर्धारित केले जातात.

****

छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्ह्यात काल ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये चार महिलांचा समावेश असून, इतर चार जणांवर एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं, असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. नक्षलविरोधी मोहिमेत हे छत्तीसगड पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे.

****

नांदेड इथल्या सत्यशोधक मंचातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट संपादनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार माध्यमतज्ज्ञ डॉ. सुधीर गव्हाणे आणि नांदेडचे डॉ. राजेंद्र गोणारकर यांना जाहीर झाला आहे. येत्या चार एप्रिलला नांदेड इथं ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनाचं आयोजन उद्या परळी वैजनाथ इथं करण्यात आलं आहे. नटराज रंग मंदिरातील डॉ. कृष्णा किरवले साहित्य नगरीत आयोजित या संमेलनात चर्चासत्र, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रम होणार असल्याचं स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जगतकर यांनी सांगितलं.

****

नांदेडहून अजनीला जाणारी उन्हाळी विशेष गाडी प्रवाशांच्या कमी संख्येमुळे बंद होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड इथून नागपूरला जाण्याकरता नांदेड ते अजनी ही विशेष गाडी मार्च ते जून दरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही, तर ही गाडी जून पूर्वीच बंद होईल, असं नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. 

//*******//

Regional Urdu Audio Bulletin, Aurangabad, Date: 01.04.2017, Time : 8.40 to 8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 01.04.2017, Time : 8.40 to 8.45 AM
 
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date - 01  April  2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ  :  یکم اپریل  ۲۰۱۷
وَقت  :  صبح  ۴۰: ۸  -  ۴۵ :۸
***********************
 میڈیکل کورسیز میں داخلے کے لیے قومی داخلہ جانچ این ای ای ٹی کیلئے دَرخواست دَہی کی عمر کی حد میں اِضافہ کردِیا گیا ہے۔ مرکزی ثانوی تعلیمی بورڈ سی بی ایس ای نے اِس اِمتحان کے لیے عمر کی حد 25/ برس مقرر کی تھی۔ بورڈ کے اِس فیصلے کے خلاف داخل کردہ عرضداشت پر سماعت کے دَوران کل عدالت ِ عظمیٰ نے عمر کی حد آئندہ تعلیمی سال سے طئے کرنے کا حکم دِیا اَور اِس سال 25/ برس سے زِیادہ عمر والے طلباء بھی اِمتحان دے سکیں گے۔ دَرخواست دَہی کی آخری تاریخ میں بھی توسیع کرتے ہوئے عدالت نے اسے 5/ اپریل تک بڑھا دی ہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مرکزی حکومت نے اپریل تا جون سہ ماہی میں چھوٹی بچت اِسکیموں پر شرح سود میں صفر اَعشاریہ ایک فیصد تخفیف کردی ہے۔ نئی شرح سود کے مطابق پی پی ایف اَور قومی بچت سرٹیفکیٹ پر 7.9/ فیصد‘ کسان وِکاس پتر پر 7.6/ فیصد اَور سُوکنّیا سمرُدّھی یوجنا پر 8.4/ فیصد کی شرح سے سُود دِیا جائیگا۔ ایک تا پانچ برس کے ڈِپازِٹ پر 6.9/ تا 7.7/فیصد سود ملے گا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 سال 2017-18 کا رِیاستی سالانہ مالی بجٹ کل اَسمبلی میں صوتی رائے دَہی کے ذَریعے منظور کرلیا گیا۔ وَزیرِ خزانہ سدھیر منگنٹیوار نے اَیوان میں بجٹ سے متعلق بِل پیش کیا۔ حزبِ اِختلاف کی غیر حاضری کے باعث یہ بِل بآسانی منظور کرلیا گیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 خواتین اَور بہبودِ اَطفال کی وَزیر پنکجا مونڈھے نے کہا ہے کہ زِ یادتی کا شکا ر خواتین کے لیے منودَھیریہ یوجنا کے تحت متاثرہ خواتین کو دی جانے والی اِمداد تین لاکھ رُوپئے سے بڑھا کر 10/ لاکھ رُوپئے کرنے پر حکومت غور کررَہی ہے۔ کل قانون ساز کونسل سے خطاب کرتے ہوئے اُنھوں نے کہا کہ اِس خصوص میں عدالتی ہدایت کے مطابق عنقریب ایک جامع اِسکیم لائی جائیگی اَور اِس ضمن میں مختلف محکموں اَور قانون ساز اَیوانوں میں موجود خواتین اَراکین کی ایک کمیٹی تشکیل دی جائیگی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 وَزیرِ اَعلیٰ دیویندر پھڑنویس نے کہا ہے کہ اَسمبلی کے دونوں اَیوان آئین کے مطابق پُر وِقار اَور قابلِ تکریم ہیں۔ اِس لیے کسی بھی رُکنِ اَسمبلی کو اَیوان سے متعلق ہتک آمیز بیان دینے کی اِجازت نہیں دی جاسکتی۔ رُکنِ اَسمبلی اَنیل گوٹے کے بیان پر حزبِ اِختلاف کی جانب سے شدید مخالفت اَور نعرے بازی کے بعد وَزیرِ اَعلیٰ قانون ساز کونسل سے خطاب کررَہے تھے۔
 دَریں اَثناء کانگریس اَور راشٹروادی کانگریس کے 19/ اَراکین کی معطلی کا فیصلہ آج واپس لیے جانے کا اِمکان ہے۔ وَزیرِ اَعلیٰ نے کل پی ٹی آئی سے گفتگو کرتے ہوئے اِس طرح کا اِشارہ دِیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 اِمدادِ باہمی کے وَزیر سبھاش دیشمکھ نے کہا ہے کہ رِیاست کی اِمدادِ باہمی بینکوں میں بدعنوانیوں کے کم و بیش 2/ ہزار معاملات کی جانچ بر وَقت کروانے کے لیے سبکدوش جج کا تقرر کیا جائے گا۔ وہ کل اَسمبلی میں وَقفۂ سوالات کے دَوران ایک سوال کا جواب دے رَہے تھے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 ایکسائز کے وَزیر چندر شیکھر باون کوڑے نے کہا کہ رِیاست کے شراب فروشوں اَور بیئر بار کو اَہم شخصیات‘ تاریخی قلعوں اَور دیوی دیوتائوں کے ناموں کے بورڈ لگانے سے روکنے کے لیے ایک قانون وَضع کیا جائیگا اَور اِس خصوص میں اَسمبلی کے مانسون اِجلاس میں بِل پیش کیا جائیگا۔
 دَریں اَثناء رِیاستی اَور قومی شاہراہوں پر موجود شراب کی دُکانیں آج سے بند رَہیں گی۔ عدالت ِ عظمیٰ کے اِحکام کے مطابق یہ کاروائی کی گئی ہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 پٹرول اَور ڈیزل کی قیمتوں میں آج سے کمی کردی گئی ہے۔ پٹرول کی قیمت میں فی لیٹر 3/ رُوپئے 77 / پیسے اَور ڈیزل کی قیمت میں دو رُوپئے 91/ پیسے کٹوتی کی گئی ۔ یہ نئی قیمتیں کل دَرمیانی شب سے نافذ ہوچکی ہیں۔ بین الاقوامی منڈی میں خام تیل کی قیمت میں تخفیف کے باعث پٹرولیم کمپنیوں کی جانب سے یہ قیمتیں کم کی گئیں۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 روز نا مہ اورنگ آ باد ٹائمز کی گولڈن جبلی تقا ریب کے سلسلے میں آج سے ایک2؍روزہ سیمینار کا آ غاز ہوگا۔
  کریسنٹ ایجوکیشنل سو سائٹی ،قو می کونسل برائے فروغِ اُردو زَبان اور مو لانا آزاد کالج کے اِشترا ک سے ہونے والے اِس سیمینار کا موضوع : ’’صحافت: ماضی ‘ حال اَور اِمکانات‘‘ ہوگا۔ اَب سے کچھ دیر بعد سمینار کا افتتاح پروفیسر اِرتضیٰ کریم کے ہاتھوں عمل میں آئے گا۔ اِفتتاحی پروگرام کی صدا رت پدم شری فاطمہ زکر یا کریں گی اَور معروف تنقید نگار پروفیسر عتیق اللہ کلیدی خطبہ دیں گے۔ روضہ باغ میں آئی ایچ ایم ہال میں منعقد ہونے اِس سیمینار کے کنوینر خان مقیم خان ہونگے۔ جس میں ملک بھر کے نامور صحا فی اور ادیب اپنے مقالے پیش کریں گے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 کسانوں کے قرضۂ جات کی معافی کے مطالبے پر نکالی گئی سنگھرش یاترا کل مراٹھواڑہ میں داخل ہوگئی۔ اِس ضمن میں پربھنی میں منعقدہ ایک جلسۂ عام سے خطاب کرتے ہوئے سابق وَزیرِ اَعلیٰ پرتھوی راج چوہان نے اَپیل کی کہ کسانوں کو قرضوں سے نجات دِلانے کیلئے تعاون کریں۔
 یہ سنگھرش یاترا آج اَورنگ آباد پہنچے گی اَور دوپہر میں شہر کے عام خاص میدان پر ایک جلسۂ عام رَکھا گیا ہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>

AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 6.50am

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  १ एप्रिल मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठीची वयोमर्यादा शिथील

·      एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात कपात

·      मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितेला देण्यात येणारी मदत तीन लाखावरून दहा लाख रुपये करण्याचा सरकारचा प्रयत्न

·      पेट्रोल तसंच डिजेलच्या दरात घट

आणि

·      शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली संघर्ष यात्रा मराठवाड्यात दाखल

*****

      वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित केली होती, त्याविरोधात दाखल याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही वयोमर्यादा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्याचे निर्देश देत, या वर्षी २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले इच्छुकही परीक्षेला पात्र असतील, असं स्पष्ट केलं. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही न्यायालयानं पाच एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

****

केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर एक दशांश टक्क्यानं कमी केले आहेत. नवीन दरानुसार पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निधी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के, किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के, तर सुकन्या समृध्दी योजनेवर आठ पूर्णांक चार दशांश टक्के दरानं व्याज मिळेल.  एक ते पाच वर्ष कालावधीच्या ठेवींवर सहा पूर्णांक नऊ दशांत ते सात पूर्णांक सात दशांश टक्के व्याजदर राहील.

****

राज्याचा २०१७-२०१८ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विनियोजन विधेयक मांडलं. विरोधकांच्या गैरहजेरीमुळे ते एकमतानं मंजूर झालं.

****

मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित महिलेला देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी न्यायालयानं दिलेल्या निर्देशाचं पालन करुन व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल असं त्यांनी सांगितलं. यासाठी विविध विभाग तसंच विधीमंडळातल्या महिला सदस्यांची समिती स्थापन केली जाईल, त्या माध्यमातून पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

****

विधीमंडळाची दोन्ही सभागृह संविधानानं तयार केलेली सार्वभौम सभागृह आहेत. त्यामुळे आमदारांना सभागृहाचा अवमान करणारं मत मांडता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली, त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.

दरम्यान, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांचं निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पीटीआयशी बोलताना तसे संकेत दिले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातले शेतकरी रामेश्वर भुसारे यांचे बँकेकडे असलेले कर्जप्रकरण मार्गी लावण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्यांना मदत करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असं गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं.

****

राज्य सहकारी बँकांमधील गैरव्यवहारांच्या जवळपास दोन हजार प्रकरणांची चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात सांगितलं.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी बारावीच्या परीक्षेत ६० टक्के गुणांची अट योग्य असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. काल विधानपरिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.

****

राज्यात बिअर बार तसंच मद्य विक्री केंद्रांना महापुरुष, गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यास प्रतिबंध करणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानपरिषदेत दिली.

दरम्यान, राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या लगत असलेली मद्य विक्रीची दुकानं आजपासून बंद होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

पेट्रोल आणि डिजेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात लीटरमागे तीन रुपये ७७ पैसे तर डिजेलच्या दरात लीटरमागे दोन रुपये ९१ पैसे कपात झाली आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत घट झाल्यानं, ही दरकपात झाल्याचं, पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगण्यात आलं.

****

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली संघर्ष यात्रा काल मराठवाड्यात दाखल झाली. परभणी इथं आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन  केलं. विधानसभेत निलंबित झालेल्या आमदारांचा यावेळी शेतकरी संघटनेच्यावतीनं सत्कार करण्यात आला.

हिंगोलीत इंदिरा गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत मान्यवरांची भाषणं झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून तूर खरेदी बंदीसह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, ही संघर्ष यात्रा आज औरंगाबाद इथं पोहोचत असून, दुपारी शहरात आमखास मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातली तूर हमीभाव खरेदी केंद्रं बारदान्यांअभावी बंद असल्यानं, बारदाने त्वरित उपलब्ध करून द्यावेत तसंच खरेदी केलेल्या तुरीचे पैसे तत्काळ द्यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी दोन दिवसात तूर खरेदी सुरू केली जाईल, असं लेखी आश्वासन दिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद शाखेकडून सांगण्यात आलं.

****

हैदराबाद स्टेट बँकेसह पाच सहयोगी बँका काल आर्थिक वर्षाच्या समारोपासोबत भारतीय स्टेट बँकेत विलीन झाल्या. या विलीनीकरणाचा खातेधारकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. एटीएम, डेबीट किंवा क्रेडीट कार्ड तसंच इंटरनेट बँकिंगचे पासवर्डमध्ये कोणताही बदल होणार नाही, असं हैदराबाद स्टेट बँकेनं आपल्या खातेधारकांना पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे.

****

राष्ट्रीय विधी आयोगाने शासनाकडे सादर केलेलं वकील कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू नये, या मागणीसाठी काल वकिलांनी सर्वत्र काम बंद आंदोलन केलं. औरंगाबाद इथं आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याचं जिल्हा वकील संघटनेनं कळवलं आहे. बार कौन्सिलची निवडणूक लढवण्यासाठी किमान दहा वर्षांचा अनुभव, वकिलांविरुध्द तक्रारींच्या चौकशीसाठी कौन्सिलच्या सदस्यांऐवजी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती, आदी सुधारणा या विधेयकात सुचवल्या आहेत, त्यांना वकिलांचा विरोध आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांना कामकाजात अनियमिततेच्या कारणावरून निलंबित केलं आहे. केंद्रे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार असताना, कामकाजात अनियमितता आढळून आल्यानं, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी चौकशीअंती ही कारवाई केली. केंद्रे यांचा काल सेवानिवृत्तीचा दिवस होता. 

****

सीटू कामगार संघटनेचे औरंगाबाद इथले संस्थापक सदस्य कॉम्रेड छगन साबळे यांचं काल औरंगाबाद इथं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

लातूर आणि रेणापूर तालुक्यात सिंचन तसंच पेयजल पुरवठ्यासाठी मांजरा प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग करण्याची मागणी आमदार त्र्यंबक भिसे यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

मराठवाड्यात काल नांदेड इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४२ पूर्णांक तीन, औरंगाबाद तसंच बीड इथं ४१ अंश तर उस्मानाबाद इथं ३८ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने काल झालेल्या उपांत्यफेरीत सायना नेहवालचा २१-१६, २२-२० असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.

//********//

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...