Sunday, 1 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०१ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या साई जन्मस्थळाचा विकास करण्याबाबत विचार व्हावा, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा राष्ट्रपतींनी ध्वजारोहणानं शुभारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते.

साई संस्थान अपारंपरिक वीजेच्या वापरातून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, राष्ट्रपतींनी स्वच्छतेच्या बाबतीत अधिक सजग राहण्याचं आवाहन केलं.

तत्पूर्वी राष्ट्रपतींनी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करुन, शिर्डी - मुंबई विमान हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हवाई मार्गानं जोडल्यामुळे शिर्डीच्या आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, आणि अधिकाधिक रोजगार निर्माण होईल, असं राष्ट्रपती म्हणाले.

राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यावेळी उपस्थित होते. या विमानसेवेअंतर्गत शिर्डी विमानतळाहून मुंबईसाठी चार तर हैदराबाद आणि दिल्लीसाठी एक एक विमान सोडण्यात येणार आहे.

****

चीनच्या सीमेलगत राहणारे लोक देशासाठी सामारिक दृष्टया महत्वाचे असून, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं स्थलांतर होऊ देता कामा नये, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल उत्तराखंडमधल्या जोशीमठ इथं स्थानिक नागरिक आणि भारत- तिबेट सीमा पोलिस जवानांशी संवाद साधत होते. सीमेवरच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खास शिबीरं आयोजित करावीत असंही गृहमंत्री म्हणाले.

****

सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक म्हणून रजनीकांत मिश्रा यांनी सुत्रं स्वीकारली आहेत. ते १९८४ च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे पोलिस अधिकारी आहेत. २००३ मध्ये त्यांना पोलिस पदक आणि २००९ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे.

****

तेलंगणामधल्या सूर्यपेट जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६५ वर आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. ही बस विजयवाडाहून हैदराबादला जात होती.

****

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या ‘संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पा’चा शुभारंभ उद्या करण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्व एसटी बस आणि बस स्थानके स्वच्छ केली जाणार आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुंबई इथं ही घोषणा केली. एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयांच्या मुख्य बस स्थानकांवर उद्या सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ बस आणि टापटीप बसस्थानकं, प्रसाधनगृहं प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असतील, असा विश्वास रावते यांनी व्यक्त केला.

****

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आधारसह सर्व माहिती ऑनलाईन भरली तरच शाळांना शिक्षक मान्यता दिली जाईल असा अप्रत्यक्ष इशारा शालेय शिक्षण विभागानं राज्यातल्या सर्व अनुदानित आणि सरकारी शाळांना दिला आहे. मात्र शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींकडे मात्र शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. आवश्यक असूनही विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांनी अद्ययावत न केल्यामुळे अनेक शाळांमध्ये गरजेपेक्षा कमी शिक्षकपदं  मान्य झाल्याचं शिक्षण विभागानं म्हटलं आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाच्या चार दरवाजातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक मंदावल्यानं, विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरलं असून, डाव्या कालव्यातून एक हजार तर उजव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

****

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत प्रारंभीचे तिन्ही सामने जिंकून भारतानं ही मालिका यापूर्वीच जिंकली आहे. एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेनंतर या दोन्ही देशांच्या संघांमध्ये तीन ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यातला पहिला सामना येत्या शनिवारी रांची इथं होईल.

****

सॅनफ्रान्सिस्को खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या दीपिका पल्लीकलचं आव्हान काल उपान्त्य फेरीत संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीत एकविसाव्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाचा मलेशियाच्या निकोल डेविडनं ३ - ११, शून्य - ११, ३ - ११ असा पराभव केला.

****

AIR News Bulletin HLB, Aurangabad 01.10.2017 11.00

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 01.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित आहेत. शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा तसंच शिर्डी - मुंबई विमानसेवेचा शुभारंभही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रपती पद स्वीकारल्यानंतर कोविंद यांनी आपल्या साध्या आणि सरळ स्वभावानं जनतेच्या मनात स्थान निर्माण केल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

अशूरा अर्थात मुहर्रम महिन्याचा दहावा दिवस आज देशातल्या अनेक भागात पाळण्यात येत आहे. सत्य, पवित्रता अणि न्यायाच्या रक्षणासाठी बलिदान देणारे मोहम्मद पैंगंबरांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या सहकार्यांचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं. यानिमित्त आज ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे मिरवणूक काढण्यात येत आहे. 

****

सीमा सुरक्षा बलांन जम्मु कश्मीरमधल्या अर्निया इथं १४ फूट लांबीच्या भुयारातून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा डाव उधळून लावला. अर्निया इथं सीमा रेषेजवळ हे भुयार सीमा सुरक्षा दलाला आढळलं. या भुयारातून दोन मॅगनिज, ६० फैरी झाडता येतील इतका दारूगोळा, एक हात गोळा आणि इतर स्फोटक जप्त करण्यात आली आहेत.

****

चौथा आद्यक्रांतीकारक गुरूवर्य लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देण्यात येणार आहे. एक लाख एक रूपये रोख, मानपत्र, दांडपट्टा, स्मृतीचिन्ह आणि घोंगडी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

सरकारनं पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवावेत तसंच समान कर प्रणालीसोबत समान इंधन दर प्रणाली अंमलात आणण्याची मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात ते काल मुंबई इथं बोलत होते. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४० रूपये प्रतिलिटर असून या दरानुसार भारतातही पेट्रोलचे दर असावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 01 October 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  01 ؍  اکتوبر  .۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 ممبئی میں الفینسٹن اسٹیشن پربھگدڑمیںہوئی 23؍اموات کے بعد ریلوے وزیرپیوش گوئیل نے ممبئی عظمیٰ ریلوے میں جاری کاموں کاجائزہ لینے کے لئے کل ریلوے بورڈ کی ممبئی میںمیٹنگ لی۔ اس میٹنگ میں اسٹیشنوں سے گذرنے کے لئے پیدل پل مسافروں کی سہولت کے طورپر نہ ہو بلکہ یہ ضروری ہو۔ایسے احکام گوئیل نے دئیے۔
 اسی طرح جن ریلوے اسٹیشنوں پرزیادہ ہجوم ہوتاہے۔ایسے مقامات پرلفٹ نصب کرنے کاحکم دیا۔اس کے علاوہ ان کاموں کاجائزہ لینے کے لئے ریاست کے وزیروِنو د تائوڑے کی صدارت میںایک اعلیٰ سطحی کمیٹی اُنہوں نے تشکیل دی۔ہرماہ یہ کمیٹی کام کاج کاجائزہ لے گی۔
****************************
 مرکزی وزیرٹرانسپورٹ نتن گڈکری اورمہاراشٹر کے وزیراعلیٰ دِیویندرپھڑنویس نے ناگپور میںچنچ بھون سے نئی طیران گاہ اسٹیشن کے درمیان میٹرو ریلوے کی ٹرائیل خدمات کوکل ہری جھنڈی دیکھائی۔ان دو اسٹیشنوں کے درمیان ساڑھے پانچ کیلومیٹر کافاصلہ ہے۔ اس موقع پروزیراعلیٰ دیویندر پھڑنویس نے کہا کہ اس پروجیکٹ کی وجہہ سے 20؍ہزارافرادکوروزگارفراہم ہوگا۔ جن سے معاشی ترقی میںتیزی آئے گی۔
****************************
 وجئے دشمی یعنی دسہرہ کاتہوارکل جوش وخروش سے منایاگیا۔ساڑھے تین مہورت میں سے ایک مہورت کوصنعت اورتجارت کی دنیا میں اہمیت دی جاتی ہے۔مذہبی نظریہ سے بھی اس تہوارکوملک کے مختلف حصّوں میںعلیحدہ علیحدہ اہمیت دی جاتی ہے۔ناگپورمیںآر ایس ایس تنظیم کامیڑاواہوا۔دنیا اب بھارت کی طاقت سے واقف ہورہی ہے یہ با ت تنظیم کے چیف موہن بھاگوت نے کہی۔گورکشا ، چین ،پاکستان ، روہنگیاوغیرہ مسئلوں پراُنہوں نے اظہار خیال کیا۔
****************************
 شیوسینا کادسہرہ میٹراواممبئی میںمنعقدکیاگیاتھا۔حکومت زندگی کے لئے ضروری پانچ اشیاء کی قیمتیں ایک جگہ قائم رکھیں۔ اسی طرح مساوی ٹیکس طریقہ کارکے ساتھ مساوی ایندھن نرخ کے طریقہ کارپربھی عمل درآمدکرنے کامطالبہ شیوسینا پارٹی چیف اُدھوٹھاکرے نے اس موقع پرکیا۔پاکستان میں پٹرول کی قیمت 40؍روپئے فی لیٹرہے۔اس نرخ کے لحاظ سے بھارت میںبھی پٹرول کی قیمت ہوناچاہئے۔ایسی اُمیداُنہوں نے ظاہرکی۔اپنی مخاطبت میںٹھاکرے نے مرکزی حکومت کی پالیسیوں اوربھارتیہ جنتاپارٹی پرشدید تنقیدکی۔اس میں بلٹ ٹرین، روہنگیا مسلمانوں کامسئلہ، جموں کشمیر کامسئلہ، نوٹ بندی،اشیاء اورخدمات ٹیکس ، گوکشی ،بڑھتی مہنگائی وغیرہ مسائل شامل ہیں۔
****************************
 بیڑضلع کے پاٹودہ تعلقے میںساورگائوںگھاٹ بھگوان باباکے پیدائشی مقام پردیہی ترقیاتی وزیرپنکجہ منڈے نے کل دسہرہ میڑاوالیا۔پاتھرڈی کے بھگوان گڑھ پرمیڑاوامنعقدکرنے پرمہنت نامدیوشاستری نے اجازت دینے سے انکارکردیاتھا۔اس میڑاوے میں کثیر تعداد میں شہری شامل ہوئے۔
****************************

 دھم چکرپرورتن دن کل منایاگیا۔اس ضمن میںمختلف مقامات میں مختلف پروگرامس کااہتمام کیاگیاتھا۔ڈاکٹر باباصاحب امبیڈکریادگاری کمیٹی کی جانب سے ناگپورمیںدیکشابھومی پراعلیٰ تقریب ہوئی۔اورنگ آباداورپربھنی میںبھی مختلف پروگرامس کااہتمام کیاگیاتھا۔
****************************
 شرڈی میںسائی باباادارے کے سائی صدسالہ تقریبات کاآغازآج صدرِ جمہوریہ رام ناتھ کوویند کے ہاتھوں عمل میں آئے گا۔گورنر سی ودھیا ساگررائو، وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس وغیرہ معززشخصیتیں اس موقع پرموجودرہیںگی۔شرڈی ۔ممبئی ہوائی سفر کاآغازصدرِجمہوریہ کے ہاتھوں عمل میں آئے گا۔
****************************
 اورنگ آبادضلع کے پیٹھن میںجائیکواڑی ڈیم کے چاردروازے کل صبح آڈھے فٹ کھول دئیے گئے۔ندی میں دوہزار کیوبٹ فی سیکنڈ رفتار سے پانی چھوڑاگیاہے۔اس کی اطلاع آبپاشی محکمہ کی جانب سے دی گئی۔
****************************
 بھارت اورآسٹریلیاء کے درمیان پانچواں اورآخری ایک روزہ بین الاقوامی میچ آج ناگپورمیںکھیلاجائے گا۔میچ دوپہر دیڑھ بجے شروع ہوگا۔ میزبان ٹیم پہلے تین میچ جیت کرسیریزپہلے ہی اپنے نام کرچکی ہے۔حالانکہ آسٹریلیا کی ٹیم نے جمعرات کوبینگورومیںکھیلاگیاچوتھاایک روزہ بین الاقوامی میچ 21؍ رن سے جیت لیاتھا۔ایک روزہ سیریزکے خاتمے کے بعد دونوں ٹیمیں 3؍ٹوئنٹی میچ کھیلیں گی۔ پہلاٹوئنٹی ٹوئنٹی میچ اگلے سنیچر کورانچی میں کھیلا جائے گا۔
 ’’سوچھتاخدمت‘‘ اس مہم کے تحت جالنہ شہر میںدواکتوبرسے سوچتھا مہم پرعمل درآمدکیاجائے گا۔اس ضمن میں منصوبہ سازی کرنے کے لئے کل ضلع کلکٹر شیواجی جوندھڑے ،صدربلدیہ سنگیتاگورنٹیال نے ضلع کلکٹر آفس میںمیٹنگ طلب کی تھی۔
****************************

01.10.2017_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR News Bulletin, Aurangabad 01.10.2017 06.50

Text-AIR News Bulletin, Aurangabad 01.10.2017 06.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** मुंबईत पादचाऱ्यांसाठी पूल बंधनकारक करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय

** पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवण्याचे तसंच समान कर, समान इंधन दर प्रणाली अंमलात आणण्याची शिवसेनेची दसरा मेळाव्यात मागणी

** साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुभारंभ

आणि

** ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पाचवा आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आज नागपूरमध्ये खेळला जाणार

****

मुंबईत एल्फिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरीत झालेल्या २३ जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उपनगरीय रेल्वेमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी काल रेल्वे मंडळाची मुंबईत बैठक घेतली. या बैठकीत स्थानकावरून चालत जाण्यासाठीचे पादचारी पुल हे आता प्रवाशांची सुविधा म्हणून नव्हे तर बंधनकारक म्हणून असतील, असे निर्देश गोयल यांनी दिलेत. तसंच ज्या स्थानकावर अधिक गर्दी असते अशा ठिकाणी अधिकच्या लिफ्ट बसवण्याचे निर्देशही गोयल यांनी यावेळी दिले. याशिवाय या कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यांनी नियुक्त केली. दरमहा ही समिती कामांचा आढावा घेणार आहे.

****

      केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये चिंचभुवन ते नवीन विमानतळ दरम्यानच्या मेट्रो रेल्वेच्या चाचणी सेवेला काल हिरवा झेंडा दाखवला. या दोन स्टेशनमध्ये साडेपाच किलोमीटरचं अंतर आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे रोजगाराच्या २० हजार संधी निर्माण होणार असून आर्थिक विकासाला गतीदेखील मिळेल, असं सांगितलं.

****

विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या सणाला उद्योग आणि व्यापारी जगतात अधिक महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्ट्याही या सणाचं देशाच्या प्रत्येक भागात वेगवेगळं महत्त्व आहे, त्यामुळे परंपरेनुसार हा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. नागपूर इथं दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा पार पडला. जगाला आत्ता भारताच्या शक्तीचा परिचय होत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले. गोरक्षा, चीन, पाकिस्तान, रोहिंग्या, आदी मुद्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. शिवसेनेचाही दसरा मेळावा मुंबईत पार पडला.

सरकारनं पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवावेत तसंच समान कर प्रणालीसोबत समान इंधन दर प्रणाली अंमलात आणण्याची मागणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलतांना केली. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४० रूपये प्रतिलिटर असून या दरानुसार भारतातही पेट्रोलचे दर असावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्या भाषणात ठाकरे यांनी केंद्र सरकारची धोरणं आणि भारतीय जनता पक्षावरही जोरदार टीका केली. यामध्ये बुलेट ट्रेन, रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न, जम्मू काश्मीरची स्वायत्तता, नोट बंदी, वस्तु आणि सेवा कर, गोहत्या, वाढती महागाई आदि मुद्यांचा समावेश होता. हिंदुत्त्वाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षावरही ठाकरे यांनी कडाडून टीका केली. राज्य सरकारच्या अनेक निर्णयांवरही ठाकरे यांनी आपल्या भाषणातून नापसंती व्यक्त केली, त्याचबरोबर राज्यात सत्तेत राहून जनहिताची भूमिका घेतली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट या भगवानबाबा यांच्या जन्मगावी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल दसरा मेळावा घेतला. पाथर्डी इथल्या भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेवशास्त्री यांनी परवानगी नाकारली होती. या मेळाव्याला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. सावरगाव इथं भगवान बाबांची पाण्यावर तरंगणारी मूर्ती उभारण्यात येणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथ कुलस्वामिनी तुळजभवानीचा सीमोल्लंघन सोहळा सूर्योदयाच्या पहिल्या किरणात काल पहाटे पार पडला. लाखोच्या संख्येनं भाविकांची या सोहळ्याला उपस्थिती होती. काल झालेल्या सीमोल्लंघन आणि धार्मिक विधीनंतर येत्या ५ तारखेपर्यंत तुळजाभवानी श्रम निद्रा घेणार आहे.

नांदेड इथं गेल्या ३०० वर्षांपासूनची परंपरा असलेला दसरा हल्ला महल्ला उत्सव आणि नगरकीर्तन सोहळा काल जल्लोषात पार पडला. गुरुद्वारा तख्त सचखंद हुजूरसाहिब मध्ये हा उत्सव साजरा करण्यात येतो. काल काढण्यात आलेल्या हल्ला महल्ला आणि नगरकीर्तन यात्रेमध्ये घोडे, हत्तींची मिरवणूक, कीर्तन जत्त्थे, भजन मंडळी तसंच बँड पथकांचा समावेश होता.

*****

धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीनं नागपूर इथं दीक्षा भूमीवर मुख्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

औरंगाबाद लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना केंद्रात भंते विशुद्धानंद बोधी यांनी उपासकांना धम्मसेना दिली. यावेळी शहर आणि परिसरातून उपासकांची उपस्थित होती.

परभणी इथं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी पंचरंगी ध्वजास मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनंही दसऱ्यानिमित्त परभणी इथं पथसंचलन करण्यात आलं. 

****

शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज करणार आहेत. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.  शिर्डी-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ ही आज राष्ट्रपती करणार आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू मानून सहकार चळवळ अधिक गतिमान करावी, असं आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी, कामगारांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्याकरता लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं जानकर यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता ही सेवा आणि मिशन ९० दिवस या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे जिल्ह्यात शौचालय बांधकामाच्या कामाला गती मिळाली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.....

स्वच्छताही सेवा या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांमध्ये सर्व नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छतारथ, परिसर स्वच्छता, वैयक्तीक स्वच्छालय बांधकामं आणि वापर याबाबत जनजागृती, तुळजापूर इथल्या एका महिलेनं जोगवा मागून मिळालेल्या उत्पन्नातून स्वच्छालयं बांधकाम, भुम तालुक्यातील एका महिलेनं मंगळसुत्र विकून स्वच्छालयाच बांधकाम केलं. तुळजापूर तालूक्यातील एका शिक्षकानं स्वतःच्या पैश्यातून तीस स्वच्छालयं बांधली, कंचेश्वर ग्रुपने शंभर स्वच्छालयांचे खंडे खोदून दिले. बालाजी अमायन्स कंपनीनं सामाजिक दायीत्व निधीतून दोन गावात चोवीस सर्वाजनिक स्वच्छालयं बांधकामं सुरु केली आहेत. एकाच दिवशी दहा हजार स्वच्छालयं खड्डे खोदण्याचा उपक्रमही या अभियानात केला गेलायं. त्यामुळे जिल्ह्यात वैयक्तिक स्वच्छालयांची संख्या वाढत असून त्याचा वापरही वाढत आहे.-देवीदास पाठक,वार्ताहर,उस्मानाबाद



****

ऑस्ट्रेलिया विरूद्धचा पाचवा आणि अंतिम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आज नागपूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल. प्रारंभीचे तिन्ही सामने जिंकून भारतानं ही मालिका अगोदरच जिंकली आहे. मात्र चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियानं २१ धावांनी जिंकला होता.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे चार दरवाजे काल सकाळी अर्ध्या फूटानं उघडण्यात आले. नदीपात्रात दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं. धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून जलाशयात पाण्याची आवक चालूच असल्यामुळे विसर्गात वाढही करण्यात येऊ शकते. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही प्रत्येकी एक हजार आणि चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

 ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जालना शहरात येत्या दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतचं नियोजन करण्यासाठी काल जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...