आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०१ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी आज शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. राज्यपाल सी विद्यासागर राव,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित आहेत. शिर्डी इथल्या श्री
साईबाबा संस्थानच्या साईशताब्दी वर्ष सोहळ्याचा तसंच शिर्डी - मुंबई विमानसेवेचा शुभारंभही
राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रपती
पद स्वीकारल्यानंतर कोविंद यांनी आपल्या साध्या आणि सरळ स्वभावानं जनतेच्या मनात स्थान
निर्माण केल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
अशूरा अर्थात मुहर्रम महिन्याचा
दहावा दिवस आज देशातल्या अनेक भागात पाळण्यात येत आहे. सत्य, पवित्रता अणि न्यायाच्या
रक्षणासाठी बलिदान देणारे मोहम्मद पैंगंबरांचे नातू हजरत इमाम हुसैन आणि त्यांच्या
सहकार्यांचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं. यानिमित्त आज ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे
मिरवणूक काढण्यात येत आहे.
****
सीमा सुरक्षा बलांन जम्मु
कश्मीरमधल्या अर्निया इथं १४ फूट लांबीच्या भुयारातून घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा
डाव उधळून लावला. अर्निया इथं सीमा रेषेजवळ हे भुयार सीमा सुरक्षा दलाला आढळलं. या
भुयारातून दोन मॅगनिज, ६० फैरी झाडता येतील इतका दारूगोळा, एक हात गोळा आणि इतर स्फोटक
जप्त करण्यात आली आहेत.
****
चौथा आद्यक्रांतीकारक गुरूवर्य
लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी
देण्यात येणार आहे. एक लाख एक रूपये रोख, मानपत्र, दांडपट्टा, स्मृतीचिन्ह आणि घोंगडी
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते
समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
सरकारनं पाच जीवनावश्यक वस्तुंचे
दर स्थिर ठेवावेत तसंच समान कर प्रणालीसोबत समान इंधन दर प्रणाली अंमलात आणण्याची मागणी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या दसर्या मेळाव्यात ते
काल मुंबई इथं बोलत होते. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर ४० रूपये प्रतिलिटर असून या
दरानुसार भारतातही पेट्रोलचे दर असावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
No comments:
Post a Comment