Saturday, 21 October 2017

Text-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.10.2017 11.00

आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२१ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप काल मध्यरात्री मागे घेण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संप मागे घेत असल्याचं कर्मचारी संघटनांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत,सरकार आणि संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे विचार करून निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
आज देशभरात पोलिस स्मृती दिवस पाळला जात आहे. चीनलगतच्या भारतीय सीमेचं रक्षण करताना आपल्या आयुष्याचं बलिदान देणाऱ्या दहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या, तसंच देशाची एकता टिकवण्याच्या कार्यासाठी आयुष्याचं बलिदान देणाऱ्या चौतीस हजार चारशे आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या त्यागाचं स्मरण करण्याकरता हा दिवस पाळला जातो. या दिनाच्या औचित्यानं आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलिस मुख्यालयातल्या पोलिस स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. अहमदनगर इथे पोलिस शहीद स्मारकावर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देशभरातल्या तीनशे एंशी हुतात्मा पोलिसांच्या नावांचं वाचन करण्यात आलं.
****
दिवाळीनिमित्त होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून उद्या नांदेड-मुंबई-नांदेड अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी नांदेडहून उद्या दुपारी साडेतीनला निघेल तर परतीच्या फेरीत मुंबईहून तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता निघेल. ही गाडी मनमाड,औरंगाबाद,जालना, परभणी या स्थानकांवर थांबेल.
****
 सांगली जिल्ह्यात तासगाव-कवठेमहांकाळ रस्त्यावर योगेवाडी गावाजवळ आज पहाटे झालेल्या ट्रक अपघातात १० जण ठार तर अन्य १३ जण जखमी झाल्याचं झाल्याचं वृत्त आहे. एसटीच्या संपामुळे सुमारे अठरा ते वीस कामगार ट्रकमधून सांगलीला जात असताना ट्रक उलटल्यामुळे हा अपघात झाला. 
****
औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागामधल्या राजीवगांधीनगरमध्ये काल दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला गॅसच्या सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकजण ठार तर अन्य २ जण गंभीर जखमी झाले.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार अमल दत्ता यांचं काल कोलकाता इथे निधन झालं. ते चौऱ्याएंशी वर्षांचे होते.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...