Sunday, 1 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 April 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ एप्रिल  २०१८ दुपारी १.०० वा.

****



  दक्षिण काश्मीरमध्ये आज सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या चकमकीत दहा दहशतवादी ठार झाले, तर तीन जवान जखमी झाले. यात हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याचा समावेश आहे. शोपिया जिल्ह्यात सात दहशतवादी, तर अनंतनाग जिल्ह्यात एक दहशतवादी मारला गेला, आणि एका दहशतवाद्यानं आत्मसमर्पण केल्याचं पोलिस महानिदेशक एस पी वैद यांनी सांगितलं. शोपिया जिल्ह्यात कछदूरा परिसरात तिसरी चकमक सुरु असून, यात दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसई पेपरफुटी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन खासगी शाळांच्या शिक्षकांसह एका खासगी शिकवणी चालकाला आज अटक केली. शिकवणी चालक तौकीरनं बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर सुरु होण्याच्या अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका शिक्षकांना पाठवल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत ६० जणांची चौकशी करण्यात आली आहे.

 दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीएसईच्या अध्यक्षांना पाठवण्यात आलेल्या ईमेल संदर्भात गुगलकडून माहिती मिळाली आहे. संबंधित ईमेल आयडी मिळाला असून, मेल पाठवणाऱ्याची ओळख पटली असल्याचं गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त आर पी उपाध्याय यांनी सांगितलं. दहावीच्या विद्यार्थ्याला वॉट्सअपवर गणिताचा पेपर मिळाला होता. त्यानं आपल्या वडिलांच्या ई-मेल आयडीवरून सीबीएसईच्या अध्यक्षांना याबाबतचा मेल पाठवला होता. याप्रकरणी संबंधित विद्यार्थी आणि आणि त्याच्या वडिलांची चौकशी सुरू आहे.

****



 देशभरात मालवाहतुकीसाठी इलेक्ट्रॉनिक बिल प्रणाली आजपासून लागू झाली. त्यानुसार व्यापारी आणि वाहतुकदारांना ५० हजार रुपयांहून अधिक मूल्याचा माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जाण्यासाठी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी निरीक्षकाला ई-वे बिल सादर करावं लागणार आहे. ई-वे बिलाच्या वैधतेचा कालावधी जीएसटी अर्ज ई डब्ल्यू बी- एक च्या भाग बी मधलं विवरण दिल्यानंतरच लागू होणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. वाहतुकदारांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल पाठवण्यासाठी दोन्ही वाहतुकदारांकडे एकच ई-वे बिल असणं गरजेचं असेल, असंही अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे.

****



 युवा डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करण्याच्या उद्देशाशी प्रामाणिक राहून सेवा करण्याचं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. जयपूर इथल्या महात्मा गांधी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टरांनी विनम्र, भावनाप्रधान तसंच मदतीचा हात देणारं बनावं, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हवामानातील बदल तसंच तापमानवाढ सारख्या समस्यांवर सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचंही ते म्हणाले.

****



 भारतीय तेल महामंडळानं २०३० पर्यंत आपलं पेट्रो रासायनिक उत्पादन तसंच तेल-संशोधन क्षमता दुप्पट करण्याचं ध्येय ठेवलं आहे. उत्पादन १५ कोटी टन करण्याचं उद्दीष्ट असून, त्यासाठी एक लाख ४३ हजार कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. पेट्रोलियम पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी हा विस्तार केला जाणार असून, महामंडळानं पेट्रो रासायनिक आणि पर्यायी इंधन क्षेत्रातही काम सुरु केलं असल्याचं मंडळाचे संचालक बी.वी रामा गोपाल यांनी सांगितलं.

****

 मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या कथित मानवाधिकाराच्या उल्लंघनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दहा राज्यांच्या पोलिस महानिदेशकांना उत्तर मागितलं आहे. एकांत कारावास, कैद्यांना कुटुंबियांना भेटण्याचा अधिकार आणि त्यांचं मानसिक समुपदेशन यासारख्या मुद्यांवर, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, आसाम आणि बिहार या राज्यांना आठ मे पर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. तुरुंगाचे नियम आणि मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप न्यायालयाच्या मदतीसाठी नियुक्त केलेल वकील गौरव अग्रवाल यांनी केला आहे.

****



 यावर्षी रेडीरेकनर दरात बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरवर्षी एक एप्रिल रोजी या दरांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ केली जाते. मात्र यंदा दरवाढ न करण्याच्या निर्णयामुळे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली उत्पन्नात घट होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेस पक्ष अधिक जागा जिंकेल, असा विश्वास गुजरातचे काँग्रेस प्रभारी खासदार राजीव सातव यांनी व्यक्त केला आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. गुजरातमध्ये पक्षबांधणीला आपलं प्राधान्य असल्याचं सातव म्हणाले. सातव यांची नुकतीच गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असल्याचं, सातव म्हणाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं, गुजरातमधल्या सर्व २६ जागा जिंकल्या होत्या.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



1 एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



जम्मू काश्मीरमध्ये आज सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगवगेळ्या चकमकीत आठ दहशतवादी ठार झाले. शोपिया भागातल्या कचदूरा परिसरात झालेल्या चकमकीत सात दहशतवादी मारले गेले, तर लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर एक जिवंत पकडला. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच लष्करानं शोधमोहीम सुरु केली. अजूनही याठिकाणी चकमक सुरु असल्याचं यबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 ईस्टर संडे आज साजरा केला जात आहे. ख्रिस्ती धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. येशू ख्रिस्तानं दिलेल्या शांतता आणि बंधुभावाच्या संदेशाचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. तर, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होण्याचा हा दिवस म्हणजे, तिरस्कारापेक्षा प्रेम अधिक सामर्थ्यवान असतं, याचं उदाहरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 

****



 इराकमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात मारले गेलेल्या ३९ भारतीय नागरिकांचा मृतदेह आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग आज इराकला जाणार आहेत. उद्या हे पार्थिव घेऊन ते भारतात परत येणार असून, मृतांच्या नातेवाईकांना सोपवणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २०१४मध्ये मोसूल शहरात इसिसनं ४० भारतीयांचं अपहरण केलं होतं.

****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण-पाचोड रस्त्यावर आखातवाडा फाट्याजवळ काल झालेल्या अपघातात पती - पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचा पाच वर्षाचा मुलगा जखमी झाला. औरंगाबाद जवळच्या निपाणी फाट्याजवळ झालेल्या अन्य एका अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि मालवाहू मोटारीमध्ये हा अपघात झाला.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातल्या रस्त्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थ संकल्पात राज्य शासनानं ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे ही माहिती दिली.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 01 April 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  یکم؍اپریل  ۲۰۱۸؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 لاتورمیںریلوے ڈبے تیارکرنے والے کارخانے کاکام تیزی سے مکمل کرکے لاتورکوصنعتی شہربنانے کاعزم ریلوے وزیر پیوش گوئیل نے ظاہر کیا ہے۔لاتورمیںتین مرحلوں میں قائم کئے جانے والے میٹروریلوے کے ڈبے تیارکرنے والے کارخانے کے پہلے مرحلے کاہرنگول ریلوے اسٹیشن سے قریب صنعتی کامپلکیکس میںچارسوایکراراضی پرکل ریلوے وزیر گوئیل اوروزیراعلیٰ دیویندرپھڑنویس کے ہاتھوں سنگ بنیادرکھاگیا۔
 اسی بیچ رکن اسمبلی سجیت سنگھ ٹھاکرکی قیادت میںبھارتیہ جنتاپارٹی کے خاص وفد نے مختلف مطالبات کامیمورنڈم پیش کیا۔شولاپور۔تلجاپور۔ عثمان آبادریلوے لائن شروع کی جائے۔عثمان آبادریلوے اسٹیشن کے پلیٹ فارم کی لمبائی میںاضافہ کیاجائے۔بیدر۔ممبئی۔سوپرفاسٹ ریلوے گاڑی کے ڈبوں میںاضافہ کیاجائے وغیرہ مطالبات اس میمورنڈم کے ذریعے کئے گئے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 سی بی آئی نے ابتدائی چھان بین کے ایک حصے کے طورپرآئی سی آئی سی آئی بینک کے کچھ اہلکاروں کے بیانات درج کئے ہیں۔تاکہ یہ پتہ لگایا جاسکے کہ 2012میںویڈیوکون گروپ کو3ہزار250؍کروڑروپئے کاقرضہ جاری کرنے کے معاملے میںبینک کوکسی قسم کاکوئی معاوضہ یابدلہ تونہیں دیا گیا۔ایجنسی کے اہلکاروں نے بتایا کہ وہ لین دین کے متعلقہ دستاویزات کابھی مطالعہ کررہے ہیںاوراگرانہیں ایساکوئی ثبوت ملا جس سے کسی خلاف ورزی کا اشارہ ملتاہوتوآئی سی آئی سی آئی بینک کی انتظامی ڈائریکٹر اورچیف ایگزیکٹیو آفیسر چنداکوچر،ان کے خاونددیپک کوچر اوردیگر افرادکوتفصیلی پوچھ تاچھ کے لئے سمن جاری کئے جاسکتے ہیں۔انہوںنے بتایا کہ قرضہ جاری کرنے میںشامل آئی سی آئی سی آئی بینک کے نوڈل افسروں کے بیانات کودرج کیاگیاہے۔ ابتدائی پوچھ تاچھ میں ویڈیوکون گروپ کے پرموٹروینوگوپال دھوت، دیپک کوچر اوردیگرنامعلوم افراد کے نام شامل ہیں۔اس میں یہ الزام لگایا ہے کہ وینوگوپال نے 2012 میں آئی سی آئی سی آئی بینک سے تین ہزار250 کروڑروپئے کاقرضہ منظورہونے کے چھ مہینے بعد دیپک کوچرکی ایک کمپنی کوکروڑوں روپئے دئیے تھے۔حالانکہ ابتدائی تحقیقات میںچنداکوچرکانام شامل نہیںہے۔سی بی آئی کے ذرائع نے بتایا ہے کہ ان کانام شامل کرنے کے بارے میں کوئی فیصلہ بعدمیںکسی مرحلے پرکیاجائے گا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 ملک میں آج سے نیاٹیکس طریقہ کارعائدکیاجارہاہے۔مرکزی حکومت نے مالی بجٹ میںظاہرکئے گئے تمام ٹیکس پرعمل درآمدشروع ہورہاہے۔ اس کے تحت نئے مالی سال سے ملک میںچنداشیاء مہنگی اورچند اشیاء سستی ہوجائے گی۔موبائیل،سونا،چاندی،سبزی ترکاری،جوس، ڈینٹل علاج کے لئے درکار اشیاء ،پرفیومس،جوتے چپلیں، ریشمی کپڑے،ایل سی ڈی ٹی وی،کھلونے، سگریٹ ، موم بتی اورکھانے کاتیل،ان اشیاء کی قیمتوں میںاضافہ ہوگا۔تاہم بعض منتخبہ الیکٹرانک اشیائ،خام کاجووغیرہ اشیاء سستی ہوجائے گی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 چھترپتی شیواجی مہاراج کی 338؍ویں برسی کے موقع پرکل اُنہیں تمام ریاست میںخراج عقیدت پی ش کیاگیا۔ ممبئی میںں ودھان بھون کے احاطے میںچھترپتی شیواجی مہاراج کے مجسمے کورکن اسمبلی اشیش شیلارنے ہارپہناکرخراج عقیدت پیش کیا۔اس موقع پرکئی معززشخصیتیں موجودتھیں۔۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 ملک کے زیادہ سے زیادہ شہری پاسپورٹ حاصل کرکے ملک کی ترقی میںحصہ لیں۔ایسی اپیل خارجی اُموروزارت کے سیکریٹری ڈاکٹر دیانیشور مڑے نے کی ہے۔احمدنگرمیںپاسپورٹ آفس کاافتتاح کرتے ہوئے وہ مخاطب تھے۔اُنہوںنے کہاکہ ملک کے صرف چھ فیصد شہری پاسپورٹ یافتہ ہے۔ رکن پارلیمنٹ دلیپ گاندھی اس موقع پرموجودتھے۔احمدنگرمیںشروع کئے گئے اس پاسپورٹ خدمات کافائدہ ضلع کے شہری حاصل کریں۔ ایسی اپیل گاندھی نے اس موقع پرکی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 اورنگ آبادضلع کے پیٹھن ۔پاچوڑراستے پرآکھات واڑہ پھاٹے سے قریب کل ہوئے حادثے میںشوہر۔بیوی جائے حادثے پرہلاک ہوگئے اور ان کا پانچ سال کالڑکازخمی ہوگیا۔دوپہرایک بجے کے قریب یہ حادثہ پیش آیا۔اورنگ آباد سے قریب نیپانی پھاٹے کے پاس ہوئے دیگر ایک حادثے میں ایک شخص ہلاک اوردوافرادشدید زخمی ہوگئے۔ شام کے وقت ٹرک اورمال بردارگاڑی کے درمیان یہ حادثہ پیش آیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 

01.04.2018_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 April 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.

****



Ø  लातूर इथं रेल्वे डबे बांधणी कारखान्याचं भूमीपूजन; दरवर्षी सातशे डब्बे तयार होणार

Ø  दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यातल्या कथित व्यावसायिक संबंधांची प्राथमिक चौकशी सुरू

Ø  देशात आजपासून नव्या करप्रणालीची अंमलबजावणी

आणि

Ø  रेडीरेकनरचा दर कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

*****



 लातूर इथं रेल्वे डबे बांधणी कारखान्याचं काम जलद गतीने पूर्ण करून लातूर हे औद्योगिक शहर बनवण्याचा निर्धार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. लातूर इथं तीन टप्प्यात उभारल्या जात असलेल्या मेट्रो रेल्वे डबे बांधणी कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचं, हरंगुळ रेल्वे स्थानकाजवळ औद्योगिक वसाहतीतल्या चारशे एकर जागेवर काल रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्यावेळी गोयल बोलत होते. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

 या कारखान्याच्या अनुषंगानं, इतर लघु आणि मध्यम उद्योग लातूरमध्ये येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कारखान्यातून सध्या दरवर्षी सातशे डबे तयार होतील, ही संख्या तीन हजारावर नेण्याचा मानसही रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, वर्षभरात या कारखान्यातून रेल्वे डब्यांचं उत्पादन सुरू करून, लातूर विकासाचा नवीन पॅटर्न तयार करण्याचा विश्वास व्यक्त केला. मराठवाड्यातली प्रस्तावित वॉटर ग्रीड - जलवाहिनी जाळे योजना, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, आदी योजनांचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असून, त्यासाठी इस्राइलसोबत करार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 दरम्यान, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्र्यांना विविध मागण्याचं निवेदन दिलं. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग सुरु करावा, उस्मानाबाद रेल्वे स्थानकावरील फलाटाची लांबी वाढवावी, बीदर-मुंबई अतिजलद गाडीचे डबे वाढवावेत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

****



 केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं आय सी आय सी आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यामधील कथित व्यावसायिक संबंधांबाबत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आय सी आय सी आयनं २०१२ मध्ये धूत यांना तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपये कर्ज दिल्यानंतर सहा महिन्यांनी धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप आहे. धूत यांना आय सी आय सी आय बँकेकडून मिळालेलं हे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियासह २० बँकांकडून मिळालेल्या चाळीस हजार कोटी रुपये कर्जाचा भाग आहे. मात्र, या प्राथमिक चौकशीमध्ये चंदा कोचर यांचा समावेश नसून त्यांच्या चौकशीबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सी बी आयनं म्हटलं आहे.

 दरम्यान,  उर्जा नूतनीकरण व्यवसायात अडीच लाख रूपये गुंतवण्यापलिकडे दीपक कोचर यांच्याशी कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यात आले नसल्याचं स्पष्टीकरण व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांनी दिलं आहे.

****



 देशात आजपासून नवी करप्रणाली लागू होत आहे. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घोषित केलेले सर्व कराची अंमलबजावणी सुरु होत आहे. त्यानुसार या नव्या आर्थिक वर्षापासून देशभरात काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. मोबाईल, सोनं, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, दंत चिकित्सेची साधनं, अत्तर, पादत्राणं, रेशीम कपडे, एलसीडी टीव्ही, खेळण्या, सिगारेट, मेणबत्ती आणि खाद्यतेल या वस्तूंच्या दरात वाढ होणार आहे. तर, काही निवडक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कच्चे काजू, आदी वस्तू स्वस्त होणार आहेत.

****



 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अडतीसा व्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना राज्यभरात अभिवादन करण्यात आलं. मुंबईत विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याला अभिवादन केलं. शिवाजी महाराज यांचे विचार आजही प्रेरक असून, रायगड हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं भागवत यांनी यावेळी नमूद केलं. श्री शिवपुण्यस्मृती पुरस्कार ही भागवत यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले. 

****



 देशातल्या अधिकाधिक नागरिकांनी पारपत्रधारक होऊन देशाच्या विकासात सहभागी व्हावं असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी केलं आहे. अहमदनगर इथल्या पारपत्र कार्यालयाचं उद्घाटन करतांना काल ते बोलत होते. देशातली केवळ ६ टक्के जनता पारपत्रधारक असल्याबद्दल यावेळी खंत व्यक्त केली. खासदार दिलीप गांधी यावेळी उपस्थित होते. अहमदनगरमध्ये सुरू झालेल्या या सुविधेचा जिल्ह्यातल्या नागरिकांना लाभ घ्यावा, असं आवाहन गांधी यांनी केलं.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 मालमत्तेचे वास्तव बाजारमूल्य- रेडीरेकनरचा दर कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरवर्षी १ एप्रिल रोजी राज्यात  या मूल्यांमध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ केली जाते. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महसुली उत्पन्नात घट होईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 नीति आयोगानं मागास जिल्ह्यांच्या क्रमवारीत उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश केला आहे, या पार्श्वभूमीवर काल उस्मानाबाद इथं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर ..

केंद्र सरकारच्या निती आयोगानं देशातील 101 जिल्हयातला मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी महत्त्वाकांशी कार्यक्रम हाती घेतला असून त्या नुसार पंतप्रधानांनी जिल्हयाच्या विकासाला चालना देण्यासाठी कार्यक्रम  हाती घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने वाढीव निधी दिला असून यासाठी निधीची कमतरता नसल्याचं प्रतिपादन गोयल यांनी केलं. यावेळी निती आयोगाच्या मागास जिल्हयाच्या क्रमवारीत उस्मानाबाद जिल्हा मागास जिल्हयाच्या तिसऱ्या असल्याची तसंच शिक्षण क्षेत्रात दुसऱ्या तर आरोग्य आणि जलसंसाधण सुविधा मध्ये चौथ्या स्थानी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****



 जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी तात्पुरता निवारा सुरू करणं, शहरातल्या खुल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क विकसित करणं आदी २१ ठरावांना सभागृहानं मान्यता दिली. शहरातल्या आठवडी बाजारात ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागाभाडे वसूल केलं जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केली.

****



 परभणी महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौर मीना वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली काल घेण्यात आली, या सभेत २२ लाख ६ हजार रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विविध विषयांवर नगरसेवकांनी आपली मतं नोंदवली.

****



 राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल सर्वात जास्त ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४२, बीड ४१, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात आणखी उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातल्या रस्त्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थ संकल्पात राज्य शासनानं ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे ही माहिती दिली. यात कंधार – लोहा मतदारसंघातल्या २२ रस्त्यांच्या कामांसाठी ४७ कोटी तर मुख्यमंत्री सडक योजतअंतर्गत दोन रस्त्यांसाठी १३ कोटी रुपयांच्या  निधीचा समावेश आहे.

****



 ईस्टर संडे आज साजरा केला जात आहे. ख्रिस्ती धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या दोन एप्रिल रोजी ‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

*****

***

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...