आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
1 एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू
काश्मीरमध्ये आज सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या दोन वेगवगेळ्या
चकमकीत आठ दहशतवादी ठार झाले. शोपिया भागातल्या कचदूरा परिसरात झालेल्या चकमकीत सात
दहशतवादी मारले गेले, तर लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे अनंतनाग
जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला, तर एक जिवंत पकडला. या भागात दहशतवादी
लपल्याची माहिती मिळताच लष्करानं शोधमोहीम सुरु केली. अजूनही याठिकाणी चकमक सुरु असल्याचं
यबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ईस्टर संडे
आज साजरा केला जात आहे. ख्रिस्ती धर्माचे प्रेषित येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची
आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये सामुहिक
प्रार्थना पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद
आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. येशू
ख्रिस्तानं दिलेल्या शांतता आणि बंधुभावाच्या संदेशाचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं
राष्ट्रपती म्हणाले. तर, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होण्याचा हा दिवस म्हणजे, तिरस्कारापेक्षा
प्रेम अधिक सामर्थ्यवान असतं, याचं उदाहरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा
संदेशात म्हटलं आहे.
****
इराकमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात मारले गेलेल्या ३९ भारतीय
नागरिकांचा मृतदेह आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग आज इराकला
जाणार आहेत. उद्या हे पार्थिव घेऊन ते भारतात परत येणार असून, मृतांच्या नातेवाईकांना
सोपवणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. २०१४मध्ये मोसूल शहरात इसिसनं ४०
भारतीयांचं अपहरण केलं होतं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण-पाचोड रस्त्यावर आखातवाडा फाट्याजवळ काल झालेल्या
अपघातात पती - पत्नी जागीच ठार झाले. या अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचा पाच वर्षाचा
मुलगा जखमी झाला. औरंगाबाद जवळच्या निपाणी फाट्याजवळ झालेल्या अन्य एका अपघातात एक
जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सायंकाळच्या सुमारास ट्रक आणि मालवाहू मोटारीमध्ये
हा अपघात झाला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातल्या रस्त्यांच्या विकासासाठी यंदाच्या अर्थ संकल्पात
राज्य शासनानं ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर
यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे ही माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment