Thursday, 26 April 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 26.04.2018 11.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माजी सैनिकांच्या कल्याणाशी संबंधित तक्रारींची हाताळणी आणि निपटाऱ्याचा आढावा धेतला. ‘प्रगतीया आयसीटी आधारीत मंचाद्वारे आयोजित २५व्या संवादात पंतप्रधानांनी माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्याची गती वाढवण्यावर भर दिला. रल्वे, रस्ते, पेट्रोलियम, वीज, कोळसा, नागरी विकास, तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण क्षेत्रातल्या दहा पायाभूत सुविधांचा आढावाही त्यांनी घेतला. हे प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, डिशा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांमधले आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या अंमलबजावणीचा, तसंच अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्चशिक्षणातल्या पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रमांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

****

शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यात सरकार यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली इथं राष्ट्रीय खरीप परिषद -२०१८ मध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. सरकारची कृषिविषयक धोरणं ही शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यापेक्षा उत्पन्न वाढवण्यावर भर देणारे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्राबरोबर शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन आणि ब्रिटिश कौन्सिल यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि ब्रिटिश कौन्सिलचे संचालक ॲलन गेमेल यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराच्या माध्यमातून ३० हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

****

जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदली धोरणाला मुंबई उच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या आठ मे पूर्वी बदल्यांचे आदेश जारी होतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्या काल मुंबईत शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

****

बीड जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेतल्या लाभार्थींची बंद झालेली खाती पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. येत्या दोन मे ते ३१ मे कालावधीत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

//*********//


No comments: