Friday, 1 February 2019

“आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला बळकट करण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.02.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 February 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

आज सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला बळकट करण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधानांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची ही नांदी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ ही शेतकऱ्यांना लाभदायक असणारी स्वातंत्र्योत्तर काळातली सर्वात मोठी योजना असल्याचं ते म्हणाले. पाच लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याची मागणी सरकारनं पूर्ण केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

****

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं म्हटलं. असंघटीत क्षेत्रातले कामगार आणि मध्यम वर्गासाठी करात सवलत, यासारखे निर्णय घेतल्याबद्दल शहा यांनी, सरकारची प्रशंसा केली.

या अर्थसंकल्पात समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांचा विकास सुनिश्चित केल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली तर या अर्थसंकल्पामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी बळ मिळेल, असं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यक्त केलं.

****

दरम्यान, हा अर्थसंकल्प भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे. मतं मिळवण्यासाठी हा अर्थसंकल्प असून, यात शिक्षण, रोजगार आणि युवकांचे मुद्दे डावलल्याचं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तर या अर्थसंकल्पामुळे गरीबांना काहीही फायदा होणार नसल्याची टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी जाहीर घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, मात्र मध्यम वर्गीयांसाठी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांची त्यांनी प्रशंसा केली.

केंद्र सरकारचा कार्यकाळ फक्त तीन महिनेच राहिलेला असताना, अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या घोषणा केल्या, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते के करुणाकरन यांनी म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प, देशातला सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेऊन सादर केलेला हा अर्थसंकल्प असून, अशा घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामाच असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकी, या अर्थसंकल्पातून दिसत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

****

शौर्य गाजवणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये अनुदान आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत महाराष्ट्रातल्या शौर्य तसंच सेनापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीनं वाढ केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

****

जलयुक्त शिवार योजना आणि पाण्याचा काटकसरीनं वापर यातूनच, मराठवाड्यातला दुष्काळ संपवता येईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज पाचव्या ‘महाॲग्रो’ या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधल्या अडत हमालीतून सरकारनं शेतकऱ्यांची मुक्तता केली असून, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

परभणी इथल्या, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यावेळी उपस्थित होते, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं विद्यापीठ कमी पडणार नसल्याची हमी, कुलगुरु डॉ.ढवण यांनी दिली. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचे चार धक्के बसले. पहिला धक्का सकाळी सात ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार पूर्णांक रिश्टर स्केल तीव्रतेचे हे धक्के बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान हॅमिल्टन इथं झालेला तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना न्यूझीलंडनं सात गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी दिलेलं १५० धावांचं लक्ष्य न्यूझीलंडच्या संघानं सात गडी राखत पूर्ण केलं.
****

“शेतकरी, असंघटीत कामगार, लघू आणि मध्यम उद्योजक आणि वैयक्तिक करदात्यांसाठी अनेक उपाययोजना असणारा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सादर केला.” – यह और अन्य समाचार सुनने के लिए क्लिक करें -

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.02.2019....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 February 2019

Time 2.00 to 2.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ दुपारी २.०० वा.

****

शेतकरी, असंघटीत कामगार, लघू आणि मध्यम उद्योजक आणि वैयक्तिक करदात्यांसाठी अनेक उपाययोजना असणारा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत सादर केला.

प्रधानमंत्री किसान योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. याअंतर्गत दोन हेक्टर अर्थात पाच एकर पर्यंत भूधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यात येणार असून, दोन हजार रुपयांच्या तीन टप्प्यात ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होईल. पहिला हप्ता मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, बारा कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल. किसान क्रेडीट कार्डमार्फत पशूपालनासाठी कर्जाच्या व्याजावर दोन टक्के सूट जाहीर करण्यात आली असून, या कर्जाच्या नियमित परतफेडीवर ३ टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे.

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जाहीर करण्यात आली असून, अल्प अंशदानाच्या माध्यमातून या कामगारांना वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा तीन हजार रुपये वेतन मिळेल. यासाठी ५०० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, प्रमाणित वजावट चाळीस हजार रुपयांवरून पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे. टपाल तसंच बँकेतल्या जमा रकमेवरच मिळणारं ४० हजार रुपयांपर्यंतचं व्याज करमुक्त करण्यात आलं आहे. घरभाडेपोटी मिळणारं दोन लाख ४० हजार रुपये पर्यंत उत्पन्न करमुक्त तसंच दुसरं घरही पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे.

पुढच्या दहा वर्षांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आली असून, भौतिक सुविधा, डिजिटल भारत, प्रदूषण मुक्त भारत, ग्रामोद्योग विकास, स्वच्छ नद्या व पेयजल, मानवी अंतराळ मोहीम, किनारपट्टी आणि जलमार्गांचा पूर्ण वापर, अन्न धान्य आत्मनिर्भरता, सुदृढ भारत, किमान शासन कमाल प्रशासन, याद्वारे पुढच्या आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था दहा ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आलं आहे.

छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजात दोन टक्के सूट देण्यात आली असून, घर खरेदीदारांचा वस्तू सेवा कराचा बोझा कमी करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे.

भटके विमुक्त विकासासाठी कल्याण मंडळ, गोवंश विकासासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोग, मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र विभाग, पुढच्या पाच वर्षांत एक लाख खेड्यांचं डिजिटायझेशन, ग्रॅच्युईटीची मर्यादा दहा लाख रुपयांवरून ३० लाख रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ, भविष्य निर्वाह निधी अंतर्गत मृत्यू विम्याची रक्कम अडीच लाख रुपयांवरून सहा लाख रुपये, आदी तरतुदींचा या अंतरिम अर्थसंकल्पात समावेश आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे तीन लाख कोटी रुपये करण्यात आली असून, शिक्षण, आरोग्य, बालविकास, रेल्वे, अनुसूचित जाती जमाती विकास, आदी विभागांसाठीची तरतूदही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

****

औरंगाबाद इथं आयोजित पाचव्या महाॲग्रो कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज झालं. ‘पद्मश्री भंवरलाल जैन प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ एकूण १२ शेती गट, शेतकरी कंपनी यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आले. पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रमासमोर कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात आयोजित या चार दिवसीय प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित २०० कंपन्यांचे स्टॉल, शेती बाजार, पीक प्रात्यक्षिकासह चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत.

****

घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत एक रुपया ४६ पैशांनी कमी झाली आहे. विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ३० रुपये कमी करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले.

****

पुण्यात नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांना राज्य सरकारनं काल मुंबईत सन्मानित केलं. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य पदक विजेत्यांना ५० हजार रुपये पारितोषिक दिलं. या स्पर्धेत महाराष्ट्रानं ८५ सुवर्ण पदकांसह एकूण २२७ पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या कमकुवत ११ बँकांपैकी बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या तीन बँकांवरचे कर्ज देण्यावरचे निर्बंध रिजर्व्ह बँकेनं हटवले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्जपुरवठ्याच्या व्याप्तीत वाढ होणार आहे.

****

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01 02 2019 10 53

Regional Urdu Text  Bulletin, Aurangabad, Date : 01.02.2019 , Time : 8.40-8.45 am

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 02 January - 2019
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲؍جنوری  ۲۰۱۹؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
***** ***** *****
 مرکزی وزیرِ مالیات پیوش گوئل آج لوک سبھا میں مالی سال 2019-20 کا عبوری بجٹ پیش کرینگے۔ آکاشوانی سے آج صبح دس بجکر دس منٹ سے بجٹ کو براہِ راست نشر کیا جائیگا۔ اس بیچ پارلیمنٹ کے بجٹ اجلاس کی کل صدرِ جمہوریہ جناب رامناتھ کووند کے خطبے سے شروعات ہوئی۔ بجٹ اجلاس تیرہ فروری تک چلے گا۔ کل راجیہ سبھا میں بھارت کے سابق وزیرِ دفاع جارج فرنانڈیس کو خراجِ عقیدت پیش کیا گیا۔ دوسری جانب صدرِ جمہوریہ کے خطاب پر تنقید کرتے ہوئے کانگریس نے کہا کہ اُن کی تقریر میں کچھ بھی نیا نہیں تھا اور یہ انتخابی تقریر تھی۔ کانگریس رہنما ملکارجن کھڑگے نے کل پارلیمنٹ کے احاطے میں اخباری نمائندوں سے گفتگو کرتے ہوئے یہ بات کہی۔
وہیں اقلیتی اُمور کے مرکزی وزیر مختار عباس نقوی نے کہا کہ حکومت نے کسی قسم کا بھید بھائو والا رویہ نہ اپناتے ہوئے ہر سطح کے لوگوں کی ترقی کا عہد کیا ہوا ہے۔
 اس دوران حکومت نے بجٹ اجلاس کے دوران ایوان کا کام کاج معمول کے مطابق چلنے دینے کیلئے کل دونوں ایوانوں کے سبھی پارٹیوں کے اراکین کے ساتھ میٹنگ بھی کی۔
***** ***** *****
 مہاراشٹر کے وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے فوج میں شہید ہونے والے جوانوں کے اہلِ خانہ کو پچاس لاکھ روپئے‘ دو ہیکٹر زمین اور بہادری کا مظاہرہ کرنے پر دئیے جانے والے شوریہ پَدَک یافتہ فوجیوں کو دی جانے والی امداد میں دوگناگ اضافہ کرنے کا اعلان کیا ہے۔ وزیرِ اعلیٰ پھڑنویس کل ممبئی میں ایک تقریب میں بول رہے تھے۔ انھوں نے کہا کہ شہیدوں کے خاندان کا احسان مند رہنا ہمارا فرض ہے۔
***** ***** *****
 سماجی خدمتگار انّا ہزارے کی جانب سے لوک پال اور دیگر مطالبات کی یکسوئی کیلئے جاری بھوک ہڑتال پر اُن سے ملاقات کرکے بات چیت کی جائیگی۔ آبی وسائل کے وزیر گریش مہاجن نے یہ بات کہی۔ وہ کل ناسک ضلع کے ترمبکیشور میں اخباری نمائندوں سے گفتگو کررہے تھے۔ مہاجن نے کہا کہ وہ اس بات کی کوشش کرینگے کہ انّا ہزارے اپنی بھوک ہڑتال ختم کردیں۔ دریں اثناء مہاجن نے اُن خبروں کو بے بنیاد بتاتے ہوئے خارج کیا جن میں کہا گیا تھا کہ بھارتیہ جنتا پارٹی کے قومی صدر اَمت شاہ نے شیوسینا صدر اُدّھو ٹھاکرے کو فون کیا ہے۔ مہاجن نے کہا کہ یہ خبر محضـ افواہ ہے۔
***** ***** *****
 وائس ایڈمرل اجیت کمار نے بھارتی بحریہ کی مغربی کمانڈ کے سربراہ کا عہدہ سنبھال لیا ہے۔ انھوں نے کل ممبئی میں اپنے عہدے کاجائزہ لیا۔ بحریہ کی مغربی کمانڈ کے سربراہ وائس ایڈمرل گریش لوتھرا کے سبکدوش ہونے کے بعد اجیت کمار نے یہ عہدہ سنبھالا ہے۔
***** ***** *****
 آج سے اورنگ آباد میں ریاستی سطح کی پانچویں زرعی نمائش ’’مہا ایگرو‘‘ شروع ہورہی ہے۔ پیٹھن روڈ پر مہانُوبھو آشرم کے سامنے واقع کرشی وِگیان کیندر میں مہا ایگرو منعقد کیا گیا ہے۔ اس زرعی نمائش کا افتتاح صبح گیارہ بجے عمل میں آئیگا۔ چار دنوں تک چلنے والی اس نمائش میں دو سو زرعی کمپنیوں کے اسٹالس ہونگے جہاں زرعی اوزار‘ بازار اور فصلوں سے متعلق جدید معلومات دی جائیگی۔ اس کے علاوہ ورکشاپ اور کانفرنسوں کے دوران زرعی ماہرین‘ کھیتی اور اُس سے مربوط کاروبار کے بارے میں رہنمائی بھی کرینگے۔
***** ***** *****
 مراٹھواڑہ کی علاقائی نابرابری کو ختم کرنے اور ترقی کی راہ پر گامزن ہونے کیلئے مراٹھواڑہ کے سبھی عوامی نمائندوں‘ افسران اور محققین کو متحد ہونے کی ضرورت ہے۔ اس خیال کا اظہار قانون ساز اسمبلی اسپیکر ہری بھائو باگڑے نے کیا ۔ وہ کل اورنگ آباد میں مراٹھوا ڑہ میں پانی کے مسائل پر منعقدہ ایک تقریب میں بول رہے تھے۔ باگڑے نے تقریب میں مراٹھواڑہ کے بیشتر اراکینِ اسمبلی اور اراکینِ پارلیمنٹ کے نہ آنے پر افسوس کا اظہار کیا۔ اس موقعے پر مراٹھوا ڑہ ترقیاتی کارپوریشن کے صدر ڈاکٹر بھاگوت کراڑ‘ رکنِ اسمبلی پرشانت بمب‘ اورنگ آباد کے میئر نند کمار گھوڑیلے‘ ناندیڑ کی میئر شیتل بھورے‘ کے علاوہ کئی محققین اور عوامی نمائندوں نے مراٹھواڑہ کے مسائل پر تبادلۂ خیال کیا۔
***** ***** *****
 اورنگ آباد میونسپل کارپوریشن کے احاطے میں رہنے والے شہریوں کے واجب الادا پراپرٹی ٹیکس پر لگائے جانے والے سود کی رقم اور اضافی فیس کو پوری طرح معاف کرنے کا مطالبہ رکنِ اسمبلی ستیش چوہان نے کیا ہے۔ چوہان نے اس بارے میں اورنگ آباد کے میئر نند کمار گھوڑیلے اور میونسپل کمشنر نپون ونائک سے مطالبہ کیا ہے۔
***** ***** ***** 
 پربھنی کے مشہور سیّد شاہ تراب الحق کے عرس تقریبات کی کل سے شروعات ہوئی۔ اس عرس میں مہاراشٹر کے مختلف حصوں سے ہندو۔ مسلم عقیدت مند بڑی تعدادمیں شرکت کرتے ہیں۔ عرس پندرہ دن چلے گا۔ صندل کا جلوس کل نکالا جائیگا۔
***** ***** *****
 بھارت اور نیوزی لینڈ کے درمیان کل ہیملٹن میں کھیلا گیا چوتھا ایک روزہ کرکٹ مقابلہ نیوزی لینڈ نے آٹھ وکٹ سے جیت لیا۔ پانچ ایک روزہ مقابلوں کی اس سیریز میں بھارت تین۔ ایک سے برتری کے ساتھ سبقت حاصل کیے ہوئے ہے۔
***** ***** *****
 اسپین میں جاری خواتین کے ہاکیت مقابلوں میں کل بھارت نے میزبان اسپین کو دو۔ دو کی برابری پر روکے رکھا۔ کل بھارتی ٹیم کا مقابلہ 2018ء کی رَنر اَپ ٹیم آئر لینڈ سے ہوگا۔
***** ***** ***** 

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 01.02.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ फेब्रुवारी  २०१९  सकाळी ७.१० मि.

****

·       २०१९-२० या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार

·       चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज

·       मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी एकत्र यावं - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचं आवाहन 

आणि

·       पाचव्या राज्यस्तरीय 'महा अॅग्रो' कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ

****

केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आज २०१९-२० या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागाकडून आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी करण्यात येणार आहे. दरम्यान काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. १३ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालेल. राज्यसभेत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काहीही नावीन्य नव्हतं, हे निवडणुकीचं भाषण होतं, अशी टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. या अभिभाषणानंतर ते संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.

अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यासंदर्भात बोलताना, सरकारनं भेदभाव न करता सर्व स्तरातल्या लोकांचा विकास सुनिश्चित केल्याचं नमूद केलं.     

दरम्यान, कालपासून सुरू झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, सरकारनं काल दोन्ही सभागृहातल्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतली.

****

चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक सात दशांश ऐवजी सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील, असा अंदाज सरकारनं वर्तवला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. कृषी, वन, मत्स्योद्योग, खनिकर्म या क्षेत्रातला विकास दर पाच टक्के राहील तर उद्योग क्षेत्रात सहा टक्के आणि सेवा क्षेत्राचा विकास दर आठ पूर्णांक एक दशांश टक्के राहील असा अंदाज सांख्यिकी कार्यालयानं वर्तवला आहे.

दरम्यान, जानेवारी २०१९ या महिन्यात वस्तू आणि सेवा कर प्राप्तीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थमंत्रालयानं काल ट्वीटरवरुन ही माहिती दिली.

****

पश्चिम नौदल क्षेत्राचे प्रमुख म्हणून व्हाईस ‍अॅडमिरल अजित कुमार यांनी काल मुंबईत पदभार स्वीकारला. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथ्रा निवृत्त झाल्यामुळे अजित कुमार यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.

****

राज्यातल्या शहरी गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनानं सतरा  हजार आठशे सतरा घरं मंजूर केली आहेत. केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. देशात एकूण चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे सत्तर घरं मंजूर करण्यात आली आहेत.

****

राज्यातल्या उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना सवलतीच्या दरानं वीज पुरवठा करण्याचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. शेतकऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने एक नोव्हेंबर २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत हा वीजदर लागू राहणार आहे. अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये, दोन हेक्टर जमीन तर शौर्य-सेवा पदक धारकांच्या अनुदानात दुपटीने वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. शहीदांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषणासंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. हजारे यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केला, ही अफवा असल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं.

****

मराठवाड्याचा प्रादेशिक असमतोल दूर होऊन विकास व्हावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अभ्यासकांनी एकत्र यावं, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल एकात्मिक राज्य जल आराखडा आणि मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चासत्र झालं, त्यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राकडे मराठवाड्यातल्या बहुतांश आमदार खासदारांनी पाठ फिरवल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, नांदेडच्या महापौर शिला भवरे, यांच्यासह मराठवाडा विकास परिषदेच्या सदस्यांनी मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा केली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

 ****

औरंगाबाद इथं आजपासून पाचव्या राज्यस्तरीय 'महा अॅग्रो' कृषी प्रदर्शनाला सुरूवात होत आहे. पैठण रस्त्यावरील महानुभाव आश्रमासमोरील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आज सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे. या चार दिवसीय प्रदर्शनात शेतीविषयक नामांकित २०० कंपन्यांचे स्टॉलस, शेती बाजार, पीक प्रात्याक्षिकासह चर्चासत्र आणि परिसंवादातून शेती, शेतीपूरक उद्योगांबाबत कृषीतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या निमगिरी इथल्या ८० हेक्टर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून जंगल निर्माण करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या पुढाकारानं होत असलेल्या या उपक्रमाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

यात वड, पिंपळ, पेरू, आंबा आदी झाडांची वाढ आठ ते नऊ फुट झाली आहे.विभागीय वन अधिकारी विजय सातपुते म्हणाले…



 निमगिरी येथिल ८० हेक्टर क्षेत्रात ४३ हजार झाडं लावण्यात आली असून सर्व झाडांची वाढ आत्ता आठ ते नऊ फुट झाली आहे.भविष्यात जंगल निर्माण करून भविष्यात पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा प्रयत्न चालू आहे.आणि यासाठी पर्यावरण प्रेमींची मागणी असल्यामुळे आणि त्यांचा सहभाग असल्यामुळे हे काम आम्ही निश्चितच पुर्ण करू.



परिणामी भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. विनोद कापसीकर आकाशवाणी वार्ताहर परभणी.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगर परिषदेसाठी येत्या २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कालपासून नगर परिषदेच्या क्षेत्रात आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी संजय सावंत यांनी दिली. निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रं पाच ते १२ फेब्रुवारी दरम्यान स्वीकारली जाणार आहेत. तर १८ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहेत. येत्या दोन मार्चला नगर परिषदेची मुदत संपत आहे.

****

येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातल्या सर्व मतदारांनी या यादीत आपलं नाव आहे का? याची खात्री करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे. 

****

उस्मानाबाद शहरातल्या पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अमोल अंकुशराव याला २० वर्ष सक्तमजुरी आणि १८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं काल ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.

****

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ- नाफेडच्यावतीनं नांदेड जिल्ह्यात नांदेड, मुखेड आणि देगलूर या तीन ठिकाणी हमीभावानं तूर खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आधारभूत दरानं या तुरीची शासन खरेदी करणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथं झालेला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना न्यूझीलंडनं आठ गडी राखून जिंकला. पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशा फरकानं भारतानं याआधीच विजयी आघाडी घेतली आहे.

****

स्पेनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी सामन्यांमध्ये काल भारतानं यजमान स्पेनला दोन दोन असं बरोबरीत रोखलं. उद्या भारताचा सामना २०१८च्या उपविजेत्या आयर्लंडसोबत होईल.

****

औरंगाबाद महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या रहिवाशांच्या थकीत मालमत्ता करावरील संपूर्ण व्याज आणि दंड माफ करावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महापौर नंदकुमार घोडेले आणि महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. मालमत्ता कराच्या व्याज आणि दंडावर ५० टक्के सूट देण्याची अभय योजना सध्या सुरू आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्यानं, व्याज आणि दंड माफ करावं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या ६५ गावांमध्ये राबवण्यात येणाऱ्या वॉटर ग्रीड पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ काल पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला. मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर ग्रीड योजना सुरु केल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले.  

//**************//














Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...