Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
आज
सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला बळकट करण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे
टाकलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचं
पंतप्रधानांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सादर
होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाची ही नांदी असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ‘प्रधानमंत्री
किसान सन्मान निधी योजना’ ही शेतकऱ्यांना लाभदायक असणारी स्वातंत्र्योत्तर काळातली
सर्वात मोठी योजना असल्याचं ते म्हणाले. पाच लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त
करण्याची मागणी सरकारनं पूर्ण केल्याचंही त्यांनी नमूद केलं.
****
भारतीय
जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना,
गोरगरीब, शेतकरी आणि युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं या
अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं म्हटलं. असंघटीत क्षेत्रातले कामगार आणि मध्यम वर्गासाठी
करात सवलत, यासारखे निर्णय घेतल्याबद्दल शहा यांनी, सरकारची प्रशंसा केली.
या
अर्थसंकल्पात समाजातल्या सर्व स्तरातल्या नागरिकांचा विकास सुनिश्चित केल्याची प्रतिक्रिया
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली तर या अर्थसंकल्पामुळे पायाभूत सुविधांच्या
विकासाला आणखी बळ मिळेल, असं मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह
राठोड यांनी व्यक्त केलं.
****
दरम्यान,
हा अर्थसंकल्प भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
विरोधकांनी दिली आहे. मतं मिळवण्यासाठी हा अर्थसंकल्प असून, यात शिक्षण, रोजगार आणि
युवकांचे मुद्दे डावलल्याचं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. तर या अर्थसंकल्पामुळे
गरीबांना काहीही फायदा होणार नसल्याची टीका काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी
केली.
काँग्रेस
नेते शशी थरुर यांनी या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी जाहीर घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित
केलं, मात्र मध्यम वर्गीयांसाठी अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांची त्यांनी प्रशंसा
केली.
केंद्र
सरकारचा कार्यकाळ फक्त तीन महिनेच राहिलेला असताना, अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या घोषणा
केल्या, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते के करुणाकरन यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प, देशातला सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेऊन
सादर केलेला हा अर्थसंकल्प असून, अशा घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक
प्रयत्नांचा जाहीरनामाच असल्याचं म्हटलं आहे. शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार,
महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकी, या अर्थसंकल्पातून दिसत
असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
****
शौर्य
गाजवणाऱ्या आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांप्रती
कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना पन्नास
लाख रुपये अनुदान आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत महाराष्ट्रातल्या शौर्य
तसंच सेनापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीनं वाढ केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी
जाहीर केलं.
****
जलयुक्त
शिवार योजना आणि पाण्याचा काटकसरीनं वापर यातूनच, मराठवाड्यातला दुष्काळ संपवता येईल,
असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज पाचव्या ‘महाॲग्रो’
या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार
समित्यांमधल्या अडत हमालीतून सरकारनं शेतकऱ्यांची मुक्तता केली असून, शेतकऱ्यांना याचा
मोठा फायदा झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
परभणी
इथल्या, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यावेळी उपस्थित होते,
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं विद्यापीठ
कमी पडणार नसल्याची हमी, कुलगुरु डॉ.ढवण यांनी दिली. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष
डॉ.भागवत कराड, महापौर नंदकुमार घोडेले, कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पालघर
जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसरात आज भूकंपाचे चार धक्के बसले. पहिला
धक्का सकाळी सात ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार पूर्णांक रिश्टर स्केल
तीव्रतेचे हे धक्के बसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत
आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान हॅमिल्टन इथं झालेला तिसरा एकदिवसीय क्रिकेट
सामना न्यूझीलंडनं सात गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी दिलेलं
१५० धावांचं लक्ष्य न्यूझीलंडच्या संघानं सात गडी राखत पूर्ण केलं.
****
No comments:
Post a Comment