Friday, 28 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात संशोधन आणि विकास क्षेत्रात उच्चविद्याविभुषित अनेक महिला कार्यरत असल्या, तरी जागतिक स्तरावर महिला शास्त्रज्ञांच्या प्रमाणात ही संख्या पन्नास टक्के असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत विज्ञान दिनाच्या अनुषंगानं बोलत होते. जगभरात संशोधन क्षेत्रात कार्यरत महिला शास्त्रज्ञांचं प्रमाण सरासरी तीस टक्के असताना, भारतात हे प्रमाण फक्त पंधरा टक्के असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. विज्ञानात कार्यरत महिला ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे.  विज्ञान शाखेत उच्च शिक्षण आणि अध्यापनात महिलांची संख्या वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जात असल्याचं राष्ट्रपती म्हणाले
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना या विषयावर आज विधानसभेत चर्चा झाली. नागरिकांच्या इतर मागासप्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधीमंडळानं केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र अनुसूचित जाती -जमाती व्यतिरिक्त अन्य प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात येत नसल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी, याबाबत बोलताना, इतरमागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, हा मुद्दा केंद्राकडे सर्वांनी मिळून लावून धरावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, यासंदर्भात एका शिष्टमंडळानं पंतप्रधानांची भेट घेऊन या मागणीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
****
विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याची मागणी तसंच शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या रुपात मांडण्यात आला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यासंदर्भात संबंधित विभागाची बैठक सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सदनाला सांगितलं.
****
वाहनांच्या क्षमतेपेक्षा अधिक होणारी मालवाहतुक - ओव्हर लोडिंग थांबवावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ते विधान परिषदेत बोलत होते. अनेक अपघातांनाही ओव्हरलोडिंग कारणीभूत असल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात कायद्याचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून, पथकर नाक्यांनाही अशा वाहनांवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली असल्याचं, मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
****
मराठा आरक्षणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करावी, अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे केलेल्या अर्जात पाटील यांनी, अशा घटनात्मक बाबींवर कलम १४५/३ नुसार घटनापीठाला निर्णय देण्याचा अधिकार आहे, त्याकरता पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ तत्काळ गठीत करून, त्या घटनापीठाने याबाबत निर्णय द्यावा अशी विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवलेल्या मराठा आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य दाखवून हे आरक्षण कशा प्रकारे टिकवण्यात येईल याचा खुलासा करावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
****
सीमेपलिकडच्या साधनांचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, बालाकोट हवाई हल्ल्यातून हा संदेश स्पष्ट केला असल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत वायूसेना अभ्यास केंद्रात बोलत होते. तीनही सेना दलांचे प्रमुख सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यावेळी उपस्थित होते. कठोर निर्णय घेण्यासाठी सैन्य दल तसंच राजकीय नेतृत्वाची भूमिका मोठी असते, कारगील, उरी आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांमधून ही बाब सिद्ध होत असल्याचं, रावत यांनी नमूद केलं.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. आज विज्ञान दिनाच्या अनुषंगानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २१ महिला शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संशोधन क्षेत्राला अधिकाधिक पूरक वातावरण निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सांगली महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीला सादर करण्यात आला . या अर्थसंकल्पात ६७४ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे ६७५ कोटी २३ लाख रुपये महसुली जमा आणि ५८ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आयुक्त नितीन कापडणीस यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महसूली उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला असून त्यात क्रीडांगणे, खुल्या जागांच्या भाडे शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामुळे महापालिका स्वयंपूर्ण व्हायला मदत होईल, असा विश्वास आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला.
****
ओडिशामधे सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांन काल आणखी तीन सुवर्णपदकं मिळवत अग्रस्थान कायम राखलं. भारोत्तोलन स्पर्धेत महेश दत्ता अस्वले आणि प्राजक्त रविंद्र खळकर यांनी तर कुस्तीत ज्योतिबा बजरंग अटकले यानं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत पंजाब विद्यापीठानं दुसरा तर बंगळुरु इथल्या जैन विद्यापीठानं तिसरा क्रमांक मिळवला.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.28.02.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 28.02.2020, Time: 8.40 - 8.45 AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 28 February 2020
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۸  ؍ فروری  ۲۰۲۰ئ؁
وَقت :  ۴۰:۸۔ ۴۵:۸

 مرکزی حکو مت مراٹھی کو اعلیٰ زبان کا درجہ دینے سے متعلق جلد از جلد فیصلہ کرے ۔  اِس تجویز کی منظوری سے متعلق قرار داد کل مقننہ میں اتفاقِ رائے سے منظور کی گئی۔  وزیر برائے مراٹھی زبان سُبھاش دیسائی نے یہ تجویز پیش کی تھی۔ اِس موقعے پر سابق وزیر اعلیٰ پُرتھوی راج چو ہان نے بتا یا کہ سن 2013؁ میں معروف ادیب  رنگناتھ پٹھا رے کی زیر قیادت کمیٹی کی جانب سے تیار کر دہ 500؍ صفحات پر مشتمل رپورٹ مرکزی حکو مت کو پیش کی گئی تھی لیکن اب تک اُس پر کوئی خاص کاروائی نہیں ہوئی ہے۔  اُنھوں نے اِس خصوص میں فالو اپ لینے کے لیے ایک کمیٹی تشکیل دینے کا بھی مطالبہ کیا۔اِس موقعے پر اراکین نے اِس بات پر نا راضی کا اظہار کیا کہ تمام اُصولوں کی تکمیل کے با وجود تا حال مراٹھی کو سرکا ری زبان کا درجہ نہیں دیا گیا ہے۔خیال رہے کہ فی الحال   تیلگو ‘تامِل ‘ سنسکرت‘ کننڈا‘ ملیا لم اور اُڑیا  زبانوں کو اعلیٰ زبان کا درجہ حاصل ہے۔

***** ***** *****

 مراٹھی زبان کی ماہرڈاکٹر نیلیما گُنڈی نے کہا ہے کہ ہمیں ایسے تعلیمی نصاب کی ضرورت ہے جس سے ماہر لسا نیات تیار ہوں۔ وہ کل ودھان بھون میں منعقدہ ’’ اِ اے مراٹھی چے نگری ‘‘ نامی پروگرام میں اظہار خیال کر رہی تھیں۔اپنے خطاب میں اُنھوں نے مراٹھی زبان کی مختلف بولیوں کے تحفظ کی ضرورت کا بھی اظہار کیا۔ڈاکٹر نیلیما نے کہا کہ ادویات کے کوَر پر مراٹھی زبان میں بھی تفصیلات درج کی جا نی چا ہیے۔
 اِس پروگرام کا افتتاح وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کے ہاتھوں عمل میں آیا ۔ اِس موقعے پر اسمبلی کے اسپیکر  نا نا پٹولے‘ قانو ن ساز کونسل کے چیئر مین رام راجے نائک نمبالکر ‘ اسمبلی میں حزب اختلا ف کے قائد دیویندر پھڑنویس ‘ قانون ساز کونسل میں حزب اختلاف کے رہنما پر وین دریکر اور  وزیر برائے مراٹھی زبان  سُبھاش دیسائی سمیت کئی معزز شخصیتیں موجود تھیں۔
اپنے خطاب میں وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا کہ مراٹھی زبان کی حمایت میں صرف ایک دِن کا اہتمام نہ کریں بلکہ تا عمر اِس کی حمایت کر نا چا ہیے۔ 

***** ***** *****

 یومِ مراٹھی زبان کی مناسبت سے کل ریاست بھر میں مختلف تقاریب کا اہتمام کیا گیا تھا۔ اورنگ آ باد میں اِس موقعے پرکتابوں کی نمائش کا اہتمام کیا گیا ۔ شہر کے سرسوتی بھون آرٹس اور کامرس کالج میں کل اساتذہ کے مشاعرے کا بھی انعقاد کیا گیا تھا۔
 جالنہ ضلع کتب خا نے میں بھی اِس دن کی منا سبت سے کتابوں کی نمائش رکھی گئی تھی۔ اِس موقعے پر مراٹھی زبان کے عظیم ادیب  وی  وا  شِر واڑ کر  کی تصویر کو پھولوں کا ہار پہنا کرنمائش کا افتتاح کیا گیا۔

***** ***** *****

  کورے گائوں بھیما ‘ مراٹھا ریزر ویشن  اور نانار منصوبہ آندولن  میں جن نوجوانوں پر فردِ جر داخل کیے گئے ہیں اُنھیں ریاستی حکو مت کی جانب سے بڑی راحت ملی ہے۔وزیر داخلہ انیل دیشمکھ نے بتا یا کہ کورے گائوں بھیما آندولن میں داخل کیے گئے649؍ فردِ جر م میں سے 348؍  جبکہ مراٹھا ریزر ویشن احتجاج میںداخل کیے گئے 584؍ میں سے460؍ فردِ جرم  میں ریا ستی حکو مت کے فیصلوں کے خلاف احتجاج کرنے والے کاشتکاروں پر داخل کیے گئے فرد ِ جرم بھی واپس لیے جائیں گے۔ 

***** ***** *****

 ہنگولی ضلعے کے کئی حصوں میں کل زلزلے کے ہلکے جھٹکے محسوس کیے گئے۔ ہمارے نمائندے نے خبر دی ہے کہ کلمنوری تعلقے کے بو دھی‘ بعور‘ مال دھاونڈا  اور  دانڈے گائوں میں کل صبح زلزلے کے  دو  جھٹکے محسوس کیے گئے  اور  زمین کے اندرسے پُر اَسرار آوازیں سنائی دی جس کی وجہ سے مقامی ساکنان پر خوف طا ری ہے۔ تا ہم اِن آفات کی وجہ سے کوئی جانی نقصان نہیں ہوا ہے۔

***** ***** *****

 لاتور کے ضلع کلکٹر  جی  شری کانت نے بتا یا ہے کہ لاتور شہر کو پانی فراہم کرنے والے مانجر آبی ذخیرے میں 36؍ میلین گھن میٹر پانی کا ذخیرہ موجود ہے۔ لہذا  اگر دس دِن کے وقفے سے پانی فراہم کی جاتا ہے تو اکتوبر مہینے تک پانی کی قلت نہیں ہو گی ۔ اُنھوں نے بتا یا کہ دیو نی اور لاتور تعلقے میںپانی کی قلت کے امکانات کو مد ِنظر رکھتے ہوئے پانی فراہمی کی منصو بہ بندی کی گئی ہے۔  

***** ***** *****

 آسٹریلیاء میں کھیلے جا رہے خواتین کے  T-20؍کر کٹ عالمی کپ مقا بلو ںمیں  کل بھارتی ٹیم نے نیوزی لینڈ پر 4؍ وکٹوں سے جیت حاصل کر تے ہوئے سیمی فائنل میں داخلہ حاصل کر لیا ہے۔ نیوزی لینڈ نے ٹاس جیت کر پہلے فیلنڈنگ کرنے کا فیصلہ کیا  تھا۔ پہلے بلّے بازی کرتے ہوئے بھارتی ٹیم نے مقررہ اوورں میں8؍ وکٹ کے نقصان پر نیوزی لینڈ کو
133؍ رن کا نشا نہ دیا تھا۔ جوابی بلّے بازی میں نیوزی لینڈ کی ٹیم مقررہ اووروں میں محض129؍ رن ہی بنا سکی۔ بھارت کی سلامی بلّے باز  شیفالی ور ما کو مقابلے کی بہترین کھلاڑی قرار دیا گیا۔

***** *****
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ फेब्रुवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर
** भीमा कोरेगाव आणि मराठा आरक्षण आंदोलनातले काही गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय
** प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
आणि 
** महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश 
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा, अशी शिफारस करणारा ठरावही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल एकमतानं मंजुर झाला. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी तो सभागृहात मांडला. २०१३मध्ये साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालच्या समितिनं तयार केलेला ५०० पानांचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात आला, मात्र त्यानंतर याबाबत फारसे काही घडले नसल्याचं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी, साहित्यिक आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. पाठपुराव्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाण्याची मागणीही सदस्यांनी केली. सर्व निकष पूर्ण करत असतांनादेखील मराठीला राजभाषेच्या दर्जा दिला जात नसल्याबद्दल, सदस्यांनी नाराजीची भावना यावेळी व्यक्त केली. सध्या तामिळ, तेलगु, संस्कृत, कन्नड, मल्याळम् आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे.
****
राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमधे मराठी भाषा शिकणं अनिवार्य करणारं विधेयक काल विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकातली सवलत देण्याची तरतूद या कायद्याला मारक असून ती रद्द करावी, अशी सूचना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर ही सुरुवात असून, कायद्यात सवलत मिळणार नाही, याची काळजी घेऊ, आणि वेळोवेळी सभागृहात याबाबतची माहिती देऊ, असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे.
****
भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची आज गरज असल्याचं, मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी म्हटलं आहे. त्या काल विधानभवनात झालेल्या 'इये मराठीचीये नगरी' या कार्यक्रमात बोलत होत्या. मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती देण्यात यावी, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी भाषा ही संस्कारातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता, आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा,  असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्य सरकारच्या वतीनं मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास देण्यात येणारा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ काल ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पुरस्कार प्रदान केले. मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेला ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आर. विवेकांनद गोपाळ यांना, तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला.
****
दरम्यान, मराठी भाषा दिवस काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. औरंगाबाद इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात काल प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं. शहरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधून मराठी गौरव गीत, पोवाडा गायन, आदी कार्यक्रम घेण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून काल मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून हा दिन साजरा केला.
जालना जिल्हा ग्रंथालयात काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे यांनी यावेळी व्यक्त केली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
****
कोरेगाव- भीमा,  मराठा आरक्षण आणि नाणार प्रकल्प आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या तरूणांना राज्य शासनानं मोठा दिलासा दिला आहे. कोरेगाव भीमा आंदोलनातल्या ६४९ पैकी ३४८  गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातले ५८४  पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानपरिषदेत दिली. दरम्यान, गेल्या पाच  वर्षात राज्यात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातले गुन्हेही मागे घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.
****
राज्यात विविध उत्सवादरम्यान तयार होत असलेल्या देवी देवतांच्या प्लास्टर ऑफ पॅरिस - पीओपीच्या मूर्तींवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी असे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत. त्यासोबतच राज्य सरकारनं पर्यावरण रक्षणबाबत संवेदनशील असावं, अशी अपेक्षाही न्यायालयानं व्यक्त केली आहे. यासंदर्भातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं, पीओपीच्या मूर्तींची योग्य विल्हेवाट लाऊ शकत नसल्यानं याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरता येणार नाही, असं सांगितलं. त्याशिवाय पीओपीची मूर्ती तयार करण्यावरच बंदी घालावी, अशा मूर्ती तयार करण्यावर दंडात्मक कारवाई करावी, या मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट व्हावी, असा आदेश दिला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात काल भुकंपाचे सौम्य धक्के बसले. कळमनुरी तालुक्यात बोधी, बऊर, माळधावंडा, दांडेगाव या परिसरात काल पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले असून, भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुदैवानं या भागात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत प्रस्तावित सहा कोटी २५ लाख रुपयांच्या पुस्तक खरेदी प्रकरणाची संपूर्ण  चौकशी  करण्यात यावी अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना याबाबत एक सविस्तर निवेदन त्यांनी दिलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमातर्गंत शेतकऱ्यांना ही पुस्तके वाटप करायची होती.
****
लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या भंडारवाडी इथल्या रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या विरोधात रेणापूर परिसरातल्या नागरिकांनी प्रकल्पाच्या दरवाज्यासमोर परवा दुपारपासून सुरू केलेलं धरणं आंदोलन कालही सुरू होतं. पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे. रेणापूर शहरातलेही बहुतांश व्यवहारही काल बंद ठेवण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिशा समितीची बैठक घेण्यात आली. केंद्र शासनाच्या त्रेचाळीस योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या. कयाधू नदी काठावरील प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावावी, प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी, पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवावी, आदी सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या.
****
लातूर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या मांजरा धरणात ३६ दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा असून दर दहादिवसा आड पाणी देण्याचं नियोजन केलं तर आक्टोबर महिन्यापर्यंत पाणी टंचाई जाणवणार  नाही असं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं. देवणी आणि लातूर तालुक्यात टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. रेणापूर मध्यम प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलंच फक्त पाणी  सोडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
*****
उस्मानाबाद जिल्ह्यातले शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासह कळंब तालुक्यातले चाळीस गावामधले सरपंच, तसंच चार शिवसेना विभाग प्रमुखांनीही काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थितीत होते.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं काल न्यूझीलंडवर चार धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत, भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतीय संघानं निर्धारित षटकांत आठ बाद १३३ धावा केल्या, मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारित वीस षटकांत १२९ धावाच करू शकला. भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिनं सामनावीरचा पुरस्कार पटकावला.
****
औरंगाबाद शहराच्या उल्कानगरी भागात खिंवसरा पार्क इथं असलेल्या एका इमारतीत तळमजल्यावरच्या गोदामाला काल पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत संस्कार श्यामसुंदर जाधव या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
****












आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...