Friday, 28 February 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 28.02.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी व्ही रमण यांचं संशोधन असलेल्या रमण परिणामाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या संशोधनासाठी सी व्ही रमण यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं. आज विज्ञान दिनाच्या अनुषंगानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २१ महिला शास्त्रज्ञांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संशोधन क्षेत्राला अधिकाधिक पूरक वातावरण निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, आज ठिकठिकाणच्या शाळा महाविद्यालयांमधून विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सांगली महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीला सादर करण्यात आला . या अर्थसंकल्पात ६७४ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे ६७५ कोटी २३ लाख रुपये महसुली जमा आणि ५८ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आयुक्त नितीन कापडणीस यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महसूली उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला असून त्यात क्रीडांगणे, खुल्या जागांच्या भाडे शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामुळे महापालिका स्वयंपूर्ण व्हायला मदत होईल, असा विश्वास आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केला.
****
ओडिशामधे सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांन काल आणखी तीन सुवर्णपदकं मिळवत अग्रस्थान कायम राखलं. भारोत्तोलन स्पर्धेत महेश दत्ता अस्वले आणि प्राजक्त रविंद्र खळकर यांनी तर कुस्तीत ज्योतिबा बजरंग अटकले यानं सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत पंजाब विद्यापीठानं दुसरा तर बंगळुरु इथल्या जैन विद्यापीठानं तिसरा क्रमांक मिळवला.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...