आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
भारताच्या
दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राजघाट
इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीला आदरांजली अर्पण केली, वृक्षारोपन केलं. तत्पुर्वी,
त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतली. `गार्ड ऑफ
ऑनर`, एकवीस तोफांच्या सलामीद्वारे यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यावेळी उपस्थित होते.
****
पंतप्रधान
मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प आज नवी दिल्ली इथं व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, दहशतवाद,
ऊर्जा आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. हैदराबाद भवन इथं ही चर्चा होणार
आहे. ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संध्याकाळी मेजवानीचं
आयोजन केलं आहे.
****
येत्या
एप्रिल महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या पंचावन्न जागांसाठी सहव्वीस मार्च
रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं आज ही माहिती दिली. सतरा राज्यांमधील या जागा
एप्रिल महिन्याच्या विविध तारखांना रिक्त होणार आहेत.
****
राज्य
विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापुर्वी
आजही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफी आणि महिलांना
सुरक्षेच्या मुद्दांवर निदर्शनं केली. या विषयांवर विधीमंडळात चर्चा करण्याची मागणी
भाजपनं काल केली होती पण महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारनं आवाज दाबण्याचा प्रयत्न
केला, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला.
सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना फसवी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष निर्यातदारांना आर्थिक
फटका बसला आहे. चीनकडे होणारी द्राक्ष निर्यात थांबल्यानं सुमारे पाचशे टन द्राक्षाची उलाढाल ठप्प झाली
आहे. चीनला चालूवर्षी पाचशे मेट्रिक टन द्राक्ष निर्यात अपेक्षित
होती. गेल्यावर्षी सांगलीतून चीनसाठी ८५ कंटेनरनं ४६६ मेट्रिक टन द्राक्षाची
निर्यात झाली होती.
****
No comments:
Post a Comment