Saturday, 4 November 2017

AIR NEWS AURANGABAD Prasangik 04.11.2017

AIR News Bulletin, Aurangabad 04.11.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 04.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत संशोधन आधारित शिक्षणाकडे वाटचाल करत असून त्याआधारे देश उभारणीसाठी उत्पादन आणि तंत्रज्ञान निर्मिती करत असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये ४८ व्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी दिल्लीच्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. आय आय टी व्यवस्था म्हणजे देशाच्या तंत्रशिक्षणाचं सुवर्ण मानक असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. प्रदुषणापासून संरक्षण करण्यासासाठी आय आय टी दिल्लीनं विकसीत केलेल्या नॅनो फिल्टर उपकरणाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.

****

‘वर्ल्ड फूड इंडिया’ हा मेळावा भारताच्या कृषी विकासासाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया या मेळाव्याअंतर्गत आयोजित फळं आणि भाज्यांसंबंधीच्या संमेलनात ते आज बोलत होते. सरकारनं अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, वर्ल्ड फूड इंडियाच्या प्रदर्शनात आज आठशे किलो खिचडी शिजवण्यात आली. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल, योग गुरु बाबा रामदेव, प्रसिद्ध आचारी संजीव कपूर यावेळी उपस्थित होते. जागतिक विक्रम बनवण्यासाठी आणि भारतीय खाद्यपदार्थांचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

****

गुजरातमधल्या अक्षरधाम मंदीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल रशीद अजमेरी याला आज अहमदाबाद विमानतळावरुन अटक करण्यात आली. या हल्ल्यानंतर तो सौदी अरेबियामध्ये पळून गेला होता. २४ सप्टेंबर २००२ साली झालेल्या या हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.

****

येत्या तीन वर्षांत राज्याच्या कानाकोपऱ्यात वीजेचा पुरवठा करणारे फीडर बसवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रकल्पातून आगामी तीन महिन्यात दोन मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे सलग १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातला पहिला ग्रामरक्षक दलही अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करण्यात आला असून, ग्रामरक्षक दलाच्या पुढाकारातून प्रत्येक गाव दारुमुक्त होऊ शकतं, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री सौर प्रकल्पाचं लोकार्पण करताना एका युवकानं व्यासपीठाच्या दिशेनं धाव घेतली, मात्र पोलिसांनी तातडीनं धावणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जवळ जाऊ न दिल्याच्या रागातून या तरुणानं सुरक्षाकडं तोडून व्यासपीठाकडे धाव घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

मुंबई-गोवा महामार्गावर टाकेवाडी-खारेपाटण इथं चालकाचा ताबा सुटल्यानं खासगी ट्रॅव्हल्सची बस उलटून १२ जण जखमी झाले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रामेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून आचऱ्याला जात होती. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना कणकवलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसचा चालक आणि क्लीनर फरार आहे.

****

जालना जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विवेकानंद हॉयस्कूलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. शिक्षकांना करावी लागणारी ऑनलाइन कामं बंद करावी, जुनी पेंशन योजना लागू करावी आदी मागण्यांचं निवेदन समितीच्या वतीनं या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांना देण्यात आलं.

****

जालना इथल्या फन रनर ग्रुपच्यावतीनं उद्या हॉफ मॅरेथान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जालन्यात प्रथमच आयोजित या स्पर्धेत दोन हजार १०० धावपटू सहभागी होणार असल्याचं आयोजकांनी आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. 

****

व्हिएतनाम मध्ये सुरु असलेल्या आशिया महिला मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत  भारताची एम सी मेरी कोम उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेरी कोमनं चीनी तैपेईच्या मेंग ची पिनचा पराभव केला. उपान्त्य फेरीत मेरी कोमचा सामना जपानच्या त्सुबासा कोमुरा बरोबर होणार आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान दुसरा टी-ट्वेंटी सामना आज होणार आहे. संध्याकाळी सात वाजता राजकोट इथं या सामन्याला सुरुवात होईल. गेल्या बुधवारी दिल्ली इथं झालेला पहिला सामना भारतानं जिंकून तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.11.2017_13.00

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.11.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 November 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  ०४ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

सरकार देशाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय व्यवसायातील सुधारणा या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. सुलभतेनं व्यवसाय करता येण्यासंदर्भातल्या - इझ ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमामुळे प्रत्येक भारतीयाचं जीवनही सुलभ होईल, असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली ही अत्यंत महत्वाची सुधारणा असून, यामुळे इझ ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

दरम्यान, मध्यमवर्गियांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये अनेक संधी नर्माण होत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत खाद्यान्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योगांमध्ये काम करणा-या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी संवाद साधताना बोलत होते. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी हा संवाद साधला.

****

शेतक-यांकडून व्यापा-यांना करण्यात येणा-या दोन लाखांपर्यंतच्या शेतमाल विक्रीवर कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागणार नसल्याचं आयकार विभागानं स्पष्ट केलं आहे. दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर शेतकरी अथवा व्यापा-याला कायम खाते क्रमांक अर्थात पॅन क्रमांक आणि ६० क्रमांकाचा फॉर्मही द्यावा लागणार नसल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. शेतीशी संबंधित घटकांनी शेतमाल विक्रीला आयकर कायद्याच्या तरतूदी लागू होतात का हे जाणून घेण्यासाठी आयकर विभागाला निवेदनं दिले होते. त्यानंतर आयकर विभागानं हे स्पष्टीकरण जारी केलं आहे. 

****

निवडणूक आयोगानं दूरदृष्य संवादप्रणाली द्वारे हिमाचल प्रदेशमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये संपूर्ण ६० जागांसाठी पुढच्या आठवड्यात गुरूवारी निवडणुका होत आहेत. या आढावा बैठकीला हिमाचल प्रदेशसह, शेजारील जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणाचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

****

भारतीय बनावटीच्या कमी वजनाच्या ग्लाईड बॉम्ब ची चाचणी ओडिशातल्या चांदीपूर इथं भारतीय हवाई दलाच्या एकिकृत परिक्षण केंद्रावर यशस्वीपणे पार पडली. स्मार्ट एअरफिल्ड वेपन नावाचा हा बॉम्ब लढाऊ विमानातून टाकण्यात आला. वेगवेगळी लक्ष्य तसंच अंतराचा वापर करुन तीन चाचण्या घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डचे निवृत्त अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची स्थापना केली आहे. या समितीला तीन महिन्यांत आपला अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. सहकार विभागानं याबाबतचा निर्णय जारी केला. राज्यातल्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी काही बँका आर्थिक अडचणीत आहेत. या बँका शेतक-र्यांना गरजेप्रमाणे पीककर्ज पुरवठा करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे संबंधित बॅंकाचे ठेवीदार आणि शेतक-र्यांचं हित लक्षात घेऊन हे विलिनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचं शासनाच्या आदेशात म्हटलं आहे. 

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करावा, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग आणि राज्य सरकारला दिला आहे. पोलिसांनी अनेक कच्चे दुवे सोडल्यामुळे दाभोलकर यांचे मारेकरी अद्यापही पकडले जाऊ शकले नाहीत, यात दोषी आढळलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या सिरसगावचा हिवरेबाजारच्या धर्तीवर विकास करण्यात येत असल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल लोणीकर यांच्या हस्ते सिरसगाव इथं विविध कामांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये जलवाहिनी, उद्यान, वाचनालय, भूमिगत नाल्या, यासह ई-लर्निंग सुविधांचा समावेश आहे.

****

मनोहराबाद आणि मेसीपेट स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रेल्वे रूळांच्या कामामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान उद्या रविवारपासून मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे नांदेड - मेडाचल तसंच मेडाचल-नांदेड प्रवासी रेल्वे गाडी उद्यापासून येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.

*****
आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०4 नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुनानक देव यांनी शांती, सद्भावना आणि मानवाच्या एकतेचा संदेश दिला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आपण सर्व जण गुरुनानक देव यांना नमन करुन त्यांची शिकवण स्मरणात ठेऊ असं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.    
नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
****
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या जनजागृती संदर्भात विविध उपक्रमांच्या प्रस्तावाला राज्य शासनानं दिलेल्या मंजुरीबाबत कोणतीही खातरजमा न करता प्रसार माध्यमात उपस्थित करण्यात आलेल्या शंका, जनतेत गैरसमज पसरवणाऱ्या असल्याचं, महासंचालनालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांच्या प्रस्तावाला राज्य शासनानं दोन नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली आहे. ही मंजुरी ‘विशेष प्रसिद्धी मोहीम’ या अर्थशिर्षाअंतर्गत असली तरीही त्याचा राज्य सरकारच्या तीन वर्षपूर्तीशी संबंध नसल्याचं, महासंचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
परभणी महापालिकेच्या काल बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला, त्यामुळे गणपूर्ती अभावी ही सभा होऊ शकली नाही. या सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती, मात्र सदस्यांच्या निवडीवरून नाराज काँग्रेस सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कपिलधार इथं काल त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविकांनी बंकटस्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शिवा संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मार्गदर्शन केलं. या तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती देणं आवश्यक असल्याचं धोंडे यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद इथं काल कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतिनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यात महिला कामगारांचा मोठा सहभाग होता. सीटूच्या देशभरात प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. यात राष्ट्रीय १२ आणि चार स्थानिक मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date - 04  November  2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ  :  4؍  نومبر  ۲۰۱۷ئ؁
وَقت  :  صبح  ۴۰: ۸  -  ۴۵ :۸
***********************
 زرعی مال کی دولاکھ روپیوں تک تاجروں نے لی گئی نقدی فروخت انکم ٹیکس ضابطوں سے مستثنیٰ ہے۔ اس بات کی وضاحت انکم ٹیکس محکمہ نے کی ہے۔ محکمہ کی جانب سے جاری کردہ مکتوب میںکہاگیاہے کہ دولاکھ روپیوں سے کم زرعی مال کی نقدی فروخت پرکسان یاتاجروں کوانکم ٹیکس ادانہیں کرناہوگا۔ اُنہیں پین یافارم نمبر16؍ پُر کرنے کی ضرورت بھی نہیںہوگی۔جاری کردہ بیان میںیہ بات کہی گئی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 سپریم کورٹ نے کل بینکوں سے کہا ہے کہ وہ صارفین کوبھیجے گئے میسج میںکھاتوں سے آدھارکومنسلک کرنے کی آخری تاریخ بتائیں، جواگلے مہینے کی 31؍ تاریخ ہے۔ اسی طرح اس نے کہا ہے کہ ٹیلی مواصلاتی خدمات فراہم کرنے والی کمپنیوں کوبھی صارفین کویہ بتانا چاہئے کہ موبائیل نمبروں کے ساتھ آدھارکومنسلک کرنے کی آخری تاریخ اگلے سال 6؍فروری ہے۔ جسٹس اے کے سیکری اورجسٹس اشوک بھوشن پرمشتمل ایک بینچ نے اُن چارعرضداشتوں پر حکومت کاجواب مانگاہے۔جس میں آدھارایکٹ کے آئینی جوازاورآدھارنمبرکے ساتھ بینک کھاتوں اورموبائیل نمبروں کوجوڑے جانے کوچیلنج کیاگیاہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 کرنسی تبدیلی کے بعدمستردکئے گئے نوٹوں کوبینکس میںجمع کرنے کے لئے 14؍ عرضداشتوں پرسپریم کورٹ میںکل سماعت ہوئی۔پانچ ججوں کی بینچ ا س سلسلے میںفیصلہ کریگی۔یہ بات سپریم کورٹ نے کہی۔اسی بیچ عدالت میںسماعت مکمل ہونے تک مسترد کئے گئے نوٹیں رکھنے والوں کے خلاف کسی قسم کی کاروائی نہیں کی جائے گی۔یہ بات حکومت نے عدالت میںکہی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 سپریم کورٹ نے کل حکم دیا ہے کہ تکنیکی تعلیم،خط وکتابت کے ذریعہ فراہم نہیں کی جاسکتی۔عدالت نے تعلیمی اداروں سے کہا ہے کہ وہ انجینئرنگ جیسی تکنیکی تعلیم کے نصابات کوفاصلاتی تعلیمی پروگراموں کے ذریعہ فراہم کرانے سے بازرہیں۔عدالت نے پنجاب اورہریانہ ہائی کورٹ کے احکامات کو برقراررکھتے ہوئے اوڑیسہ ہائی کورٹ کے فیصلے کوکالعدم قراردے دیا،جس میں اس نے تکنیکی تعلیم کوخط وکتابت کے ذریعہ فراہم کرانے کی اجازت دی تھی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 ’’پرگت تعلیمی مہاراشٹر‘‘اسکیم کے تحت ریاست کے سومنتخبہ اسکولوں کوبین الاقوامی درجے کے لئے تیارکرنے کے منصوبے پرعمل درآمدکرنے کااعلان اسکولی تعلیمی وزیرونودتائوڑے نے کیاہے۔وہ کل ممبئی میں مخاطب تھے۔ثانوی تعلیم میںلڑکیوں کے کم ہونے کے تناسب کوپانچ فیصد تک لانا اسی طرح تعلیمی کارکردگی میںمہاراشٹر کوملک کے پہلے تین نمبرپرلانے کے لئے اس منصوبے پرعمل درآمدکیاجارہاہے۔یہ بات کہتے ہوئے اُنہوںنے کہا کہ آئندہ ریاست کے تمام اسکولوں کوبین الاقوامی درجے تک لانے کے لئے اس پروگرام پرعمل درآمدکرنے کی تجویز پرتعلیمی محکمہ غورکررہاہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 مہاراشٹر اسٹیٹ ساہتیہ اکیڈمی کے زیراہتمام 2015اور2016 کے لئے اردوزبان وادب اورتعلیم کے فروغ دینے کیلئے خدمات انجام دینے والی شخصیات کوانعامات سے نوازاگیا۔ایوارڈس حاصل کرنے والوں میںقاضی عبدالستارعلی گڑھ، فضیل جعفری ممبئی،بیڑ کے روزنامہ تعمیر کے مدیر قاضی مخدوم ، سید محمدعباس ، روزنامہ انقلاب کے عاصم جلال ،روزنامہ سہاراکے معراج انوراوراورنگ آباد سے ڈاکٹر شرف النہارشامل ہیں۔13، نومبرکوایک تقریب میں ایوارڈس تقسیم کئے جائیںگے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 سکھ مذہب کے بانی گرونانک کی 548؍ویں جینتی آج منائی جارہی ہے۔اس سلسلے میںڈھائی ہزارعقیدت مندوں کاقافلہ پاکستان میں گرونانک کے پیدائشی مقام نان کاناصاحب روانہ ہوگیاہے۔ناندیڑ کے سچکھنڈ گرودوارے میںبھی گرونانک کی جینتی کے موقع پرمختلف پروگرامس کااہتمام کیاگیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 ہندوستانی خواتین ہاکی ٹیم نے جاپان کے کاکامی گاہارامیںجاری ایشیاء کپ خواتین ہاکی مقابلے کے آخری رائونڈ میںداخلہ حاصل کرلیاہے۔ کل ہوئے سیمی فائنل مقابلے میںبھارتی ٹیم نے میزبان جاپان کی ٹیم کوچار،دوسے شکست دی۔کل فائنل میںبھارت کامقابلہ چین کے ساتھ ہوگا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
 ٹیم انڈیا اورنیوزی لینڈ کے درمیان دوسراٹی ٹوینٹی مقابلہ آج ہورہاہے۔شام سات بجے راجکوٹ میںاس مقابلے کاآغازہوگا۔گذشتہ بدھ کودِلّی میںہوئے مقابلے میںبھارت نے کامیابی حاصل کرکے تین ۔ٹوینٹی ٹوینٹی مقابلوں کی سیریز میںایک صفر سے سبقت حاصل کرلی ہے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...